Last Updated: Friday, February 24, 2012, 17:15
www.24taas.com, नाशिक नाशिक महापालिकेत नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये २० पेक्षा जास्त जण बांधकाम व्यावसायिक आहेत. तर काही नगरसेविकांचे पती ठेकेदार आहेत. पन्नासहून अधिक नगरसेवक करोडपती आहेत. आता त्यांच्या हातात शहराचे भवितव्य आहे.
काँग्रेसचे उद्धव निमसे जन्मजात कोट्यधीश आणि शरहात सर्वाधिक संपत्ती असलेले नगरसेवक आहेत. ते बांधकाम व्यावसायिक असून द्राक्ष निर्यात आणि भूखंड खरेदी-विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. मनसेचे हेमंत गोडसे, गणेश चव्हाण, शिवसेनेचे विलास शिंदे, शिवाजी सहाने, विनायक पांडे, काँग्रेसचे शिवाजी चुबळे, डी.जी. सुर्यवंशी बांधकाम व्यावसायिक आहेत. आपली मालमत्ता पिढीजात असल्याचं उद्धव निमसे यांनी स्पष्ट केलय.
काही नगरसेविकांचे पती ठेकेदार आहेत. शहराच्या विकासात नव्यानं निवडून आलेल्यांनी योगदान द्यावं अशी अपेक्षा नाशिककरांची आहे. शहराच्या पुररेषेतली अतिक्रमणे, पार्किंग, नाल्यावर बांधकामे, टीडीआरमधले घोटाळे यात बांधकाम व्यावसायिक आघाडीवर आहेत. त्यामुळं आता हे लोकप्रतिनिधी बिल्डरांना साथ देतील की शिस्त लावतील हे पाहणे महत्त्वाचं आहे.
व्हिडिओ पाहा..
First Published: Friday, February 24, 2012, 17:15