सुरेशदादांना अटक ही खडसेंची चाल? - Marathi News 24taas.com

सुरेशदादांना अटक ही खडसेंची चाल?

www.24taas.com, जळगाव
 
जळगावच्या घरकुल घोटाळाप्रकरणी शिवसेना आमदार सुरेश जैन यांना झालेली अटक म्हणजे भाजप नेते एकनाथ खडसे यांची राजकीय खेळी आहे, असा घणाघाती आरोप जैन यांच्या वतीनं करण्यात आला आहे. अटकेनंतर सुरेश जैन यांच्या कॅम्पमधून झालेला हा पहिला प्रतिहल्ला आहे. सर्वप्रथम झी २४ तासवर दिली  जात आहे.
 
विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेला मुलाचा पराभव हा एकनाथ खडसे यांच्या जिव्हारी लागला होता आणि या पराभवाचा वचपा काढण्यासाठी घरकुल घोटाळ्याचं राजकारण केलं जातंय, असा आरोप सुरेश जैन यांचे बंधू आणि जळगावचे माजी महापौर रमेश जैन यांनी केलाय.
 
जळगावमधल्या २९ कोटी रुपयांच्या घरकुल घोटाळा प्रकरणी सुरेश जैन यांना शनिवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची मालमत्ता जप्त करावी अशी मागणी एकनाथ खडसे यानी केली होती. खडसे यांच्या या हल्याला जैन कॅम्पच्या वतीनं पहिल्यादांच उत्तर दिलं जात आहे.

First Published: Thursday, March 15, 2012, 15:08


comments powered by Disqus