लाल दिव्यावर पोलिसांची नजर... - Marathi News 24taas.com

लाल दिव्यावर पोलिसांची नजर...


झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
२६/११चा तो हल्ला भयंकर हल्ला कोणीच विसरू शकत नाही. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच, मुंबईत लाल दिव्यांचा गाडीतून दहशतवादी हल्ला करू शकतात. मुंबई वाहतूक पोलिसांनीच जारी केलेल्या परिपत्रकारत हा इशारा देण्यात आला. मुंबईत लाल दिव्यांच्या गाड्यांचा गैर वापर दिवसंदिवस वाढतो आहे. दहशतवादी ही लाल दिव्यांच्या गाड्यांचा उपयोग करुन दहशतवादी हल्ला करु शकतात, असा इशारा देण्यात आला.
 
पोलीस उपायुक्त नंदकुमार चौगुले यांनी जारी केलेल्या या परिपत्रकानंतर वाहतूक पोलीसांनी परवानगी शिवाय लाल दिवा लावून फिरणाऱ्या गाड्यांवर कारवाई सुरु केली आहे. 'झी २४ तास'ला  या परिपत्रकाची एक्सक्लूसीव कॉपी मिळालेली आहे. या परिपत्रकात पोलीसांना रस्त्यांवर चालणाऱ्या प्रत्येक लाल दिव्यांचा गाड्यांवर नजर ठेवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे.

First Published: Wednesday, November 23, 2011, 17:39


comments powered by Disqus