Last Updated: Tuesday, April 24, 2012, 13:19

मुंबईची लाईफलाईन रूळावरमुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वेवाहतूक तिसऱ्या दिवशी रूळावर आली. मात्र, कुर्ला ते विद्याविहारदरम्यान ती धिम्या गतीने सुरू आहे. मंगळवारी रात्री कुर्ला येथील सिग्नल कंट्रोल रूमला आग लागल्याने सिग्नल यंत्रणेचे तीनतेरा वाजले आणि मध्य आणि हार्बरची रेल्वेसेवा खोळंबली. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. आज तिसऱ्या दिवशी काहीप्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ९५ टक्के रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
.
.............................

रेल्वे बळींना दोन लाख, अधिकाऱ्यांवर गुन्हेमुंबईतील लोकलमधल्या गर्दीनं तिघांचा बळी घेतला आहे. रेल्वेचा खोळंबा हा आता प्रवाशांच्या जीवावर उठला आहे. सिग्नलचा खांबाची धडक लागल्याने एक जण बाहेर फेकला गेल्या. त्याच्याबरोबर १७जणही रेल्वेबाहेर कोसळले. हे सर्वजण जखमी झालेत. नाहूर स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. लोकल अपघातातील मृतांच्या वारसांना १५ हजारांची तोकडी मदत देणाऱ्या रेल्वेने ही मदत वाढवून दोन लाख रूपयांपर्यंत देण्याचं जाहीर केले आहे. दरम्यान, अधिकरी आणि कर्मचाऱ्यांवर कुर्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
.
.............................

लोकलची गर्दी जीवावर.. पडून ३ ठार, १५ जखमीलोकलमधल्या गर्दीनं दोघांचा बळी घेतला आहे. रेल्वेचा खोळंबा हा आता प्रवाशांच्या जीवावर उठला आहे. २ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. नाहूर स्टेशनजवळ ही घटना घडली आहे.
.
.............................

आजही इस्टर्न हायवे जाम, चाकरमानी रखडलेआज दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मध्य रेल्वेच्या लोकल्स अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू आहेत त्यामुळं आज पुन्हा इस्टर्न एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक जॅम झाला असून सुमन नगरजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत.
.
................................

‘मरगळलेली म.रे.’, ट्रेन ४० मिनिटे उशीराने…मध्य रेल्वेच्या काल झालेल्या सिग्नल यंत्रणेला आग लागल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती, ती पूर्ववर्त होण्यासाठी जवळजवळ तीन दिवस लागणारं आहेत. आजही मध्य रेल्वेचा खेळखंडोबा हा सुरूच आहे. आजही मध्य रेल्वे अत्यंत धिम्या गतीने धावत आहे.
.
.................................

‘ट्रेन आजही लेट’, चला घरातून लवकर निघा…काल पूर्णपणे ठप्प झालेल्या रेल्वेसेवेमुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. आज सकाळपासून हळूहळू लोकल सुरू झाल्या आहेत. मात्र, ट्रेन १५ ते २० मिनिटे उशीराने धावत असल्याने चाकरमान्यांना घरातून लवकरच निघणं भाग आहे.
.
...................................

प्रवाशांची लूट, टॅक्सी-रिक्षावाल्यांनी केली बेछूटमध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी उसळल्याने अर्धा ते एक तासाने धावणाऱ्या रेल्वेमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप करावा लागला.
.
..................................

इस्टर्न हायवे जाम, प्रवाशांचे मेगाहालमध्य आणि हार्बरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने याचा ताण रस्तेवाहतुकीवर पडला आहे. इस्टर्न हायवेवर वाहनांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. वाहतुकीची सेवा सुरळीत नसल्याने प्रवाशांचे मेगाहाल झाले आहेत. त्यातच वाहतुकीची कोंडी झाल्याने ट्रॅफीक जामचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून बेस्टने १३४ मार्गांवर जादा बस सोडल्या आहेत.
...................................

मुंबईत रेल्वे प्रवाशांचे हाल, एक्सप्रेस गाड्या रद्दमध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी उसळल्याने अर्धा ते एक तासाने धावणाऱ्या रेल्वेमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या सिग्नल बिघाड दुरुस्तीला दोन ते तीन दिवस लागणार आहेत. सिग्नल बिघाडाचा लांब पल्ल्याच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. प्रगती, सिंहगड, गोदावरी आणि राज्यराणी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
....................................

मध्य, हार्बरची रेल्वेसेवा विस्कळीतमध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वेस्थानकाजवळच्या सिग्नल नियंत्रण केबीनला रात्री सव्वाबाराच्या सुमारास आग लागल्यामुळे मध्य, हार्बरची रेल्वेसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे शेकडो प्रवाशांना रेल्वेस्टेशनवर रात्र काढावी लागली. दरम्यान, सिग्नल यंत्रणा दुरूस्त होण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना चार दिवस उशिरा रेल्वेचा प्रवास करावा लागणार आहे.
.....................................
व्हिडिओ
First Published: Tuesday, April 24, 2012, 13:19