Last Updated: Thursday, August 9, 2012, 15:12
www.24taas.com, मुंबई एक काळ होता जेव्हा मोबाईल फोन केवळ कॉल करण्यासाठी वापरला जात होता...पण आता मोबाईल फोनवरून फोटो, व्हिडिओ क्लीप ,गेम्स आणि नेट बँकिंगही करता येतंय...हे नवीन फोन कॉम्प्यूटरमध्ये वापरण्यात येणा-या सॉफ्टवेअरवर आधारीत असल्यामुळे हॅकर्सचं फावलंय.
स्मार्ट फोन धारकांनो सावधान...तुमच्या फोन मधील सगळी माहिती......तुमची प्रत्येक व्हि़डिओ क्लिप ... तुमचे फोटो.. प्रत्येक कॉन्टॅक्ट नंबर....तसेच फोनमधून करण्यात आलेलं प्रत्येक नेट बँकिंग ट्रांजेक्शन... हे सगळ काही या व्यक्तीच्या हाती लागलंय....
या व्यक्तीने आतापर्यंत हजारो बँक खात्यातून रक्कम परस्पर काढून घेतलीय.अनेकांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेले खासगी क्षणही या व्यक्तीने वेबसाईटवर टाकले असून त्यामुळे त्या मोबाईल फोनधारकांना नाहक बदनामी सहन करावी करावी लागलीय...
हजारो लोकांच्या फोनमध्ये स्टोअर असलेले कॉन्टॅक्टनंबर मार्केटिंग कंपनिला परस्पर विकले आहेत..तो तुमच्या मोबाईल फोनचं सीमकार्ड क्लोन करुन एखाद्या दहशतवादी संघटनेला विकू शकतो.
स्मार्ट फोनची बॅटर लवकर डिस्चार्ज होते त्यामुळे लोक सार्वजनिक चार्जरवर मोबाईल चार्ज करतात...पण तिथंच त्यांची चूक होते. आपल्या मोबाईल फोनमध्ये स्टोअर असलेला डेटा चार्जरच्या माध्यमातून गुपचूपणे काढून घेतला जात आहे याची मोबाईलधारकाला जराही कल्पना येत नाही.
होय ...सार्वजनिक चार्जरच्या माध्यमातून चार्जिंग करत असतांना तुमचा फोन हॅक केला जाऊ शकतो....आणि त्याचाच गैरफायदा हॅकरकडून घेतला जात आहे. तेव्हा सार्वजनिक चार्जरवर स्मार्ट फोन चार्ज करण्यापूर्वी आता आम्ही तुम्हाली जी छायाचित्र दाखवणार आहोत त्याचा विचार करा.
कॉमन चार्जिंग पॉईंट अर्थात सार्वजनिक चार्जरवरुन स्मार्ट फोन चार्ज केल्य़ामुळे तुमचा मोबाईलफोन तीन पद्धतीनं फोन हॅक केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही..आणि सर्वात मोठा धोका म्हणजे तुमच्यावर 24 तास लक्ष ठेवलं जाऊ शकत.... तसेच तुमच्या बँक खात्यातील रक्कम गायब होऊ शकते....
महागड्या स्मार्ट फोनचा वापर करुन अवघी दुनिया आपल्या मुठीत घेणार असाल तर तुमचं प्रत्येक गुपीत तुमच्या मुठीतून काढून घेण्यासाठी हॅकर्सही असूसले आहेत.. कदाचित तुम्हाला ठावूक नसेल..स्मार्ट फोन हा सॉफ्टवेअरवर आधारित असून कंम्पुटर प्रमाणे तो सहज हॅक केला जाऊ शकतो..
तुमच्या फोनच्या मेमरी स्टोअर असलले बँक ट्रान्जेक्शन...जिवनातील ते प्रत्येक क्षण जे तुम्ही फोनमध्ये स्टोअर करुन ठेवले आहेत ते जराही सुरक्षित नाहीत..... पण हे सगळं काही तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही तुमचा स्मार्ट फोन चार्ज करण्यासाठी कॉमन चार्जींगचा वापर करतात.. ..
वास्तविक पाहता स्मार्टफोनच्या इनबिल्ट फंक्शनमुळे फोन लवकर डिस्चार्ज होते,आणि प्रत्येक वेळेला चार्जर सोबत ठेवणं हे सेलधारकाला शक्य होत नाही... म्हणूनच कॅण्टीन, ऑफिस, रेस्टोरंट, ट्रेनच्या एसी कंपार्टमेंटमध्ये सोय म्हणून असलेल्या कॉमन चार्जरचा वापर केला जातो....
5 PIN USB केबलच्या मदतीनं हॅकर्स कॉमन चार्जिंग पाँईंट लॅपटॉपशी जोडतात.
फोन चार्ज होत असताना हॅकिंग द्वारे डेटाची चोरी
हॅकिंगसाठी स्पाय डिव्हाईसचाही वापर
स्पाय डिव्हाईसच्या मदतीनं दूरवर बसून मोबाईल फोनचं हॅकिंग शक्य
स्पाय एप्लिकेशनच्या मदतीनं 20 सेकंदांत मोबाईल फोन हॅक
मोबाईल कंपन्या स्मार्ट फोनमध्ये जे एडव्हान्स फिचर देतात त्यामुळेच हॅकर्सना हॅकिंग करणं सोपं झालं असून फोनच्या सुरक्षिततेकडं दुर्लक्ष होत असल्याचं जाणकारांचं म्हणनं आहे..
चुक कुणाचीही असली तरी मोबाईल फोनधारकाला त्या सर्व परिणामाला सामोर जावं लागत.. तुमचा स्मार्ट फोन हॅक झाल्यानंतर 24 तास तुमच्यावर नजर ठेवली जाते.. केवळ एवढच नाही तर तुमच्या फोनचा वापर करुन एखादा मोठा गुन्हाही केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही..
मोबाईल फोन हॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ
2010
हॅकिंगची दोन प्रकरणं उघडकीस
2011
मोबाईल फोन हॅकिंगच्या प्रकरणात वाढ
मोबाईल फोन हॅकिंगच्या 39 घटना
1 वर्षात मोबाईल फोन हॅकिंगच्या घटनांमध्ये 1850% वाढ
हॅकिंगचा धोका केवळ महागड्या आधुनिक फोनला आहे असं नाही तर चीनी बनावटीचे फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे हॅक करता येतात...आणि धक्कादायक बाब म्हणजे काही चीनी बनावटीच्या इलेक्ट्रोनिक वस्तूंच्या मार्फत हेरगीरी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.जर तुमचा स्मार्ट फोन मेड इन चायना असेल तर तो कदाचीत हॅक झालाही असेल आणि त्याची तुम्हाला खबरही नसेल..
खरंतर चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या अनेक मोबाईलफोन हँडसेटमध्ये मुळातच स्पाय एप्लिकेश टाकण्यात आलेले असतात..आणि त्याच्यामाध्यमातून स्मार्ट फोन हॅक केला जातो...आपलं नाव उघड न करण्याच्या शर्तीवर एका हॅकरने ही खळबळजनक माहिती दिलीय. चायना स्मार्ट मोबाईल फोन हॅक केले जाऊ शकतात. चीनी बनावटीच्या मोबाईल फोनमध्ये आधीच वायरस टाकले जातात
चीनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तयार करतांना त्यामध्ये व्हायरस टाकण्यासाठी हार्डवेअर कंपन्यांकडून अनुदान दिलं जात असल्याचा दावा काही हॅकर्सनी केलाय...त्या वस्तू स्वस्तात विकल्या जातात आणि त्यामध्यमातून हेरगीरी केली जाते..
हॅकिंगच्या माध्यमातून हॅकर्स केवळ तुमचं बँक अकाऊंट आणि पासर्वडचीच चोरी करतात असं नाही तर स्मार्ट फोन हॅक करुन तुमचं फेसबुक अकाऊंट आणि ई मेलही हॅक करु शकतात....एखाद्या दहशतवादी कृत्यानंतर तुमच्या ईमेल वरून दहशतवाद्यांनी पोलिसांना मेल पाठवला तर तुम्हाला कोणत्या संकटाला तोंड द्यावं लागेल याचा कधी तुम्ही विचार केलाय...आता पोलिसांसमोर गुन्हेगारीचं हे नवं आव्हाण उभं ठाकलं आहे....
दिल्ली पोलिसांकडं एन्टी हॅकिंग लॅब असतांनाही मोठे गुन्हेगार आणि दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांना हॅकर्सची मदत घ्यावी लागतेय...यावरून हॅकिंगचं जाळं किती जटील आहे याचा अंदाज तुम्हाला सहज लावता येईल..
हॅकर्समुळे मोबाईल फोन वापरणा-यांची आता डोके दुखी वाढलीय...पण त्याच बरोबरच मिस्ड कॉलची चिंताही सतावतेय.......काही खास नंबरवरून येणारे मिस कॉल्स मोबाईलधारकांसाठी डोकेदुखी ठरतायेत..मोबाईल धारकही अशा मिस कॉल्सना बळी पडतायेत..तर दुसरीकडे या मिस कॉलच्या माध्यमातून एखादा दहशतवादी कट तर रचला जात नाही ना ? अशी शंका उपस्थित होतीय.
तुमच्या फोनवर जर मिसकॉल येत असेल तर तुम्ही त्याला कॉलबॅक करून प्रत्युत्तर देता...पण सावधान ! काही नंबरवरून आलेले मिसकॉल तुम्हाला चांगलेच महागात पडू शकतात...या क्रमांकावरून येणारा कोणताही मिसकॉल तुम्हाला दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकवू शकतो. जर तुम्ही या क्रमांकावर आलेल्या मिसकॉलला कॉलबॅक करण्याचा प्रयत्न केला तर...तुम्हीही संकटात सापडू शकता...जगभरात आतापर्यंत 30 लाख लोक अशा मिसकॉल्सच्या दहशतीला बळी पडलेत. एका रिपोर्टनुसार भारतातही जवळजवळ 1 लाख लोकांची या मिसकॉल्समुळे फसवणूक झालीय. या क्रमांकावरून येणा-या मिसकॉलची दहशत इतकी आहे की अनेकांना हजारो रूपयांचा फटका बसलाय. याशिवाय मोबाईलमधील सर्व डाटा, फोटो आणि व्हिडीओजचीही चोरी झालीय. फोनमध्ये ATM नंबर आणि पिन नंबर सेव्ह असल्यामुळे कित्येकांच्या बँक अकाऊंटमधून लाखोंची रक्कम गायब झालीय. पण या मिसकॉलचा सर्वात मोठा धोका आहे तो दहशतवादी कारवायांचा...यावर भारत संचार निगम लिमिटेड मुरादाबादच्या महाप्रबधकांनीही शिक्कामोर्तब केलय.
First Published: Thursday, August 9, 2012, 15:12