एसटीमध्ये मेगाभरती, इथे क्लिक करा - Marathi News 24taas.com

एसटीमध्ये मेगाभरती, इथे क्लिक करा


www.24taas.com, मुंबई
 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत एसटीच्या काळातील ही मेगाभरती आहे. चालक (कनिष्ठ), वाहक (कनिष्ठ), लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) आणि सहाय्यक (कनिष्ठ) या पदांकरिता ही भरती आहे.
 
 
भरतीबाबत माहिती जाणून घ्यासाठी इथे क्लिक करा. (जाहिरात)
 
ही भरती मंगळवारपासून सुरू होत असून या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून ही प्रक्रिया ५ सप्टेंबपर्यंत सुरू राहणार आहे. कागदविरहीत अर्ज मागविण्याचा हा पहिलाच प्रकार असून ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ लिमिटेड’  (mkscl) यांच्या सहाकार्याने ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबतची जाहिरातही वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 
महामंडळाच्या या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळास प्रत्येक अर्जामागे सुमारे १२३ रुपये २० पैसे परिवहन महामंडळ देणार आहे. ज्ञान महामंडळाच्या राज्यातील सुमारे १४०० केंद्रांवर तसेच राज्य शासनाच्या ‘महा ई सेवा केंद्र’ इथे उमेदवारांना आपले अर्ज दाखल करता येतील. त्याचप्रमाणे वैयक्तिक अर्जही भरून ज्ञान महामंडळाच्या संकेतस्थळावर संबंधितांना आपले अर्ज भरता येणार असून चालक आणि वाहक पदासाठी दहावी उत्तीर्ण, लिपिक आणि टंकलेखक पदासाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि सहाय्यक पदासाठी त्या त्या विषयातील आयटीआय परीक्षा उत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आली आहे.
 
परिवहन महामंडळामध्ये चालक ८,९४८, वाहक ६,२४७, सहाय्यक २,६५८ तर लिपिक तथा टंकलेखक १,९३६ इतकी पदे भरायची आहेत. अनेक वर्षांपासून महामंडळामध्ये कर्मचारी भरती करण्यात आली नव्हती. आता ऑनलाइन अर्ज मागवून ही पदे भरण्यात येत आहेत. त्यामुळे तात्काळ ऑनलाईन अर्ज करता येणे श्क्य झाले आहे. अधिक माहितीसाठी http://msrtc.gov.in  माहिती पाहता येईल.
 

First Published: Tuesday, August 7, 2012, 12:31


comments powered by Disqus