राणेंचा 'राजकिय वारस' कोण? - Marathi News 24taas.com

राणेंचा 'राजकिय वारस' कोण?

www.24taas.com, न्यूजरूम
 
झी २४ तासचे गेस्ट एडिटर म्हणून आलेल्या नारायण राणे यांनी दिलखुलास संवाद साधला. झी २४ तासच्या दिलखुलास चर्चेत त्यांनी पुढची राजकीय गणितंही उलगडली. नारायण राणे यांना त्यांचा राजकिय वारस कोण असणार या प्रश्नाला उत्तर देताना राणे यांनी झी २४ तास समोर नवा खुलासा केला आहे. राणे यांचा राजकिय वारसदार आणि निवडणुकीविषयी राणे यांनी झी २४ तासमध्ये महत्त्वपूर्ण वक्तव्ये केली.
 
सिंधुदुर्गात कुडाळ मतदार संघातून आपल्याऐवजी नीतेश राणे निवडणूक लढवतील असं सांगून त्यांनी सर्वांचीच उत्सुकता वाढवली आहे. स्वतः विधानसभा, लोकसभा लढवणार की निवृत्त होणार याबाबत येत्या निवडणुकीपूर्वी निर्णय घेऊ असं सांगून त्यांनी त्यांच्या पुढच्या राजकीय प्रवासाचं औत्सुक्य वाढवलं आहे. तसचं आपले राजकिय वारस हे आपली दोन्ही मुलं असतील असं सांगुन नारायण राणे यांनी मात्र चांगलीच 'गुगली' टाकली.
 
विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी म्हणजेच २०१३ मध्ये आपण पुढच्या वाटचालीबाबत निर्णय घेऊ असं राणे यांनी सांगितलं. पुढच्या वर्षी राणे आपले राजकीय पत्ते उघड करतील हे त्यामुळं स्पष्ट झालं आहे. पण त्यांची पुढची वाटचाल नेमकी कशी आणि काय असेल? याबाबतची उत्सुकता मात्र यामुळे वाढली आहे.
 
 

First Published: Sunday, January 29, 2012, 19:31


comments powered by Disqus