Last Updated: Thursday, March 1, 2012, 23:33
www.24taas.com, मुंबई
मुंबई आणि परिसरात पसरलीय मंकी मॅनची दहशत,मुंबईच्या वेशीबाहेरच्या उपनगरातून वाड्या-वस्त्यावस्त्यांच्या छपरांवरून मंकी मॅनची ही दहशत आता थेट उच्चभ्रुंच्या सोसायट्यात पसरलीय.एकीकडे पोलीस जीव तोडून सांगतायेत की ही अफवा आहे मात्र शांतता भेदत जाणा-या किंकाळी प्रमाणे ही अफवा वेगाने पसरतेय. होय.. उपनगरासह मुंबईवर सध्या एकं नव्या संकट त्यांच्या छपरावरुन, झाडांवरुन घोंघावतय.. कुणी म्हणतय तो मंकीमॅन आहे, कुणी म्हणतात ती नरभक्षक आदिवासी टोळी आहे. कुणी म्हणतात ती चड्डी बनियान टोळी आहे.. गजबजलेल्या मुंबापुरीला रात्र रात्र जागवणारं मुंबईच्या वेशीबाहेरचं संकट आता मुंबईत येवून धडकलय... गेले दोन महिने भांडुप - ठाण्यामधले रात्र रात्र जागतायत, आता तिच वेळ मुंबईकरांवर आलीय.. पण हे नेमंक का घडलं.. य़ा अफवा एवढ्य़ा विलक्षण वेगानं फिरतायत कि वा-याचा वेगही थिटा पडावा.. बाता सा-याच करतायत.. पण प्रत्यक्षात मात्र कुणीही मंकीमॅनला पाहिलं नाही की कुणालाचं अंगाला ग्रीस लावून मुल पळवणारी टोळी दिसली नाही.. अवघ्या मुंबईभर पसरलेल्या सिसीटिव्हीच्या फुटेजमध्ये तरी किमान त्या संशयिताची दृष्य का दिसत नाही एवढाही विचार तर्काच्या पातळीवर कुणी का करत नाही.. पण एक मात्र नक्की कालपर्यंत झोपड्याच्या पत्र्यावर ऐकू येणा-या आवाजांच्या अफवा उच्चभ्रुच्या अपार्टमेंटमध्ये आल्यावर आता याची तीव्रता जास्त झालीय..तरीपण एक प्रश्न अजुनही कायम राहतोच.. नेमंक काय आहे यामागंच सत्य ? तो आक्राळ विक्राळ आहे.काळाकभिन्न आहे तो रक्तपिपासू आहे,तो कैक फुटांवरून उडी मारी शकतो, तो हातात सापडूच शकत नाही, ...ते अंगाला ग्रिस लावून येतात ते आदिवासी आहेत, लहान मुलांच्या किडन्या काडून फस्त करतात,अशी रसभरित वर्णन मंकी मँन आणि चोरांच्या बाबतीत रंगवुन रंगवुन सांगितली जातायेत. या अशा अफवाना वेळीच लगाम घालण्याची जबाबदारी आता आपणा सर्वांवर आलीय गेले महिनाभर कथित मंकी मॅननं मुंबईकरांची झोप उडवलीय.... भांडुपमधून सुरु झालेल्या अफवा मग वा-यासारख्या मरोळ, गोरेगाव, कांदिवली अशा मुंबईभर पसरल्या आणि नागरिकांमध्ये दहशत वाढली..... मंकी मॅन आहे कसा, तो कसा हल्ला करतो याबाबत नागरिकांत वेगवेगळी चर्चा आहे.... त्याला पाहिल्याचा दावा करणारा कुणी पुढे येत नाही.... पण कुणाकडून आलेल्या माहितीवरून मंकी मॅनचं वर्णन मात्र रंगवून सांगितलं जातं.... त्यामुळे परिसरात दहशत वाढते आणि लोक दिवसरात्र डोळ्यात तेल घालून पहारा देतात..... चोरीचे प्रकार वाढल्यानंतर झोपड्यांवरून उड्या मारून जाणारे चोर कुणीतरी पाहिले आणि त्यातूनच मंकी मॅनच्या अफवांचा बाजार सुरु झाला. पुढे या अफवांनी मुंबईकरांनी इतकी धडकी भरवली की सध्या मुंबईकरांच्या डोक्यावरून मंकी मॅनचं भूत उतरायला तयार नाही..
कांदिवलीत या अफवेमुळे तरुणांना जीव गमवावा लागला.... मंकी मॅनला शोधण्यासाठी घराबाहेर गेलेला तरुण पाय घसरून पडला आणि त्याचा हकनाक बळी गेला.... मंकी मॅन म्हणजे निव्वळ अफवा असल्याचं पोलिसांनी कितीही सांगितलं तरी सगळीकडे सुरु असलेली चर्चा आणि मोबाईलवरून येणारे एसएमएस यामुळे मंकी मॅनची दहशत रोज वाढतेच आहे.... जागरण करून पहारा देणारे लोक कधी कधी संशय आला तर एखाद्या व्यक्तीला बेदम मारहाण करतात.... अशा अनेक घटना महिनाभरात घडल्यात.... केवळ अफवांनी धास्तावलेल्या नागरिकांना पोलिस दिलासा देऊ शकलेले नाहीत..... त्यामुळे आता या अफवा पसरवणा-यांनाच पायबंद घालण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.... मुंबईकरांनीही अफवांवर विश्वास न ठेवता चर्चेची शहानिशा करायला हवी.... अन्यथा मंकी मॅनच्या अफवा पसरवणारे बाजूलाच राहतील आणि निष्पाप लोकांचे हकनाक बळी जातील..... सुरुवातीला केवळ भांडुप-ठाण्याची दहशत आता मुंबईभर घोंघावतेय.. ज्या भागात या अफवा आहेत, त्याच भागातून आता नवीन अफवा पसरवली गेली आणि या आदिवासींच्या दहशतीचे आणि बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये राहणा-या आदिवासी बांधवाबद्दल गैरसमज पसरवण्याचं गैरकृत्य सुरु झालयं.. पण टॉवरर्सच्या या शहरात स्थानिक भुमीपुत्रांना कमी लेखण्याचे दृष्कृत्य करणं म्हणजे या मातीशी गद्दारी होईल.. संजय गांधी नॅशनल पार्कच्या परिसरातल्या गावांमधल्या आदिवासी ग्रामस्थांनीही या अफवांच खंडन केलय, आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यानी त्यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात... भिती, असुरक्षिततेची भावना माणसाला हिंसक आणि अविचारी बनविते त्याला अफवांची जोड असली तर मग काय विचारायलाच नको, कदाचित म्हणुनच जे मुंबईकर एरव्ही सहनशिल म्हणुन आळखले जातात त्यांच्या सहनशिलतेचा बांध फुटलाय मंकीमँन आणि चोर समजुन अनेकजण पहारा देणा-या मुंबईकारांच्या संतापाचे बळी ठरतायेत सा-या मुंबईभर फिरणारी हि तीच चित्रफित आहे जी पाहताक्षणी जमावाच्या कौर्याची जाणीव होईल.. पण हा जमाव एवढा का अमानुष झालाय त्याचं कारण आहे, अवघ्या मुंबईकरांना भयग्रस्त बनवणारी मंकी मॅनची दहशत.. मुलूंडमध्ये झाडाला बांधलेला हा तरुण चड्डी बनियान टोळीचा सदस्य असल्याचा संशय आला म्हणून या जमावानं प्रक्षुब्ध होतं त्याला मारहाण केली.. तपासाअंती मात्र तो तरुण मनोरुग्ण असल्याचे समोर आलं..--
पण सेंकदाचाही विचार करणारे मुंबईकर आज एका क्षणात बेभान का झाले याचं कारणही तेवढच महत्वाचे आहे. भांडुप- कांजुरमार्गमधुन सुरु झालेल्या या अफवा आता सा-या मुंबईभर पसरु लागल्यायत.. भांडुप. मुलुंड,घाटकोपर,ठाणे, कळवा, चेंबुर, जरीमरी, आप्पापाडा, अंधेरी,मरोळ, डोंगरी,बोरिवली अशा मुंबईच्या उपनगरासह सर्वच भागात या अफवा बेमालुम पसरतायत.. आणि म्हणूनच मुंबईकर रात्र रात्र जागून पहारा देतायत.. मंकी मॅन, चड्डी बनियान टोळी, रक्त पिणारी टोळी, अंगाला ग्रीस लावलेली टोळी या अशा टोळ्या आहेत की नाही ठावूक नाही, मुंबईकरांमध्ये अफवा पसरवणारी टोळी मात्र जोरात आहे.. आणि म्हणूनच रात्रीचा अंधाराचा फायदा कोणी घेऊ नये म्हणून घरासमोरचे दिव्याबरोबरच आता झांडावरही फ्लडलाईट लावून रात्र जागवल्या जातायत. गेले दोन महिने दहशतीखाली जगणा-या मुंबईकराना आता या केवळ अफवा आहेत एवढा दिलासा नकोय तर त्याना हवाय प्रत्यक्ष सोक्षमोक्ष ! एकदा अफवांच पिक आल की त्यावर इमले चढवणा-यांची कमी नसते मात्र अशा वातावरणाचा पायदा घेणारेही कमी नाहीत चड्डी बनियन गँगच्या दहशतीचा फायदा घेण्यासाठी पुढे येणा-यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळायला सुरूवात केलीय. मात्र या अफवांना लगाम लागत नाही तो प्रर्यंत ही अनामिक भिती मुंबईकरांचा पाठलाग सोडणार नाही हे निश्चित. मुंबईच्या सागरी सिमेवरची असुरक्षितता आता मुंबईकरांच्या घरादारावरच येवून बसलीय. कोणाच्या तरी बुद्धीतून निघालेल्या मंकी मॅन आणि चड्डी बनियान टोळीच्या बागुलबूवानी आता अफवानी सा-या शहरात दहशत माजवलीय.. या केवळ अफवा आहेत यात कुठलंच दुमत नाहीय.. पण याचा गैरफायदा घेऊनही काही टोळ्या शहरात सक्रीय झाल्यायत का याचा पोलीस शोध घेतायत.. यासंदर्भात कुठली गॅंग सक्रिय असल्यास तीचा शोध घेतला जाईल अशी थेट भूमिका गृहमंत्री आर आर पाटील यानी घेतलीय. आतापर्यत मुंबई पोलिसांनी सात जणांना यासंदर्भात ताब्यात घेण्यात आलय़. शहरभर वाढत चाललेली दहशत आणि नवनव्या अफवा यामुळे पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत
एवढ्या मोठ्या मुंबईतल्या सा-या संशयास्पद घडामोंडीवर आणि त्याहुनही महत्वाचे म्हणजे अफवा पसरवणा-याना लगाम घालण्याची जबाबदारी हि आता सर्वसामांन्यावरही येवून पडलीय.. या अफवा जर आपण वेळीच थांबवल्या तरच या तथाकथित मंकी मॅनच्या दहशतीचे दहन होईल हे मात्र नक्की..
First Published: Thursday, March 1, 2012, 23:33