Last Updated: Thursday, February 23, 2012, 11:30
www.24taas.com किंगमेकरालाही करावी लागणार का सत्तेसाठी तडजोड ?महापालिका निकालानंतर कसा असेल पुढचा प्रवास ?इंजिन धावेल सुसाट की निघेल नुसताच धूर ?सत्तेचा 'राज'मार्ग ! 
मनसे अध्यक्ष राज ठाकरें याना गाठायचा आहे आता विधानसभा २०१४ चा पल्ला. विधानसभेत सत्ता मिळवून महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं गुजरात करायचं असेल तर हीच वेळ आहे काही कठोर निर्णय घेण्याची. राज ठाकरे यानी माझ्या हाती एकदा सत्ता द्या साऱ्याना सुतासारंख सरळ करतो असं म्हणत मतदाराना भावनिक आवाहन केलं. ठाण्या मुंबईत शिवसेनेला, पुण्यात आघाडीला आणि नाशिकात राष्ट्रवादीला एकट्यानेच टार्गेट करत या साऱ्या महापालिकांमध्ये मनसेचा विजयश्री मिळवून देण्याचं आव्हान राज यानी लिलया पेललं असचं म्हणावं लागले.
राज्यातल्या प्रमुख महापालिकेतील मनसेचा कामगिरीही लक्षणीय अशीच म्हणावी लागेल. यावेळेच्या निवडणूकीत मनसेनं जबरदस्त कामगिरी केली असली तरी मुंबई-ठाण्यात किंगमेकर किंवा थेट किंग बनण्यातही राज यांना जमलं नाही. पक्ष स्थापना केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यानंतर आलेल्या २००७ च्या महापालिका निवडणूकीत मनसेला सात जागा मिळाल्या होत्या. त्य़ानंतर विधानसभा निवडणूकीत मुंबईत पाच आणि राज्यात तेरा जागा मिळवतं मनसेनं आपला दबावगट निर्माण करण्यास सुरुवात केली. यावेळेला मनसेच्या जागात वाढ झाली असली तरी लोकसभा आणि विधानसभाच्या निकालाचे प्रमाण लक्षात घेता तुलनेनं महापालिका निकालात त्याचा प्रभाव नसल्याचं समोर येतं आहे. आणि हि विशेष म्हणजे ही बाब खुद्द मनसेप्रमुखानीच गांभिर्याने घेतली आहे यावेळेस पक्षाचे स्वच्छ चेहरा मतदारांसमोर जावा म्हणून परिक्षा घेण्यात आल्या पण त्याच्या निकालानंतर मात्र मनसेतही बंडखोरीची लागण झाल्यचं चित्र दिसलं. राज ठाकरे यांचे नेतृत्व मानणारा कार्यकर्ता जर उमेदवारीसाठी थेट पक्षाशी गद्दारी करत असेल तर अशा बंडखोरीवर वेळीच लस देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील मनसे आमदारापैकी नितीन सरदेसाई सोडता सर्वच मनसे आमदारांची कामगिरीही साधारण राहिली आहे. शिवसेनेप्रमाणे पुन्हा एकदा सर्वच वॉर्डाची झाडाझडती आणि पुनर्बांधणी करावीच लागणार आहे. आतापर्यंत मनसेचा आलेख हा चढता राहिला आहे. आता यापुढे गुजरातवर मर्यादित विजयी झालेल्या जांगावर विकासकामाचा धडाका लावला गेला तरचं खऱ्या अर्थानं मनसेला मिशन २०१४ हा पेलवणार आहे हे मात्र नक्की.
यावेळेला ना कुठला प्रखर मुद्दा होता ना कुठलं खळ्ळ फटॅक !! तरी पण प्रत्येक शहरात केवळ एकच सभा घेऊनही केवळ राज ठाकरे या नावावर मनसेला दिमाखदार असं यश लाभलं. मत विभाजन करणारा पक्ष अशी टिका करणाऱ्यांनाच आता मत खेचणारा पक्ष अस म्हणावं लागलं आहे. मनसेच्या या विजयी वाटचालीला आता लक्ष्य लागलय ते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकीय पटलावरचं मतदारांच्या दृष्टीने विश्वासाचं नव केंद्र आणि सर्वच राजकीय पक्षांच्या प्रस्थापित वर्चस्वाला धक्का देणारा एक पक्ष हे समीकरण मराठी मतदारांवर चांगलचं आरुढ व्हायला सुरुवात झाली आहे. शिवसैनिकाच्या मनातला भावी सेनाप्रमुख असं ज्य़ा राज ठाकरेंबद्दल भरभरुन बोलल जायचं, त्याच राजनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि शिवसेनेतचं नव्हे तर चांद्यापासून बांद्यापर्यतच्या शिवसैनिकांमध्ये विचारांचीच दुफळी माजली. शिवसेनेला बडव्यानी घेरलं आहे असा आरोप करत बंडखोर राज ठाकरे यानी शिवसेनेला पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. पक्षाच्या सुरवातीच्या सभेपासून वातावरण निर्मिती करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टिकास्त्र सोडण्यास सुरुवात केली. २००७च्या महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्या आणि मनसेनं जोरदार हवाही निर्माण केली. पण निष्ठावंतानी मनसेला नाकारत केवळ सात जागांवर विजय मिळवून दिला. त्यावेळी साऱ्यानीच मनसे संपली हो अशी हाकाटी पीटायलाही सुरुवात केली. पण संपलय संपलय असं वाटत असतानाच लोकसभेच्या निवडणुकीत मनसेनं शिवसेनेला तडाखा दिला. आणि मुंबईतून शिवसेनेच्या सर्वच जागांवर पराभवाच तोंड पाहावं लागलं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेन आपले तेरा आमदार पाठवून आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली. त्यानंतर मात्र मनसेनं हळूहळु साऱ्याच सत्ताकेंद्रामध्ये आपला शिरकाव करायला सुरुवात केली.
दोन महिन्यापुर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही मनसेनं आपली खाती उघडायला सुरुवात केली. यानंतर मात्र साऱ्यांचच लक्ष लागलं ते मुंबई ठाण्याच्या महानगरपालिकेत मनसे काय चमत्कार करते याच्याकडे. आणि शिवसेनेसह राष्ट्रवादीला टार्गेट करत मनसेप्रमुखानी एकहाती प्रचाराच मैदान मारायला सुरुवात केली. आणि त्याचे पडसाद या निव़डणुकीत उमटलेच. जी मनसे गेल्या निवडणुकीत राजकीय विश्लेषकांना नगण्य वाटत होती तीच मनसे यंदाच्या निवडणुकीत ठळक वैशिष्ट्य ठरली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यावेळच्या निवडणुकीत जबरदस्त कामगिरी करत पक्षाचा आलेख उंचावता नेला आहे. २००७ मध्ये मुंबईत सात जागांवर असलेली मनसे २०१२ मध्ये २८ जागांवर पोहोचली. ठाण्यात तीन नगरसेवक यंदा सात झाले आहेत. पुण्यात मागच्या निवडणूकीत ८ जागांवर विजयी असणारी मनसे यंदा २९ जागांवर किंगमेकर बनली आहे. तर यंदा पहिल्यांदाच खातं खोलंत पिंपरी चिंचवड मध्ये चार जागा, उल्हासनगरमध्ये १ आणि नागपूरमध्ये दोन जागांवर विजय मिळवला आहे. तर नाशिकमध्ये सर्वच पक्षाना दणका देत मागच्या वेळचा १२ आकडा यावेळेला तब्बल ४० वर गेला आहे. राज ठाकरे यानी प्रचाराची एकहाती धुरा सांभाळत निवडणूकीचा पेपर दिला. जनतेसमोर खुल्या मुलाखतीला सामोर गेलेल्या राज ठाकरेंच्या प्रगतीपुस्तकात जनतेनं उत्तम प्रगतीचा शेरा मारला आहे. या सर्वात आता लक्ष लागलं आहे ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कशी असेल पुढची वाटचाल याचचं.
First Published: Thursday, February 23, 2012, 11:30