Last Updated: Wednesday, January 25, 2012, 11:17
अखिलेश हळवे, www.24taas.com, नागपूर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात दारु तस्करीचं प्रमाण वाढलयं. मध्य प्रदेशात मिळणारी स्वस्त दारु नागपुरात बेकायदा आणली जातेय. या विरोधात पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागानं धडक मोहीम उघडली आहे.
दारुचा हा साठा पाहिल्यावर निवड़णुकीत काय काय अमिषं दाखवली जातात याची प्रचिती येतेय. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्या दारुची तस्करी वाढलीये. ही तस्करी रोखण्यासाठी नागपूर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागानं विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत केलेल्या कारवाईत चोरट्या दारुचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. निवडणुकीदरम्य़ान मतदारांना वाटण्यासाठी दारु आणल्याचा संशय पोलिसांनी व्य़क्त केलाय.
दारु वाटपासारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगानं कडक उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणी राजकीय वर्तुळातून होतेय. निवडणुकांच्या काळात अवैध दारुच्या तस्करीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. ही तस्करी रोखण्य़ाचं आव्हान आता पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागापुढं निर्माण झाल आहे.
First Published: Wednesday, January 25, 2012, 11:17