Last Updated: Tuesday, March 6, 2012, 00:14
www.24taas.com
उत्तरप्रदेशचा कौल कुणाच्या बाजुने ?मुलायमची सायकल जिंकणार का सत्तेची शर्यत ?जखडला जाणार का माय़ावतींचा हत्ती ?कामी येणार का राहुलचा करिष्मा ? यु.पी.चं महाभारत समाजवादी पक्षाची काय आहे किमया???
समाजवादी पक्षाच्या मुलायमसिंग यादव यानीही यावेळेला सत्ता आणायचीच याच हेतूने प्रचारयंत्रणा राबवली. स्टार प्रचारक म्हणुन अखिलेश यादव यांच्या रॅली सभानी समाजवादी पक्षाला पुन्हा संजीवनी लाभलीय. पण या निमित्ताने जर समाजवादी पक्षाची सत्ता आली तर अखिलेश यादवच्या रुपाने राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात एक नवा चेहरा मिळणार आहे.
२०१२ च्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून ते मतमोजणी होईपर्य़ंत उत्तरप्रदेशचं राजकिय चित्र विलक्षण झपाट्याने बदललं गेल. आणि म्हणूनच उत्तर प्रदेशच्या सत्तेचा प्रबळ दावेदार म्हणून समाजवादी पक्षाकडे पाहिलं जातं.२००७ च्या निवडणुकीत युपीची सत्ता बसपाकडे गेली अन ९८ जागांवर सपाला समाधान मानावं लागलं होतं. य़ावेळी मात्र बदललेल्या समिकरणांचा फायदा घेत बसपाच्य़ा हत्तीला अंकूश लावायचाच याच इराद्यानं समाजवादी पार्टी रिंगणात उतरल्याचं चित्र दिसतं. मुलायमसिंग यांना गेली पाच वर्ष सत्तेबाहेर राहणं आणि मायावतीचं राजकारण पाहणं याच्याशिवाय कुठलाच पर्याय नव्हता. पण मतदानोत्तर चाचणीतून सपाला बहुमत आणि त्रिशूंक अवस्था असे पर्याय समोर येत असल्याने समाजवादी पक्षाच्या भुमिकेकडे विशेशत्वाने लक्ष दिलं जातं.
या निवडणुकीत समाजवादी पक्षाला यश मिळाल्यास मुस्लीम मतांचा पर्याय म्हणून मुलायमसिंग याचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होईल आणि त्याचवेळी पारंपारिक मुस्लीम मत खेचणारा पक्ष ही ओळख कॉंग्रेसला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत डोकेदुखी ठरेल. यावेळच्या प्रचारात समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव हे खऱ्या अर्थाने स्टार प्रचारक राहिले. भाजपचे गडकरी, कॉंग्रेसचे राहूल गांधी यांच्या तुलनेत अखिलेशची मतदारांवर छाप जास्त पडली. त्याचा करिष्मा पक्षाला तारणार का हे जरी निकालानंतरच स्पष्ट होणार असले तरी राहूल गांधी विरुद्ध अखिलेश यादव अशी स्पर्धा रंगली. अर्थात समाजवादी पक्ष जर हि निवडणूक जिंकला तर अखिलेश यादव यांच्या रुपाने राहूल गांधीना एक नवा तरुण विरोधक पाहाय ला मिळणार आहे. सत्ता आल्यास अखिलेश मुख्यमंत्री होतील अशी चर्चा असली तरी मुलायमसिंगच्या यांच्यावरच शेवटचा निर्णय अवलंबून असेल.. पण असं असलं तरी, मतदारानी जर समाजवादी पार्टीला नाकारलं तर कॉंग्रेसच्या मदतीला धावण हा एकच पर्याय उरतो आणि जर असं झाल्यास २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसा ठी समाजवादी पार्टीची वाटचाल ही फार खडतर असणार आहे.
राहुल गांधी उत्तरप्रदेशात मिळवणार का सत्ता -
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा निकाल जसा देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा असेल तसाच तो कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्याही राजकीय वाटचालीची दिशा ठरवणारा असेल. उत्तर प्रदेशात मरगळलेल्या काँग्रेसला नवजीवन देण्याचे प्रयत्न राहूलबाबांनी केलाय. या प्रयत्नाना कितपय यश मिळतय यावरच राहूलबाबांच्या नेक्स पीएम पदाच्या स्वप्नाला उभारी मिळणार आहे.
कॉंग्रेसचे आगामी काळातले पंतप्रधानपदाचे उमेदवार अशी प्रतिमा निर्माण करण्यात आलेले राहूल गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशच्या प्रचाराची धूरा सोपण्यात आली होती. राहूल गांधी यानी यावेळी अतिशय आक्रमकपणे प्रचार करत अवघा प्रदेश घुसळून काढला. यावेळी युवराज एकटे नव्हते, सोनिय़ा गांधी आणि प्रियांका गांधी या दोघानीही रॅलीचा धडका देत राहूल गांधीनी मायावतीच्या हत्तीला आव्हानं दिलं. मायावती यांच्या एककल्ली कारभार मोडून काढण्यासाठी कधी गरीबांच्या घरात जावुन तर कधी भुमी अधिग्रहण रॅलीच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करत राहूल गांधीनी आपल्या मिशन युपीची सुरुवात केली होती. राहूल गांधीनी आपल्या प्रचारसभांमधुन मायावतीच्या कारभारावर आसूड ओढले.
तर उत्तरार्धात मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. विकासाच्या मुद्यावर भर देताना त्यानी तरुण वर्गाला मोहिनी घालण्याचा प्रयत्न केला. राहूल गांधीच्या सभा आणि रोड शोजला गर्दी झाली खरी पण याचं निकालात परिवर्तन होणार का खरा प्रश्न आहे. या निवडणुकीत कॉँग्रेस १०० किवा त्यापेक्षा अधिक जागा जिंकू शकली, तर आतापर्यंत युवराजाच्या भूमिकेत असलेले राहूल गांधी कॉंग्रेसचे किंग बनतील आणि २०१४ च्या लोकसभा राहुलच्याच नेतृत्वाखाली लढल्या जाणार, हे स्पष्ट होईल
कॉंग्रेस ६० ते ७० जागांच्या आसपास मजल मारु शकली तर, पक्षाच्या नेतेपदाच्या दिशेने होत असलेला राहूल गांधीचा वेग किंचीत मंदावेल, त्याना अधिक गृहपाठाची गरज असल्याचा मुद्दा पुढे येईल. कॉंग्रेस जेमतेम ३०-४० जागा जिंकू शकली तर पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर खापर फुटेल. पक्षातून राहूल गांधीवर थेट टिका झाली नाही तरी प्रियांका गांधीच्या पर्यायाची चर्चा सुरु होईल. गेल्या २२ वर्षात पहिल्यांदाच कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा एखाद्या नेत्याने एकहाती वाहिली. राहूल गांधीनी त्यासाठी जवळपास १५० सभा घेतल्या. मात्र १९८९ मध्ये गमावलेली उत्तर प्रदेशमधली सत्ता पुन्हा मिळवण्यात ते यशस्वी होतात का, यावर राहूल गांधीचं राजकीय भवितव्य अवलंबून राहिल हे मात्र नक्की...
'माया'वतींची 'माया' त्यांना बुडवणार का?
उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यातलं मतदान झालं आणि मायावती आणि झाकोळलेल्या हत्तीवरच पडदेही उठवले गेले. ७ जानेवारीपासून बंदिस्त असलेल्या या हत्तीच्या आणि मायावतींच्या मुर्ती आता तरी मोकळा श्वास घेत आहेत. पण खरा प्रश्न हा आहे कि, जर उत्तरप्रदेशच्या जनतेनं यावेळी मायावतीना नाकारलं तर मग या मुर्त्यांचं काय करणार ? अतिशय साधासोपा वाटतं असणारा हा प्रश्न निवडणुकीनंतर मात्र जटील बनणार आहे. उत्तर प्रदेशच्या २०१२ च्या नव्या निकालाचा प़डदा उघ़डायला काहीचं अवधी उरला असला तरी कापडाआड बंद असणाऱ्या हत्तीनी मात्र मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली. ५६ दिवसानंतर आचारसंहितेच्या बडग्याने मायावतीच्या ९ आणि हत्तीच्या तब्बल १५६ मुर्तीवरंच आच्छादन काढलं गेलं. मतदारराजानं दिलेल्या कौलाचा विचार करुनच या मुर्त्यांचं आणि बसपाचे भवितव्य ठरणार आहे.. २००७ मध्ये समाजवादी पक्षाच्या नाकर्तेपणाचा मुद्दा जोरानं रेटंत मायावतीनी उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याची एकहाती सत्ता मिळवली. ४०३ सदस्यबळ असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभेत २०६ चा आकडा गाठत उत्तर प्रदेशच्याच नाही तर देशाच्या राजकारणात मायवतीनी आपलं स्थानं बळकट केलं.. दलित कार्डचा प्रभावी वापर करताना समाजातल्या ब्राम्हण घटकाला आपल्यासोबत घेण्याचं कसबही मायावतीनी यशस्वी करुन दाखवलं. उत्तर प्रदेशच्या राजकारणात दलित मतांना एकगट्ठा करत मागील निवडणुकीत मायावतीनी राजकीय चमत्कार घडवला. पण यावेळेला मात्र पुन्हा परिस्थीती बदलल्याचं चित्र दिसतं. बसपाने सर्वच्या सर्व म्हणजेच ४०३ जागांवर उमेदवार देताना उघडा हत्ती लाखाचा आणि झाकलेला हत्ती सव्वा लाखाचा अशी टिपणी खुद्द मायावती यांनी केली होती. निवडणूकामध्ये उमेदवार देताना मायावती यानी जातीची गणितं कसोशीनं पाळल्याचं चित्र दिसतय.यावेळीही दलित कार्ड वापरताना अन्य कार्डाचांही मायावतीनी खुबीनं वापर केलाय. दलित, जाख, सवर्ण, मुस्लीम या सर्व मतांसाठी मायावतीनी व्यवस्थित बेगमी केल्याचं चित्र दिसतयं.. पण असं असलं तरी मायावती यांच्या समोरची यावेळची आव्हानं फार मोठी आहेत. यावेळेला मतदानोत्तर चाचण्यामध्ये ८३ ते १०१ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. कॉंग्रेसचे युवराज राहूल गांधी यानी मायावतीवर केलेली चौफेर टिका ही कॉंग्रेसला फाय़देशीर नसली तरी समाजवादी पक्षानं मात्र त्याचा व्यवस्थित वापर करुन घेतल्याचं चित्र दिसत आहे. तर त्याचवेळेला सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांची रॅली देखील मायावती याना डोकेदुखी झाली. त्यातचं भाजपच्या उमा भारती यांच्या सभाही मायावतीना टार्गेट बनवणाऱ्या ठरल्यात. या साऱ्या राजकीय धुळवडीत विरोधाकंडे घोटाळ्याचा कुठलाच मद्दा नसला तरी मायावतीच्या पुतळ्याचा मुद्दा मात्र बसपाला महागात पडण्याची चिन्ह आहेत. अर्थात यावेळेलाही उत्तर प्रदेश की बेटी असं म्हणत ममता बॅनर्जी पॅटर्न जर पुन्हा यशस्वी झाला तर विरोधकांची २०१४ साठी डोकेदुखी वाढेल आणि त्याचवेळेस मायावतीचे पुतळेही...
First Published: Tuesday, March 6, 2012, 00:14