Last Updated: Thursday, November 24, 2011, 03:51
झी २४ तास वेब टीम, मुंबई बॉलिवूडमधील आघाडाचा अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आमीर खान याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शेजारी व्हायचं आहे. तशी त्यांनं ईच्छा व्यक्त केली आहे. आमीर सध्या घराच्या शोधात आहे.
सचिन तेंडुलकरचा शेजारी व्हायचं असल्याने आमीरने सध्या बांद्रा भागात घराचा शोध सुरू केला आहे. सचिनचा पेरी क्रॉस रोडवर स्वप्नातला बंगला आहे. याच बंगल्याच्या शेजारी आमीरने घराचा शोध सुरू केला आहे. बंगला नसेल तर फ्लॅटही चालू शकेल, जुना बंगला मिळाला तरी चालेल, तो दुरुस्त करता येईल, मात्र या भागातच घर असावे, अशी आमीर इच्छा असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
आमीर २००८ पासून युनियन पार्क भागातील एका फ्लॅटमध्ये राहत असून, तो लहान असल्यामुळे त्याने नवीन घराचा शोध सुरू केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
First Published: Thursday, November 24, 2011, 03:51