मध्य रेल्वेला 'कोणी नव्या ट्रेन देतं का ट्रेन'? - Marathi News 24taas.com

मध्य रेल्वेला 'कोणी नव्या ट्रेन देतं का ट्रेन'?

www.24taas.com, मुंबई
 
1. उपनगरीय रेल्वेचा सर्वात जास्त विस्तार असलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना रेल्वे अर्थसंकल्पातून खूप अपेक्षा आहेत. लोकल गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्याची दरवर्षीची मागणी नेहमीच अपुरी राहते. उपनगरीय भागाचे डीसी ते एसी विद्युत परिवर्तन पूर्ण होण्याची गरज आहे. हे झाल्यास अनेक समस्या सहज सुटतील.
 
2. छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून कसारा,खोपोली आणि पनवेल असा मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेचा प्रचंड विस्तार आहे. या विस्तारामुळे लोकल सेवा ठाणे, रायगडसह नाशिक जिल्ह्याच्या सीमेजवळ पोहचली आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
 
3. लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची गरज आहे. कसारा-खोपोलीमार्गावर लोकलची संख्या वाढवण्याची गरज आहे. गर्दीच्या वेळी ठाणे ते कर्जत-कसारा दरम्यान लोकल सुरु झाल्यास गर्दीचा बराचसा भार कमी होणार आहे.
 
4. पश्चिम रेल्वेप्रमाणे १५ डब्यांच्या लोकल सुरु झाल्यास त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. गर्दीच्या वेळी महिला विशेष लोकलची संख्या वाढवण्याची मागणी गेली कित्येक वर्ष होते आहे. डीसी ते एसी विद्युत परिवर्तन पूर्ण झाल्यास जादा लोकल चालवणे शक्य होणार आहे.
 
5. सीएसटी- कल्याण आणि सीएसटी- पनवेल असा नवीन उन्नत रेल्वेमार्गाचा आराखडा मध्य रेल्वेने तयार केला आहे. अर्थसंकल्पात याला मान्यता मिळून आर्थिक तरतूद झाल्यास भविष्यात गर्दीचा भार बराचसा कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे यावेळी काही पदरात काय पडते  अशी ३५ लाख रेल्वे प्रवासी अपेक्षा ठेवून आहेत.
 
 
 

First Published: Tuesday, March 13, 2012, 18:46


comments powered by Disqus