Last Updated: Thursday, August 2, 2012, 21:59
www.24taas.com, पुणेबुधवारी साखळी बॉम्बस्फोटामुळे पुणे हादरून गेलं...त्या स्फोटानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत...हे ब़ॉम्बस्फोट कुणी आणि का केले ?पुणे बॉम्बस्फोटांमागचा मास्टर माईंड कोण आहे ?
त्यांनी बॉम्बस्फोटासाठी सायकलचा वापर का केला असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीत असून य़ाच प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या प्राईम वॉचमध्ये पुण्याचे गुन्हेगार कोण ?
बुधवारी पुण्यात साखळी बॉम्बस्फोट झाले....त्या प्रकरणाचा आता पोलिसांकडून तपास केला जात आहे...या बॉम्बस्फोटात जखमी झालेला दयानंद पाटील याचीही कसून चौकशी केली जातं आहे...तसेच सायकल विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत..
तारीख : 1ऑगस्ट 2012ठिकाण :बालगंधर्व रंगमंदिर,पुणेवेळ : 7.30 वा.बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या गेटजवळ पहिला स्फोट झाला...या स्फोटाची तिव्रता मोठी नसली तरी त्यामध्ये दयानंद भाऊराव पाटील हा जखमी झाला... एका क्षणात तिथलं सगळं चित्रच बदलून गेलं होतं....
ठिकाण : मॅक्डोनाल्ड वेळ:7.35 वाजंगली महाराज रोडवरील मॅक्डोनाल्ड समोरच्या कचरा पेटीत स्फोट झाला... मात्र या स्फोटात कोणीही जखमी झालं नाही..
ठिकाण :देना बँकवेळ :7.45जंगली महाराज रोडवर असलेल्या देना बँके समोर उभ्या केलेल्या एका सायकलवर स्फोट झाला...हा स्फोट होतो न होतो तोच स्फोटाची आणखी एक घटना घडली...
ठिकाण :गरवारे पूलवेळ :8.25 
पुण्यातल्या जंगली महाराज रो़डवर बुधवारी एकपाठोपाठएक स्फोट झाल्यामुळे पुणे शहर अक्षरश: हदरुन गेलं होतं...
स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला...ज्याठिकाणी स्फोट झाला होता त्या ठिकाणची बॉम्बशोध पथकाने पहाणी केली...
अवघ्या पाऊन तासात शहरात एकाच रस्त्यावर चार ठिकाणी स्फोट झाले होते...या स्फोटांची बातमी वा-यासारखी शहरभर पसरली त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.... चार ठिकाणी झालेल्या स्फोटांची तिव्रता जरी कमी असली तरी ते अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते....
चारपैकी तीन स्फोटांसाठी सायकलचा वापर करण्यात आला होता.. पुण्यातल्या कसबा पेठेतून त्या सायकल्स विकत घेण्यात आल्या होत्या... त्यापार्श्वभूमीवर क्राईम ब्रांचच्या टीमकडून कसबा पेठेतल्या साय़कल विक्रेत्यांची कसून चौकशी केली जातेय....तसेच बालगंधर्व परिसरात स्फोटात जखमी झालेल्या दयानंद पाटीलचीही चौकशी केली जातेय... पाटील हा पुण्यातल्या उरूळी कांचन भागातील रहीवासी असून त्याच्या जवळ असलेल्या पिशवीत बुधवारी रात्री स्फोट झाला होता...दयानंद पाटीलच्या जबाबात विसंगती आढळून आल्यामुळे त्याची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलंय...दयानंद पाटील हा मुळचा कर्नाटकचा रहिवासी असून तीन वर्षांपासून तो पुण्यातील उरळी कांचन भागात वास्तव्याला आहे...या प्रकरणी दयानंदच्या पत्नीचीही चौकशी करण्यात आलीय....या स्फोटाच्या मालिकानंतर एटीएस बरोबरच एनआयए आणि एनएसजीच्या टीम्सही पुण्यात दाखल झाल्या असून त्यांच्याकडूनही तपास केला जात आहे...
पुणे साखळी बॉम्बस्फोटाचा वेगाने तपास केला जातोय..बॉ़म्बस्फोटासाठी काही ठरावीक वस्तूंचा वापर करण्यात आल्याचं तपासात आता उघड झालंय...तसेच ज्यांनी सायकल खरेदी केली होती त्यांची रेखाचित्रही तय़ार केली जात आहेत... त्यामुळे पोलिसांच्या तपासाल दिशा मिळणार आहे...
सायकल, ९ व्हॉल्टची बॅटरी, टायमर, डिटोनेटर
याच वस्तूंचा वापर करुन बुधवारी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर चार ठिकाणी स्फोट घडवण्यात आले आहेत...खरं तर सहा ठिकाणी स्फोट घडविण्याचा त्यांचा बेत होता मात्र पोलिसांनी वेळीच दोन बॉम्ब निषक्रीय केल्यामुळे अनर्थ टळलाय....
पुण्यात झालेले स्फोट हे अत्यंत नियोजन पद्धतीने करण्यात आले होते...त्यासाठी तीन सायकल्स खरेदी करण्यात आल्या होत्या...सायकल्सवर स्फोटकं ठेवून टायमरच्या सहाय्याने त्याचा स्फोट घडवून आणण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय...
स्फोटासाठी छर्रेही वापरण्यात आले होते...तसेच अमोनियम नायट्रोटचा वापर करण्यात आला असावा असा संशयही पोलिसांनी व्यक्त केलाय... आरोपींनी ज्या दुकानातून साय़कल्स खरेदी केल्या होत्या त्या दुकानदाराने दिलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचं रेखाचित्र तयार केलं जातंय...
स्फोटाच्या ठिकाणी मिळालेल्या सायकल्स तसेच कचरापेटी तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आली आहे...पुण्यातील या साखळी बॉम्बस्फोटामागे एखाद्या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं केंद्रीय गृह सचिवांनी सांगितलंय...
एकीकडं केंद्रीय गृहसचिव दहशतवाद्यांचा हात असल्याची शक्यता नाकारत नाही तर दुसरीकडं मात्र पुणे पोलीस यावर काहीच बोलायला तयार नाही...

पुण्यातल्या साखळे बॉम्बस्फोटासाठी जी पद्धत वापरण्यात आलीय ती पहाता यापूर्वीही तशीच पद्धत काही बॉ़म्बस्फोटासाठी वापरण्य़ात आल्याचं तुमच्या लक्षात येईल...पुण्यात बॉम्बस्फोटांसाठी सायकल्सचा वापर करण्यात आलाय...हिच पद्धत मालेगाव आणि ठाण्य़ातल्या बॉम्बस्फोटांसाठीही वापरण्यात आली होती...
बुधवारी साखळी बॉम्बस्फोटामुळे पुणे हादरलं...ऐन गर्दीच्या वेळी एकापाठोपाठ एक असे स्फोट करण्यात आले होते...त्यामुळे या स्फोटमागे नियोजन असल्याचं आता लपून राहिलं नाही...टायमरचा वापर करुन पद्धतशीरपणे हे स्फोट घडवून आणले गेलेत...आता एटीएस, एनआयए आणि एनएसजीच्या पथकांकडून हे साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा तपास केला जातोय...पण हे बॉम्बस्फोट कोणी आणि का घडवून आणले याचा पूरावा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही...खरंतर पोलीस सर्वबाजूंनी तपास करत आहेत...पण ज्या पद्धतीने हे स्फोट घडवून आणले गेले ते पहाता यापूर्वी झालेल्या काही बॉ़म्बस्फोटाशी त्याचं साम्य असल्याचं सहज लक्षात येईल......बुधवारी पुण्यात झालेल्या साखळी बॉ़म्बस्फोटात सायकल्सचा वापर करण्यात आलाय..तसेच टायमर, छर्रे, डिटोनेटरही वापरण्यात आले होते..आणि नेहमकी हीच पद्धत मालेगाव बॉम्बस्फोटातही पहायला मिळाली होती.. मालेगाव बॉम्बस्फोटासाठी आरोपींनी सायकल्सचा वापर केला होता...आरोपींनी सायकल वापरण्यामागचं कारण म्हणजे सायकल ही सहज कुठेही उभी करता येते...तसेच सायकल चालकाकडं कुणी लक्ष देत नाही... .मालेगाव प्रमाणेच ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी हीच पद्धत वापरण्यात आली होती... ५ जून २००८ रोजी गडगकरी रंगायतनमध्ये सायकलचा वापर करुन स्फोट घडवून आणला गेला होता... पुण्यात बुधवारी झालेल्या स्फोटासाठीही हिच पद्धत वापरली गेलीय...आता पोलीस याप्रकरणाचा तपास करीत आहेत...पोलिस तपासात या साखळी बॉम्बस्फोचा मास्टर माईंड कोण हे उघड होईल...
पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पुणे हे दहशतवाद्यांचं सॉफ्ट टार्गेट ठरल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय..पुणे का बनलंय सॉफ्ट टार्गेट
पुण्याच्या साखळी स्फोटानंतर पुणे सॉफ्ट टार्गेट असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.. .. जर्मन बेकरी स्फोटापूर्वी दहशतवांद्यानी पुण्याच्या प्रमुख ठिकाणांची रेकी केली होती.. गेल्य़ा काही वर्षांपासून पुणे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचं वारंवार उघड झालं आहे....
13 फेब्रुवारी 2011रोजी कोरेगाव पार्कच्या जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटानंतर पुणेही दहशतवाद्याच्या रडार असल्याचं ख-या अर्थानं जगासमोर आलं होतं.. वारंवार पुण्याला दहशतवांद्याक़डून धोका असल्याच्या सूचनाकडे दुर्लक्ष केल्यानं पुण्याला जर्मन बेकरी स्फोट आणि आता पुन्हा एकदा जंगली महाराज रोडवरील साखळी स्फोटाला सामोरं जाव लागतय..
गेल्या चार वर्षातील घटनांवर नजर टाकल्यास पुणे हे दहशतवाद्याचे केंद्र बनल्याचं आता लक्षात येईल.. पुण्याच्या ज्या जर्मन बेकरीला दहशतवाद्यांनी टार्गेट केलं होतं त्या परिसराची स्फोटाअगोदर काही दिवसापुर्वीच डेव्हीड हेडलीनं पाहणी केली होती..परदेशी नागरिकांची वर्दळ असलेला ओशो आश्रम हा जर्मन बेकरीपासून हा हाकेच्या अंतरावर आहे. डेव्हीड हेडलीनं जुलै 2008 आणि मार्च 2009 मध्ये ओशो आश्रमला भेट
दिली होती.. त्यासाठी तो कोरेगाव परिसरातल्या सूर्या व्हीला या हॉटेलमध्ये उतरला होता.. हेडलीच्या पुणे भेटीमूळे पूणे हे दहशतवाद्यांचे पुढचे टार्गेट असल्याचं यापुर्वीच स्पष्ट झालं होतं.. मात्र एवढी महत्वाची माहिती मिळालेली असतानाही पुणे पोलिस गाफिल राहीले. हेडली प्रमाणे देशभरात दहशतवादी कारवाया करणारा शब्बीर हुसैन यांचही पुणे कनेक्शन उघड झालंहोत.. जानेवार 2009 रोजी शब्बीरला अटक केली होती. बंगळूरु बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांनं पुण्यात तीन महिने वास्तव्य केल्य़ाचं उघड झालं होतं.. देशभरात विवीध ठिकाणी झालेल्या स्फोटात शब्बीर हुसैनचा हात असल्याचा दावा पोलीसांनी केला होता. अनेक बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिस शोध घेत असलेल्या रियाज भटकळचं शब्बीर हुसैनशी संबध असल्याचं पोलिस तपासादरम्यान उघड झालं होत.
मन्सूर पीरभॉ प्रकरणातही पुणे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचं समोर आलं होतं.., एका इंटरनॅशनल कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला असलेला पीरभॉय हा इंडियन मुज्जाहिदीनचा खास हस्तक असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. लाखभर पगाराच्या नोकरीवर पाणी सोडून मन्सूर हा इंडियन मुज्जाहिदीन या संघटनेत सामील झाला.. मात्र दहशतवादी विरोधी पथकानं पीरभॉयला त्याच्या तीन साथीदारांसह ऑक्टोबर 2008 मध्ये पुण्यातून अटक केली. मन्सूरने तरुणांना पुण्यात जिहादचे धडे देण्यास सुरुवात केल्याचं पोलिसाकडून सांगण्यात आलं होतं. तसच त्यांन मानवी बॉम्ब बनण्याची तयारी केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. पुण्यातल्या तरुणांना हेरुन त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.. पण पोलिसांनी वेळीच मन्सूरला जेरबंद केल्यामुळे त्यांचे मनसूबे धुळीस मिळाले..
पुण्यातल्या आजपर्यत झालेली दहशतवाद्यांची धरपकड आणि साखळी स्फोटानंतर दहशतवाद्यांच्या रडारवर पूणे असल्याच आता समोर आलंय..

साखळी बॉ़म्बस्फोटानंतर पुणेकरांच्या मनात पुन्हा एकदा जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या आठवणी जाग्या झाल्यात.. जर्मन बेकरी चा स्फोट हा जास्त तीव्रतेचा होता त्या तुलनेत साखळी स्फोटाचा तीव्रता कमी होती.. पण असं असलं तरी वेळीच नागरिकांना असुरक्षित वाटू लागलंय..
1 ऑगस्टला झालेल्या पुणे साखळी स्फोटानंतर पुणेकरांच्या मनात पुन्हा एकदा जर्मन बेकरी स्फोटाच्या आठवणी जाग्या झाल्यायत.. 13 फेब्रुवारी 2010 ला झालेल्या या स्फोटानं केवळ कोरेगाव पार्कचं नाही तर अवघं पुणे हादरुन गेलं होता. पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणा-या कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरीला दहशतवांद्यानी लक्ष बनवलं होत.. व्हॅलेटाईंन डेच्या पार्श्वभुमिवर जर्मन बेकरी परिसर तरुणाईन फुलून गेला होता..नेमकी तीच वेळ दहशतवाद्यांनी साधली होती.. एक अनोळखी बॅग बेकरीतील कर्मचा-यांच्या निदर्शनास आली. ती संशयास्पद बॅग बेकरीच्या कॅशियरनं कामगाराला तेथून हटवायला सांगितली.. आणि त्या बॅगेला हात लावताच क्षणार्धात भीषण स्फोट झाला. हा स्फोट एवढा तीव्र होता की, त्याचा आवाज दोन ते तीन किलोमीटर पर्यंत एकू गेला होता.. तसचं या स्फोटामुळे भितींला चार बाय सहाचा खड्डा प़डला होता. जर्मन बेकरीच्या जवळच ओशो आश्रम, हॉटेल सूर्या , ज्यू समाजाचे छाबड हाऊस आहे. मुंबईत 26/11 च्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी ज्यूंच्या नरीमन हाऊसला लक्ष केलं होतं. जर्मन बेकरी परीसरात नेहमीच परदेशी नागरीकांची गर्दी असते..त्यामुळेच दहशतवाद्यांनी परदेशी नागरिकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता.... या बॉम्बस्फोटानंतर पुढे पोलीस तपासात जीकाही माहिती समोर आलीय ती अत्यंत धक्कादायक होती...जर्मन बेकरी परिसरातील सूर्या हॉटेलमध्ये 26/11 हल्ल्यातील प्रमुख दहशतवादी डेव्हीड हेडलीनं वास्तव्य केलं होतं. त्यामुळे जर्मन बेकरी स्फोटानंतर इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवादी कारवायांकडे पुन्हा एकदा सा-याच लक्ष वेधलं गेल..
पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात 18 जणांचा मृत्यू आणि सुमारे 58 जणांपेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले होते.. या प्रकरणानंतर भविष्यात अशी घटना घडू नये याची खबरदारी पुणे पोलिस घेतील अशी पुणेकरांना आशा होती..पण बुधवारी झालेल्या साखळी स्फोटामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालीय...आता तरी पोलीस प्रशासनाला जाग येणार का असा सवाल सर्वसामान्य पुणेकरांकडून केला जातोय...
First Published: Thursday, August 2, 2012, 21:59