Last Updated: Tuesday, April 3, 2012, 22:47
www.24taas.com, पुणे पोलीस आणि वाद हे जणू समिकरणचं बनलं आहे...कोणत्या न कोणत्या कारणामुळं पोलीस वादात सापडतात...पुण्यातल्या वारजे पोलीस स्टेशनचे पोलिसही वादात सापडलेत...त्यांनी पहाटच्या वेळी एका वाहनचोराला सोबत घेऊन केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय...ती कारवाई नेमकी काय होती?....कारवाई करतांना पोलिसांकडून कायद्याचं उल्लंघन झालं का ? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेतला आहे,
पुणे पोलिसांचं गौडबंगालमध्ये. पुण्याल्य़ा वारजे माळवाडी पोलिसांनी सोमावारी पहाटे एक कारवाई केली..मात्र त्या कारवाईवर आता एकच चर्चा सुरु झालीय.. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी एका संशयीत वाहनचोराला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून तीन वाहनं जप्त केली...पण त्या तीन वाहनांपैकी एक बाईक मात्र चोराने चोरलीच नव्हती..वाहन चोरीला गेलं नसताना पोलिसांनी ती इमारतीतल्या पार्किंगमधून उचलून नेली.....तसेच त्यांनी बाईक मालकाला त्याची साधी कल्पनाही दिली नाही...पण सीसीटीव्हीच्या नजरेतून पोलिसांचा तो कारनामा सूटू शकला नाही.

अविनाश देशमुख यांची बाईक हरवली आणि दीड तासात सापडलीही ...पण जेव्हा अविनाश बाईक हरवल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना धक्कादायक अनुभव आला...वाहन हरवल्याची तक्रार दाखल करण्यासाठी आपल्याकडं लाचेची मागणी केल्याचा आरोप अविनाश यांनी केलाय.. पार्किंगमध्ये उभी असलेली अविनाश देशमुख यांची बाईक रात्री हरवली आणि पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर ती अवघ्या दिड तासात त्यांना परत मिळाली...पण या घटने दरम्यानं त्यांना पोलीस खात्यात खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचारा सामना करावा लागला...तक्रार दाखल करण्यासाठी आपल्याकडं लाचेची मागणी केल्याचा आरोप अविनाश यांनी केला आहे.
अविनाश यांच्याकडं पैशाची मागणी करण्यात आली...या प्रकरणी त्यांनी पोलिसांकडं तक्रार केली असून त्यावर चौकशी करुन कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस अधिका-याने सांगितल.एफआयआरसाठी पैसे मागणा-यांवर कारवाई करण्याचे संकेत फडतरेंनी दिलेत...पण चोरी न झालेलं वाहन घेऊन जाणा-या पोलिसांच काय असा सवाल या प्रकरणातील तक्रारदाराच्या वकीलांनी केला आहे. अविनाश देशमुख यांची तक्रार नोंदवून घेतांना अज्ञात इसमांनी बाईक चोरुन नेल्याचं पोलिसांनी नमुद केलं आहे..यापार्श्वभूमीवर संबंधीत पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराच्या वकिलांनी केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार वाहनचोर विठ्ठल राठोड ती बाईक चोरण्याच्या बेतात होता... आणि त्याचा तो डाव हाणून पाडण्यासाठीच पोलिसांनी ती बाईक ताब्यात घेतल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय...पण पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय...याप्रकरणाने अनेक प्रश्नांना जन्म दिला असून त्याची उत्तर देतांना पोलिसांची दमछाक झाली आहे.
वाहनचोराच्या सांगण्यावरुन पार्किंगमधून पोलीस बाईक घेऊन गेले...पण त्याची साधी चौकशी त्यांनी त्या इमारतीतल्या रहिवाशांकडं केली नाही...या करवाईत पोलिसांनी मोठी गुप्तता पाळली...पण सीसीटीव्हीमुळं त्यांचं पितळ उघडं पडलं...या सगळ्या कारवाईवर पोलिसांनी आपली बाजू मांडलीय...पण पोलिसांनी दिलेला तर्क हैराण करणारा आहे. तन्मय पुरी सोसायटीतील पार्किंगमध्ये उभी असलेली अविनाश देशमुख यांची बाईक गस्तीवर असलेले पोलीस घेऊन गेले...अविनाश ज्या इमारतीत राहतात त्याच इमारतीच्या पार्किंगमधून ती बाईक पोलीसांनी नेली होती..मात्र सकाळी ती चोराकडून जप्त केल्यांचं पोलिसांनी सांगितलं...पण सीसीटीव्ही कॅमे-याने सगळं चित्र स्पष्ट केलं होतं..हे प्रकरण प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचल्यावर पोलिसांनी आपली बाजू मांडली...पोलिसांचं पथक रात्रीच्यावेळी गस्तीवर असतांना त्यांनी रेकॉर्डवरचा गुन्हेगार विठ्ठल राठोड याला संशयावरुन ताब्यात घेतंल..त्याच्याक़डं अविनाश यांच्या वाहनाची कागदपत्र साप़डल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
अविनाश यांची बाईक घेऊन जाण्यापूर्वी पोलिसांनी इमारतीतल्या रहिवाशांना कोणतीच कल्पना दिली नाही...या विषयी जेव्हा पोलीस अधिका-याल छेडलं तेव्हा त्यांनी भलतचं उत्तर दिलं. पोलीसांच्या म्हणण्यानुसार आरोपी विठ्ठल राठोड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वाहनचोरी , सोनसाखळी चोरी, चोरी अशा अनेक गुन्हांची नोंद आहे...तसेच त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलं होतं...आरोपीची पार्श्वभूमी पहाता ती बाईक तात्काळ ताब्यात घेण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आरोपी राठोडनं दोन बाईक्स चोरल्या होत्या..त्या बाईक्स त्याच्या ताब्यातून गस्तीवरच्या पोलीस पथकाने जप्त केल्या ...मात्र तिसरी बाईक चोरी करण्याचा त्याचा इरादा होता...त्याने बाईकच्या डिग्गीतून तिची कागदपत्र लांबवली होती...मात्र ती बाईक काही त्याला चोरता आली नाही...आरोपीकडून बाईक चोरली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस ती घेऊन गेल्याचा दावा पोलिसांनी केलाय... पण पोलिसांच्या या कारवाई बाबात आता अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत...बाईक चोरीला गेली नसतांनाही ती पोलिसांनी ताब्यात घेण्याची अजब कारवाई का केली..तसेच बाईक घेऊन जात असतांना त्यांनी गुप्तता पाळली...पण सीसीटीव्ही कॅमे-यामुळं या बाईकची सगळी कहानी उजेडात आली आहे.

कोणतीही कारवाई करतांना पोलिसांनी कायदा आणि नियमांच पालन करणं अपेक्षित आहे..पण पुणे पोलिसांनी ती जी कारवाई केलीय त्यामध्ये कायद्याचं उल्लंघन झालं आहे का आणि झालं असेल तर कोणती कारवाई करणं अपेक्षित आहे. अविनाश देशमुख यांच्या बाईकचोरी प्रकरणी पुण्यातल्या वारजे माळवाडी पोलिसांच्या कारवाई विषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत..माजी पोलीस अधिका-यांच्या म्हणण्यानुसार वारजे पोलिसांनी ही कारवाई करतांना अनेक नियमांचं उल्लंघन केलं आहे. पोलिसांनी कारवाईला निघण्यापूर्वी स्टेशन डायरीत नोंद केली होती का ? बाईक ताब्यात घेण्यापूर्वी पंचनामा करण्यात आला होता का? तपासासाठी त्रयस्त व्य़क्तीची मालमत्ता ताब्यात घेणं निय़मात बसतं का? पोलिसांनी कायद्याचं उल्लंघन केल्यास कोणती कारवाई होऊ शकते? एफआयआर नोंदवून घेण्यासाठी लाच मागणा-यांवर कोणती कारवाई अपेक्षित आहे? यासारखे प्रश्न या निमित्ताने स्पष्ट झाले आहेत.
First Published: Tuesday, April 3, 2012, 22:47