ठाण्यात सत्तेसाठी शिवसेनेचा जादुई आकडा - Marathi News 24taas.com

ठाण्यात सत्तेसाठी शिवसेनेचा जादुई आकडा

www.24taas.com,  ठाणे
 
 
ठाण्यात महायुती सत्तेच्या जवळ गेलीय. अपक्ष आणि बसपाच्या पाठिंब्यानं बहुमताच्या जादुई आकडा गाठण्यात यश आल्याचा दावा शिवसेनेनं केलाय. अर्थात काँग्रेस आघाडीनंही सत्तेत येण्याचे प्रयत्न सोडलेले नाहीत.
 
 
ठाण्यात महापालिकेची सत्ता आपल्याच हातात रहावी म्हणून महायुती आणि आघाडीत रस्सीखेच सुरु झालीय. त्यातच बसपा नगरसेवकांच अपहरण नाट्यही रंगलं. शिवसेनेनं संजय पांडे आणि आशा कांबळे या दोन अपक्षांनी पाठिंबा दिल्याचं जाहीर केलय. त्यामुळं महायुतीच्या ६२ जागा आणि बसपा आणि अपक्षांच्या चार जागा पाहता महायुतीच्या सत्तेच्या जवळ गेलेय.
 
 
महायुती सत्तेत येण्याची चिन्हे असली तरी काँग्रेस आघाडीनं आशा सोडलेली नाही. महापौर पदाच्या निवडणुकीला अजून वेळ आहे त्यामुळं काहीही होऊ शकतं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरेंनी जाहीर केलय. त्यामुळं महापौरपदाच्या निवडीच्या दिवसापर्यंत बहुमताचा खेळ सुरुच राहण्याची चिन्हे आहेत.  ठाणे शहरात गेली २० वर्ष शिवसेनेती सत्ता आहे. या वेळी आघाडीनं शिवसेनेला सत्तेबाहेर खेचण्यासाठी जोरदार व्यूहरचना केली होती. मात्र सर्वाधिक जागा जिंकत सेनेनं ठाणं राखलं खरं मात्र बहुमताचा जादुई आकडा गाठण्यात अपयश आल्यानं अपक्ष आणि एक दोन सदस्य असलेल्या पक्षांना महत्त्व आलं आहे.
 
पाहा व्हिडिओ

First Published: Wednesday, February 22, 2012, 09:57


comments powered by Disqus