नक्षलवाद का झाला रक्तरंजित? - Marathi News 24taas.com

नक्षलवाद का झाला रक्तरंजित?

www.24taas.comमुंबई/गडचिरोली
 
 

सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य करुन नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा आपल्या आस्तित्वाची जाणीव करुन दिलीय...गेल्या काही वर्षात नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत...पण खरंच हे नक्षलवादी गरिबांचे कैवारी आहेत का ? सशस्त्र क्रांतीचं जे स्वप्न ते आदिवासींना दाखवित आहेत ते सत्यात येणार आहे का ? ज्या उद्देशातून ही चळवळ उभा राहिली होती तो उद्देश साध्य झाला आहे का ? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेतला आहे, रक्तरंजित नक्षलवादमध्ये!


 
 
 
गडचिरोलीतल्या पुस्टोला गावात नक्षलवाद्यांनी भू-सुरुंग लावून केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना घेऊन जाणारी बस स्फोटात उडवली..हा स्फोट घडवून आणण्यासाठी त्यांनी खास  रणनिती आखली होती. नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय राखील दलाच्या जवानांना टार्गेट केलं...नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांची मिनीबस भू-सूरुंग स्फोट घडवून उडवलीय..
 
 
 काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना गडचिरोली  जिल्हातील धोनोरा तालुक्यात पुस्टोला गावाजवळ मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडलीय.... रस्त्यावर पडलेला भला मोठा खड्डा आणि छिन्नविछिन्न झालेली मिनीबसची अवस्था या वरुन त्या स्फोटाच्या तिव्रतेची कल्पना तिथ मदतीसाठी पोहोचलेल्या जवानांना आली होती...नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात 12 जवान शहीद तर 28 जवान गंभीर जखमी झालेत....नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव दलावर भीषण  हल्ला करुन पुन्हा एकदा दहशत निर्माण केलीय ..सीव्हीक एक्शन प्लॅन अंतर्गत नक्षलग्रस्त भागातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यासाठी  केंद्रीय राखीव दलाचे  जवान तीन वहानातून धोनरा तालुक्यातील पट्टा गावाकडं निघाले होते...पण ते सामान त्या ग्रामस्तांपर्यंत पोहोचलेच नाही... पुस्टोल गावाजवळ  दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी भू-सूरुंग स्फोट घडवून ती बस उडवून दिली... नक्षलवाद्यांनी पाळत ठेवून हे कृत्य केलं आहे...गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी  पुस्टोला गावाजवळच्या एका जंगलात  दडून बसल्याचं बोललं जातंय़...केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर हल्ला करण्याची त्यांची योजना होती...त्यासाठी ते योग्यसंधीच्या शोधात होते.
 
 
भू-सूरुंगाचा स्फोट घडवून आणण्यासाठी त्यांनी पुस्टोला गावाची निवड केली होती....सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी पुस्टोलागावा जवळच्या कन्हेलीच्या  जंगलात आश्रय घेतला होता.. ज्या ठिकाणी भू-सूरुंगाचा स्फोट घडवून आणला त्या ठिकाणापासून काही अंतरावरच हे नक्षलवादी दबा धरुन बसलेहोते...नक्षलवाद्यांनी आपल्या या षडयंत्राची खबर कोणालाच लागू दिली नाही....केंद्रीय राखीव दलाचे जवान एकाच बसमधून गट्टा गावाकडं जात असल्याचीमाहिती नक्षलवाद्यांना मिळाली होती...मंगळवारी सकाळी केंद्रीय राखीव जवानंची बस पुस्टोला गावा येताच नक्षलवाद्यांनी भू-सूरुंगाचा स्फोट घडवूनआणला....या घटनेपूर्वी नक्षलवादी आसपासच्या गावात येवून गेल्याची चर्चा आहे.
 
 
नक्षलवाद्यांकडून सरकारी कर्मचारी आणि केंद्रीय राखील दलाच्या जवानांवर हल्ले केले जात आहे..गेल्या काही वर्षात या हल्ल्यांच प्रमाण वाढलंय....नक्षलवाद्यांच्या या बदलेल्या रणनितीचा हा आढावा.
 
 

गडचिरोतील पुस्टोलात नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटामुळं प्रशासन पुरतं हादरुन गेलंय...लाल क्रांतीचा नार देणा-या नक्षलवादाचा काळाकुट्ट  चेहरा समोर आला आहे...गेल्या काही वर्षात  नक्षलवाद्यांकडून  केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना टार्गेट करण्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.....जंगल प्रदेशाला लागून असलेल्या भूभागावर आपलं वर्चस्व कायम रहावं तसेच त्या भागात विकासाची किरणे पोहचू नये हाच या हल्ल्यामागचा नक्षलवाद्यांचा उद्देश आहे...या भागात विकास गंगा पोहोचल्यास आपल्या वर्चस्वाखाली असलेले लोक आपली साथ सोडतील याची भिती नक्षलवाद्यांना सतावते आहे..त्यामुळेच हत्या, बंद, जाळपोळ या दहशतीच्या माध्यमातून नक्षलवादी आपला प्रभाव कायम ठेवण्य़ाचा प्रयत्न करत आहेत.....नक्षली प्रभावाखाली असलेल्या  80 टक्के भूभागावर जंगल पसरलेलं आहे....या प्रदेशात आदिवासीचं प्रमाण मोठं आहे...दुर्गम भागात आजही मुलभूत सेवा सुविधा पोहोचलेल्या नाहीत...त्यामुळे स्थानिक जनतेच्या मनात व्यवस्थे बद्दल रोष आहे..आणि त्याचाच फायदा घेत  सशस्त्रक्रांतीचा विचार नक्षलवाद्यांकडून पद्धतशीरपणे आदिवासी भागात रुजवला जात आहे...गडचिरोलीच्या घटनांमागेही हेच कारण असल्याचं जाणकारांना वाटत आहे.
 
 
 
प्रशासनाविषयी नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या मनातील भावना जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे..खरंतर सरकारकडून या भागासाठी विशेष  योजना चालविल्या जातात...पण आदिवासींचा विश्वास संपादन केल्य़ाशिवाय सरकारला नक्षलवादा विरुद्धची लढाई जिंकता येणार नाही.   रस्ते, आरोग्य,शिक्षण , नवे तंत्रज्ञान या मुलभूत सुविधा त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे...मात्र ते आदिवासींपर्यंत पोहोचू न देण्याचा काम नक्षलवादी करत आहेत...आदिवासी भागात खोलवर रुजलेल्या या चळवळीने आता शहरी भागातही पाळमुळं रोवायला सुरुवात केली...राज्याची सांस्कृतीक राजधानी पुणे आणि डोंबिवली या शहरात त्यांचा वावर वाढल्याचं  गेल्या दोन - तीन  वर्षात उघड झालंय...सरकारी व्यवस्थेवरचा विश्वास उडत चाललेल्या शहरी भागातील लोकांना हाताशी धरून नक्षलवादी आपलं जाळं तयार करत आहेत...नक्षलवाद्यांनी बदललेल्या आपल्य़ा रणनितीची राजकारणी आणि प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे..
 
 
नक्षलवाद रोखण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहेत...मात्र त्या योजना नक्षलग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत..तसेच तिथल्या नागरिकांच होणारं शोषण आजही थांबलं नाही...त्यामुळेच गडचिरोली सारख्या दुर्गम भागात आजही नक्षलवाद्यांचा दबदबा आहे. गडचिरोली..... हा गड आहे... नक्षलवाद्यांचा ......दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात 80च्या दशकात  माओवाद्यांच्या एका पथकानं पहिलं पाऊल ठेवलं ...तेव्हांपासून आज पर्यंत हा भाग नक्षलवाद्यांच्या वर्चस्वाखाली राहिला आहे.
 
 
 
  राजकारणी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळं या भागात मुलभूत सेवासुविधांचा आभाव आहे...त्यामुळं नक्षलवाद्यांना  जनतेचा पाठिंबा मिळत आहे.  नक्षलग्रस्तभागात आजही परिस्थिती जैसे- थे आहे..आणि त्यामुळं नक्षलवादाचा बिमोड करण्यात सरकारला यश मिळतांना दिसत नाही..नक्षलवाद हा कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न नसून तो समाजीक प्रश्न असल्याचं अभ्यसकांच म्हणनं आहे.  सीआरपीएफचे जवान नेहमीच नक्षलवाद्यांच्या निशान्य़ावर राहिले आहेत....पण गेल्या काही वर्षात नक्षलवादी चळवळीत बराच बदल झाला आहे..नक्षलग्रस्त भागात सरकारकडून चालविल्या जाणा-या विविध योजनांमधील काही हिस्सा नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचत असल्याचं जाणकारांचं म्हणनं आहे.
 
 
 
नक्षलवाद्यांनी आपल्या प्रभावाखाली असलेल्या भागात एक समांतर य़ंत्रणाच उभारली आहे...एकीकडं नक्षलवाद्यांचा प्रभाव वाढत असतांना त्यांना रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कडक उपाय योजना करण्याची आवश्यता आहे..मात्र या दोन्ही मध्ये समन्वयाचा अभाव असून त्यात एकसुत्रीपणा आणण्याची आवश्यकता आहे.
 
 
शेतमजूर, कष्टकरी ,दबला पिचलेल्या वर्गाच्या हक्कासाठी पश्चिम बंगालच्या नक्षलबारी या खेड्यातून एक चळवळ सुरु झाली....आणि पहाता पहाता ती चळवळ अनेक राज्यात जावून पोहोचली.  नक्षलबारी -  नक्षलवादी असा प्रवास नक्षवादी चळवळीने केलाय.. शोषीत वर्गाला न्याय आणि त्यांचा हक्क मिळवून देण्याच्या उद्देशातून नक्षवादी चळवळीचा जन्म झाला.
 
 
 
 1925 साली बंगालमध्ये स्थापण झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये 1964 च्या चीनयुध्दानंतर  वैचारीक फुट पडली ..आणि त्याच दरम्यान उग्र डाव्या विचारसरणीच्या  चारु मुजुमदार यांनी वेगळी वाट धरली..  18 मे 1967 ला जंगल संथाळच्या सिलीगुडीत झालेल्या किसान सभेत त्यांनी सशस्त्र उठावाचा ठराव मंजूर केला .. त्यासभेची  परिणीती म्हणून पश्चिम बंगालमधील नक्षलबारी या छोट्याश्या खेड्यात  एका श्रीमंत सावकाराची हत्या करण्यात आली ..नक्षलबारीतल्या सर्व शेतक-यांना त्या सावकाराच्या जाचातून मुक्त करण्यात आलं....त्या घटनेनंतर आदीवासींच्या  सगळ्या आंदोलनाचे रुपच बदलून टाकलं.....स्वहक्कासाठी लढणा-या आदीवासींना आता नक्षलवादी असं नाव मिळालं होतं...पश्चिम बंगालच्या एका लहानशा खेड्यातून सुरु झालेल्या या लढ्याला पुढे शोषीतांच मोठं समर्थन मिळालं...हातात शस्त्र घेतलेल्या गरिब- आदीवासींना पाहून जुलमी सावकारांना घाम फुटू  लागला होता.
 


 
जंगल आणि अविकसीत भागातील जनतेकडून या चळवळीला मोठं समर्थन मिळत गेलं...नंतरच्या काळात आंध्रप्रदेशात या चळवळीने आपली पाळमुळ रोवायला सुरुवात केली..तसेच महाराष्ट्राच्या अतिदुर्गम समजल्या गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातही ही चळवळी पोहोचली.....हे दोन्ही जिल्हे जंगल आणि  नैसर्गिक साधनसंपत्ती  नटलेलं आहे..तेंदूपत्ता ,पेपरमिल्स आणि खनिज खाणी या परिसरात आहेत...आणि त्याचा फायदा नक्षलवादी चळवळीला होतआहे... 60 च्या दशकात जे नक्षलवादी शोषणाविरुध्द उभे ठाकले होते तेच आता शोषणकर्ते बनल्याचं चित्र आहे....भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,बल्लारपूर आणि  गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडं पैसा आहे...तसेच   अत्याधुनिक शस्त्रास्त्रही त्यांच्या हाती  आली आहेत..पैसा आणि शस्त्रांच्या जोरावर नक्षलवाद्यांनी रेड कॉरीडॉरच्या  नावाखाली  देशातल्या 630 पैकी 180 जिल्ह्यात आपलं नेटवर्क तयार केलं आहे....खरं तर ही चळवळ रोखण्याऐवजी त्यांना खतपाणी घालण्यातच अनेकांना रस असल्याचं एकंदरीत चित्र निर्माण झालय...आणि त्यामुळेच नक्षलवाद्यांच्या  क्रांतीचा रंग लाल झालाय.. तो फक्त दडपल्या गेलेल्या निष्पाप आदीवासींच्या रक्तानं.
 
व्हिडिओ पाहा...
 

 

 

 

First Published: Friday, March 30, 2012, 16:05


comments powered by Disqus