'अग्निपरीक्षा' - मिशन मंगळ - Marathi News 24taas.com

'अग्निपरीक्षा' - मिशन मंगळ

www.24taas.com, नवी दिल्ली
 
या ब्रम्हांडात आपण एकटेच आहोत का ? की आणखीही कोणी तरी आहे या ब्रम्हांडातील एखाद्या ग्रहावर ? हा प्रश्न अनंत काळापासून माणसाला नेहमीच सतावत आलायं..त्याचं उत्तर अद्याप मिळालं नसलं तरी नासाने मंगळ ग्रहावर मात्र लक्ष केंद्रीत केलं ... येत्या ६ ऑगस्टला त्यांचं मार्स सायन्स लायब्रोटरी हे मंगळावर उतरणार आहे...पण ते उतरतांना शेवटच्या सात मिनिटांत एका क्षणाची जरी चूक झाली तरी १३ हजार ७०० कोटींचा चुरडा व्हायला वेळ लागणार नाही...असं काय आहे त्या सात मिनिटांत...आणि भारताचं मिशन मंगळ काय आहे, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न 'अग्निपरीक्षा' मध्ये करण्यात आला आहे.
 
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नासाने मार्स सायन्स लायब्रोटरी हे मंगळ ग्रहाकडं धाडलं होतं..ते लवकरच मंगळावर उतरणार आहे. पण आता या मोहिमेत भारतही मागे नाही. मंगळाचा अभ्यास करण्यासाठी भारताच्या इस्त्रोने कंबर कसलीय. आकाश संशोधनात अग्रेसर असलेली भारताची इस्त्रो ही संस्था आता मंगळ ग्रहाला गवसणी घालण्याच्या तयारीत आहे..इस्त्रोचा हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातोय.. मंगळवार एक स्पेस क्राफ्ट पाठविण्याची इस्त्रोने आता तयारी केली आहे...इस्त्रोचं स्पेस क्राफ्ट मंगळाच्या कक्षेत पोहोचल्यानंतर त्यामार्फत मंगळाचा अभ्यास केला जाणार आहे.
 
नासाने मंगळावर पाठविलेली मार्स सायन्स लॅब्रोटरी ५ ते ६ ऑगस्टच्या दरम्यान मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. मात्र इस्त्रोचं स्पेस क्राफ्ट मंगळावर उतरणार नसून ते मंगळा भोवती प्रदक्षिणा घालणार आहे. ते स्पेस क्राफ्ट २०१३च्या ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात पाठवलं जाण्याची शक्यता आहे. तसेच सप्टेंबर २०१४मध्य़े ते स्पेस क्राफ्ट मंगळाच्या कक्षेत पोहोचेल. मंगळाची छायाचित्र घेऊन ते पृथ्वीवर इस्त्रोकडं पाठविण्याचं काम त्या स्पेस क्राफ्टच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्या छायाचित्रांच्या माध्यमातून मंगळावर जीवसृष्टी आहे काय याचा शोध घेतला जाणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४५० कोटी रुपये खर्च येणार आहे..इस्त्रो जे स्पेसक्राफ्ट तयार करणार आहे ते त्याचं वजन १३५० किलो इतकं असणार आहे.. पीएसएलव्ही एक्सएलच्या माध्यमातून ते मंगळाकडं झेपवणार आहे..या प्रकल्पासाठी १८० वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत करणार आहेत.
 
मिशन मंगळच्या माध्यमातून भारताच्या अवकाश तंत्रज्ञानातील क्षमतेची कसोटी लागणार आहे. नासाचं मार्स सायन्स लॅब्रोटरी हे मंगळावर उतरणार आहे...पण ते उतरतांना शेवटचे सात मिनिट खूप महत्वाची असणार आहेत...कारण सेंकदाच्या शंभराव्या भागा एव्हडी जरी चूक झाली तरी अनेक वर्षांची मेहनत वाया जाणार आहे..विशेष म्हणजे त्या लँडिंगची जबाबदारी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका महिला वैज्ञानिकावर आहे..
 
जगविख्यात आकाश संशोधन संस्था नासाने आपल्या मार्स सायन्स लॅब्रोटरी अर्थात क्युरोसिटी रोवरच्या लॅन्डिंगच्या सात मिनिटांना सेव्हन मिनिट्स ऑफ टेरर असं नाव दिलंय. कारण याच सात मिनिटात त्या मिशनचं संपूर्ण भविष्य निश्चित होतं.
 
त्या सात मिनिटांत काय़ होईल हा प्रश्न नासाच्या वैज्ञानिकांना वारंवार सतावतोय...कारण जेव्हा नासाचं रोवर ताशी 21हजार 243 किमीच्या हायपरसोनिक वेगाने मंगळ ग्रहाच्या वायुमंडळात प्रवेश करीलं तेव्हा सेकंदाच्या शंभराव्या भागा इतक्या वेळासाठी जरी काही चूक झाली तरी हा कोट्यवधी रुपये किंमतीचा प्रोजेक्ट एक क्षणात नष्ट होवू शकतो..मंगळावर उतरतांना सुरुवातीच्या काळात हीट शिल्डचं मोठं आव्हान असतं..कारण अवघ्या सात मिनिटांत ताशी 13 हजार किलोमीटर वेगाला शून्यावर आणावं लागतं..तसेच रोवरचं वजनही अधिक असल्यामुळं नासाच्या वैज्ञानिकांची चिंता वाढली आहे..कारण नासाचं हे मिशन आजवरच्या मिशनपेक्षा फार मोठं आहे.
 
 
भारतीय कन्येनं स्विकारलंय मंगळाचं आव्हान
 

नासाच्या सर्वात आव्हानात्मक आणि सर्वात महत्वाकांक्षी योजनेच्या त्या सात मिनिटांची जबाबदारी कोणा परदेशी व्यक्तीवर नसून ती अमेरिकेती एका भारतीय वंशाच्या अनिता सेनगुप्तावर आहे...नासाच्या मार्स सायन्स लॅब्रोटरीच्या लॅन्डिंगची अत्यंत महत्वाची प्रणाली अनिता आणि तिच्या टीमने तयार केली आहे....हे एक मोठ आव्हान अनित सेनगुप्तावर आहे.
 
मंगळाच्या गेल क्रेटरवर सर्वात मोठं रोवर उतरवण्याची तयारी नासाने केलंय..पण कारच्या आकाराचं ते रोवर उतरणार कसं असं प्रश्न सतावतो आहे..कारण तिथ ३५ हजार डिग्री सेल्सियस एव्हडी प्रचंड उष्णता आहे..पण त्याचा सामना करण्यासाठी जी प्रणाली तयार केलीय ती एका भारतीय वंशाच्या वैज्ञानिक महिलेनं. मंगळच्या पृष्ठभागापासून केवळ ८ किलोमीटरच्या उंचीवर नासाच्या मार्स साईन्सं लॅबोरेटरीला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे..कारण उतरतांना त्याचा वेग ताशी साडेचारशे असणार आहे आणि तो काही मिनिटात शून्यापर्यंत आणला जाणार आहे...रोवरचा वेग कमी करण्यासाठी जी प्रणाली तयार करण्यात आलीय तिची जबाबदारी अनिता सेनगुप्ता यांच्यावर होती.
 
नासाच्या वैज्ञानिकांनी जी प्रणाली तयार केलीय त्यामध्ये जर त्यांना सफलता मिळाली तर केवळ पृथ्वीवरच नाही तर मंगळावरही नासाला आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ भविष्यात मिळणार आहे...मंगळाच्या पृष्टभागापासून अवघ्या आठ किलोमिटरच्या उंचीवर ताशी ४५० किलोमीटरचा वेग असणार आहे...तो वेग कमी करून शून्यावर आणण्यासाठी भारतीय वंशाच्या कन्येनं नासाच्या वैज्ञानिकांच्या मदतीने जगातील पहिली स्काय क्रेन प्रणाली तयार केलीय.
 
स्काय क्रेन अर्थात असं क्रेन जे एक टन वजनाचं रोवर आणि प्रचंड गुरुत्वाकर्षणचा दबाव सहज सहन करु शकेल..तसेच मंगळावरच्या वेगवान वा-याचाही समाना करु शकणार आहे.. रोवरला मंगळच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरवण्याचं महत्वाचं काम ते क्रेन करणार आहे..अनिताच्या म्हणण्यानुसार ते स्काय क्रेन मंगळाच्या पृष्ठभागापासूनचं अंतर लक्षात घेऊन आपलं काम सुरु करेलं.
 

अनिता सेनगुप्ता आणि तिच्या टीमने आजपर्यंतचं सर्वात अधुनिक रोवर आणि लँडिंग प्रणाली तयार केलीय...आणि आता मंगळ ग्रहावर सेव्हन मिनिट्स ऑफ टेरर सुरु होण्याची वेळ अगदी जवळ येवून ठेपलीय.....त्या सात मिनिटांत केवळ प्रार्थना करण्याशिवाय वैज्ञानिकांकडं दुसरा पर्याय राहणार नाही..कारण त्या सात मिनिटात सगळं काम कॉम्प्यूटर पार पाडणार आहे...त्याला ना पृथ्वीवरून कोणती कमांड देता येणार आहे ना कोणता सिग्नल पाठविता येणार आहे...ही सगळी परिस्थिती पहाता मंगळ ग्रहावर शेवटच्या काही मिनिटांत जो कठीण प्रसंग ओढवणार आहे त्याचा सामना अनिता आणि तिच्या टीमला करावा लागणार आहे....खरंतर मंगळावर सफलापूर्वक लँडिंग करण्याची जबाबदारी कॉम्प्यूटरवर आवलंबून असणार आहे.
 
नासाची ही मोहीम अतिशय महत्वाकांक्षी आहे.. जर सगळ नियोजनबद्धपणे पार पडलं तर मंगळाच्या वायुमंडळात प्रवेश केल्यावर सात मिनीटात रोवर क्यूरोसिटी मंगळाच्या कक्षेत जाईल. आणि त्याच वेळी प्रथमच आपली सिस्टीम सुरु करुन पृथ्वीवर सिग्नल पाठवेल.. पण यात सगळ काही वेळेत झालं तरचं तो सिग्नल मिळेल.
 
मंगळावर मार्स सायन्स लॅब्रोटरीला उतरवितांना ते सात मिनिट अत्यंत महत्वाचे असणार आहेत...कारण त्या सात मिनिटांत नासाच्या वैज्ञानिकांचा त्या रोवरशी कोणताच संपर्क असणार नाही...मंगळाच्या वायुमंडळात प्रवेश केल्यानंतर आणि स्काय क्रेन पृष्ठभागावर उतरल्यानंतरच मार्स सायन्स लॅब्रोटरीतील कॉम्प्यूटर ,पृथ्वीवर सिग्नल पाठवू शकणार आहे...ते लँडिंग वैज्ञानिक नियंत्रीत करु शकणार नाही तसेच स्पेसक्राफ्टशी त्यांना संपर्क करता येणार नाही..या पार्श्वभुमिवर नासाने रोवरच्या प्रत्येक भागाचं परिक्षण करण्यासाठी ५५ कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यातील कॉम्प्यूटर प्रणालीत महत्वाता बदल केला आहे.
 
नासाचं हे रोवर पहिल्यांदाच आपल्या लँडिंग दरम्यान व्हिडीओ रेकॉर्ड करणार आहे...त्यामुळे मंगळावर कशा पद्धतीने लँडिंग केलं जातं हे पहिल्यांदाच सा-या जगाला दिसणार आहे..पण मंगळावर सुरक्षितपणे उतरल्यानंतरच तो व्हिडिओ आपल्याला पहायला मिळणार आहे...लँडिंग दरम्यान तो व्हिडीओ रोवरला पृथ्वीवर पाठविता येणार नाही..त्यामुळे सुरक्षित लँडिंगला फार महत्व आहे...ही परिस्थिती पहाता नासाने त्यावर एक तोडगा शोधून काढला आहे..मंगळा भोवती फिरणा-या मार्स ऑर्बिट उपग्रहाच्यामाध्यमातून ते लँडिंगच दृष्य पहाता येणार आहे..
 

मंगळ ग्रहावर उतरल्यानंतर रोवर सिग्नल पाठविण्यास सुरुवात करील.. मंगळाच्या जमिनीवरील मातीचे सुपर हायडेफिनेशन फोटोग्राफ पाठविल...तसेच तिथल्या मातीचं परिक्षण करुन त्याची माहिती पृथ्वीवर पाठवील...त्यानंतरच मंगळावरच्या शोधाला ख-या अर्थाने मुर्त रुप मिळणार आहे..२६ नोव्हेंबर २०११ रोजी मार्स सायन्स लॅब्रोटरी मंगळाच्या दिशेनं झेपावली असून ५ आणि ६ ऑगस्टच्या दरम्यान ती मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. मंगळ ग्रहाचा अभ्यास गेल्या अनेक वर्षांपासून केला जातोय...पण प्राचिन काळापासून त्याच्या विषय़ीच्या अनेक दंतकथाही सांगितल्या जात आहे...त्याच्या रंगापासून ते त्याच्या आकारा पर्यंत अनेक तर्क वितर्क लावले गेले आहेत... पण कसा आहे मंगळ हे आता आपण पहणार आहोत.
 
मंगळ ग्रहाविषयी जसजसं संशोधन केलं जातयं तसतशी नवनवी माहिती समोर येतेय.. खगोल मंडळातील मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. मंगळ हा एक खडकाळ ग्रह असून त्याची त्रीज्या ही पृथ्वीच्या अर्धी आहे. मंगळावरच वातावरण हे विरळ आहे. तसच त्याच्या पृष्ठभागावर चंद्राप्रमाणेच अनेक विवरं आहे.चंद्र आणि पृथ्वी प्रमाणेच मंगळाचा पृष्ठभाग अनेक ज्वालामुखी, द-या, वाळवंट आणि ध्रुवीय बर्फ यांचा बनलेला आहे. य़ा भुपृष्ठीय गुणधर्मामुळेच मंगळाचा परिवलन काळ पृथ्वी सारखाचं आहे. पृथ्वीसारखेच ऋतुमान मंगळावर आढळून येतात. पण मंगळावरील वर्षाचा कालावधी पृथ्वीच्या तूलनेत दुप्पट असल्याकारणाने तिथले ऋतूही दुप्पट काळ चालतात.. सूर्यमालेतील सर्वात उंच पर्वत ऑलेम्पिस मान्सून तसेच सर्वात मोठी दरी व्हॅलेस मेरीनेनीस मंगळावरच आहे.
 
जून 2008 मध्येही झालेल्या एका संशोधनानूसार मंगळावरील एक प्रचंड विवर उघड झालयं.. मंगळ ग्रह हा नेहमीच खगोल अभ्यासकांना त्यांच्या अनेक वैशिष्ठ्यांमूळे नेहमीच आकर्षित करीत आला आहे.. पण त्याच्या लाल रंगामुळे तो खगोलसंशोधकांचा आवडता राहिला आहे. .. मंगळाच्या या लाल रंगाला भारतीय संस्कृतीत अनेक दंतकथामध्ये गूंफण्यात आलय.. पण या लाल रंगाचे रहस्य वैज्ञानिकदृष्ट्या आता उलगडू लागलय.. सूर्यमालेतील या ग्रहाला तांबडा ग्रह असेही म्हटलं जातं.. मंगळ हा ग्रह तांबड्या रंगाचा भासतो, तो त्याच्या तांबड्या पृष्ठभागामूळे.
 
हा तांबडा रंग मंगळाला कुठल्या दैवी प्रकोपानं मिळलेला नसून त्यातील रासायनिक संयोगाच्या मिश्रणानं झालाय.. मंगळ ग्रहावरील आर्यन आणि ऑक्साईड यांचा जास्त साठा आणि मिश्रण असल्यानं साहजिकच मंगळाच्या पृष्ठभागाला तांबडा रंग प्राप्त झालाय.. मंगळाला मिळालेला मार्स हा शब्दही मिथकाशी नाते सांगतोय.. रोमन मिथकांप्रमाणे मार्स म्हणजे ग्रीक युद्ध. रंगामुळे मंगळाविषयी अनेक मिथकं निर्माण झाले असले तरी मंगळावर पाणी असल्याचं समोर आल्यामुळे तिथ जीवसृष्टी आहे काय या कडे वैज्ञानिकांचं लक्ष लागून राहिलंय.
 
पाह व्हिडिओ..
 



 
 

First Published: Friday, August 3, 2012, 23:02


comments powered by Disqus