पुण्यात स्फोटांची मालिका - Marathi News 24taas.com

पुण्यात स्फोटांची मालिका

 

 
 
व्हिडिओ पाहा :
 















  
कुठे झाले स्फोटभुजबळ म्हणतात...घाबरू नका - पोलीस हादरले पुणेकर

----
फोटोफिचर पाहण्यासाठी :
पुण्यातील स्फोटाचे दृश्य
 
पुण्यातील स्फोटाचे दृश्य
 
 
----
 
 
पुणे स्फोटः दयानंद पाटीलने केली परदेशवारी

पुणे स्फोटः दयानंद पाटीलने केली परदेशवारी
पुण्यात स्फोटांत जखमी झालेला दयानंद पाटील याने परदेशी वारी केली असल्याचे माहिती समोर येत आहे. दयानंद पाटील यांने जॉर्डनला भेट दिल्याचे त्याच पासपोर्टवर नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


----

जखमी दयानंदशी जुळतायत स्फोटाचे धागेदोरे?

जखमी दयानंदशी जुळतायत स्फोटाचे धागेदोरे?
स्फोटात जखमी झालेल्या दयानंद पाटील याच्याच पिशवीत स्फोट झाल्यानं, त्याच्याकडून या स्फोटाचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची सखोल चौकशी सुरु आहे.


----

सीसीटीव्ही बंद, स्फोटाचे आरोपी सापडणार कसे?

सीसीटीव्ही बंद, स्फोटाचे आरोपी सापडणार कसे?
पुण्यातल्या स्फोटांनंतर एक धक्कादायक बाब समोर आलीय. स्फोट झालेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं उघड झालंय. देना बँक आणि गरवारे परिसरातले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं पुढं आलंय.


----

पुणे कसं झालं ‘टार्गेट’, स्फोटांची मालिका….

पुणे कसं झालं ‘टार्गेट’, स्फोटांची मालिका….
पुण्यात बुधवारी चार ठिकाणी कमी तीव्रतेचे स्फोट झाले.. या स्फोटानंतर काही वेळानंतर आणखी दोन ठिकाणी स्फोटकं निकामी करण्यात आले. रहदारीच्या ठिकाणी झालेल्या या स्फोटांमुळं पुणेकरांमध्ये घबराट निर्माण झाली होती.


----

दहशतवादी हल्ला आहे, बोलणं घाईचं- आबा पाटील

दहशतवादी हल्ला आहे, बोलणं घाईचं- आबा पाटील
पुण्यात झालेल्या स्फोटांमागे दहशतवाद्यांचा हात आहे हे बोलणं घाईचं ठरेल असं गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी म्हटलं. स्फोटानंतर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी घटनास्थळाचा दौरा केला


---- 

पुणे दहशतवाद्यांची धर्मशाळा – खडसे

पुणे दहशतवाद्यांची धर्मशाळा – खडसे
पुण्यात झालेल्या स्फोटानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आहे. पुणे धर्मशाळा झाली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते म्हणाले, 'आजच पदभार स्विकारलेले गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज पुण्यात येणार होते आणि त्याच वेळी पुण्यात स्फोट होत आहेत हा काही योगायोग वाटत नाही.


----

 
पुणे स्फोटानंतर मुंबईसह राज्यात हायअलर्ट

पुणे स्फोटानंतर मुंबईसह राज्यात हायअलर्ट
पुण्यात चार स्फोट झाल्यानंतर मुंबईसह राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्तात वाढ कऱण्यात आली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्येही अलर्ट जारी केला गेला आहे.


----

 
पुण्यात चार बॉम्बस्फोट, एक जखमी

पुण्यात चार बॉम्बस्फोट, एक जखमी
पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी आठच्या सुमारास पाच ठिकाणी कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले . गरवारे कॉलेज, बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड आणि देना बॅंकेसमोर झालेले हे स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी बॉम्बस्फोटच असून, यात एक जण जखमी झाला आहे. आर डेक्कन मॉलजवळ पाचवा स्फोट झाला आहे.


----

 
 
 

First Published: Thursday, August 2, 2012, 19:37


comments powered by Disqus