ऑन ड्युटी पोलीस 'फुल्ल टाईट' - Marathi News 24taas.com

ऑन ड्युटी पोलीस 'फुल्ल टाईट'

झी २४ तास वेब टीम, ठाणे
 
पोलीस म्हणजे रक्षक पण आता मात्र हेच पोलीस रक्षक नसून भक्षक होत आहे. त्यांना आपल्या ड्युटीवर असण्याचा विसर पडेलेला दिसून येतो. ठाण्यातल्या राबोडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर काम करणाऱ्या एका मध्यधूंद पोलीस अधिकाऱ्याला असाच काही विसर पडलेला दिसून येतो.
 
ठाण्यातल्या राबोडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर काम करणाऱ्या नाना झगडे चक्क दारु पिऊन ड्युटीवर होता. केवळ दारु पिऊनच होता असं नाही तर नशा इतकी चढली होती की त्याचा पायही ताळ्यावर नव्हता. अर्थात कॅमेऱ्यात आपण कैद होत आहोत हे दिसताच त्यानं पोलीसी धाक दाखवायला सुरुवात केली. पाय लटपटत असताना पोलिसाचा रुबाब दाखवणाऱ्या या अधिकाऱ्याची  अवस्था पाहिली तर पोलीस मदत केंद्रात उभं राहण्यासाठी त्यालाच मदतीची गरज असल्याचं दिसून येत होतं. हा झिंगलेला अधिकारी जनतेला काय मदत करणार ? हेच यावरून दिसून येतं. त्यामुळे पोलीस ठाण्यात हे काय चाललंय हे गृहमंत्री आर आर पाटील पाहतील आणि त्याची दखल घेतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

First Published: Monday, November 7, 2011, 16:24


comments powered by Disqus