Last Updated: Thursday, November 24, 2011, 12:50
झी २४ तास वेब टीम, मुंबई मराठी रंगभूमीवर गाजलेलं एक नाटक लवकरच हिंदी आणि गुजराथी रंगभूमीवर पहायला मिळणार आहे. चिन्मय मांडलेकर आणि गिरीश ओक यांच्या दमदार अभिनयाने नटलेलं नाटक म्हणजे 'सुखांशी भांडतो आम्ही'. स्वत:चं सुख सोडून दुसऱ्याच्या सुखाकडे बोट दाखवण्याची माणसाची वृत्ती यावर या नाटकातून भाष्य करण्यात आलंय.
भद्रकाली प्रॉडक्शन निर्मित आणि अभिराम भडकमकर लिखीत मराठी रंगभूमीवर गाजलेलं हे नाटक आता लवकरच हिंदी आणि गुजराथी रंगभूमीवर दाखल होणार आहे. अभिनेता मनोज जोशी या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत. मात्र, हिंदी आणि गुजराथी नाटकात अभिनयाचे शिलेदार कोण असणार हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. व्हा मराठी रंगभूमीवर गाजलेल्या या नाटकाचा हिंदी आणि गुजराथी रिमेक प्रेक्षकांना आवडेल अशी आशा व्यक्त करुया.
First Published: Thursday, November 24, 2011, 12:50