Last Updated: Wednesday, March 14, 2012, 08:17
www.24taas.com, अकोला अकोला जिल्हा सरकारी रुग्णालयात स्त्री अर्भकाला फेकून दिल्याप्रकरणी एका वॉर्डबॉयला अटक केली आहे. या रुग्णालयाच्या परिसरात एका स्त्री अर्भकाचे कुत्र्याने लचके तोडल्याचे वृत्त झी २४ तासने चार दिवसांपूर्वी दाखवलं होतं. त्यानंतर खडबडून जागी झालेल्या प्रशासनानं प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणी पोलिसांनी कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या राजू सिरसाटला अटक केलीय. स्त्री अर्भकाच्या पित्यानेच पैसे देऊन अर्भकाची विल्हेवाट लावण्यास सांगितल्याची कबूली राजूनं दिली.
मात्र दारुच्या नशेत अर्भकाची विल्हेवाट न लावता रुग्णालय परिसरात फेकून दिल्याचं राजूनं पोलिसांना सांगितलंय. आता प्रकरणाचा छडा लावण्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
First Published: Wednesday, March 14, 2012, 08:17