मोबाईलवर आता रेल्वे तिकीट बुकींग - Marathi News 24taas.com

मोबाईलवर आता रेल्वे तिकीट बुकींग

www.24taas.com नवी दिल्ली
 
रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी आता तुम्हाला रांगेत ताटकळत रहावे लागणार नाही. तसेच एजंटकडेही बुकींगसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाही. कारण भारतीय रेल्वेने आता मोबाईलवर तिकीट बुकींग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
 
भारतीय रेल्वे कॅटरींग आणि टुरिझम कारर्पोरेशन या सार्वजनिक क्षेत्रातील रेल्वेच्या कंपनीव्दारे मोबाईलवर तिकीट उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई-तिकीट बुकींग करता येणार आहे.
 
ही सुविधा ज्याच्या मोबाईलवर इंटरनेट सुविधा असेल त्यालाच याचा लाभ घेता येणार आहे. सुरूवातीला मोबाईलवर एक सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्यावे लागेल. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड केल्यानंतर सहज रेल्वेचे ई-तिकीट बुक करता येणार आहे. रेल्वेचे तिकीट आरक्षित झाल्यानंतर (बुकींग) आरक्षणाबाबत संदेश (मॅसेज) येईल. या मॅसेजमध्ये पीएनआर क्रमांक, रेल्वे गाडीचा क्रमांक आणि प्रवाशाच्या जाण्याचे ठिकाण तसेच वेळ याचीही यात माहिती असणार आहे.
 
मोबाईलवर मिळालेल्या तिकिटाची झेरॉक्स कॉपी काढण्याची गरज भासणार नाही. ही ई-तिकीट आपल्या मोबाईवर सेव्ह केले तरी चालेल. हे तिकीट प्रवासाच्यावेळी दाखविणे आवश्यक आहे. तसेच मोबाईलवर आलेला संदेश दाखविला तरी चालू शकणार आहे.
 
प्रवाशांना पहिल्यावेळी तिकीट आरक्षित (बुकींग) करताना वेळेची नोंद कऱण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आपल्या ओळखपत्राव्दारे तिकीट बुकींग करू शकता. मात्र, मोबाईलव्दारे रेल्वे तिकीट बुकींग करताना  स्लिपर क्लाससाठी १० रूपये तर उच्च श्रेणीसाठी २० रूपये द्यावे लागणार आहेत.

First Published: Wednesday, January 4, 2012, 13:40


comments powered by Disqus