Last Updated: Tuesday, April 24, 2012, 00:00
www.24taas.com, मुंबई राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी वातावरण तापायला सुरुवात झालीय.. नुकतेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस घायाळ झाली असतांनाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रपती निवडकणुकीच्या पीचवर गुगली टाकलाय...त्यामुळे राष्ट्रपतीपदाची निवडणुक काँग्रेससाठी सध्यातरी तेव्हढी सोपी राहिली नाही....
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उरलाय... त्यामुळे पक्षीय राजकारणालाही वेग आलाय.. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत असलेली संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीए आणि भाजपच्या नेतृत्वाखाली एकवटलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए या दोन्ही आघाड्यांमध्ये चांगलीच चुरस होणार आहे... अलिकडचं झालेल्या पाच राज्यातल्या निवडणुकांचे निकाल त्याल कारणीभूत आहेत...उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये काँग्रेसला पराभवाचं तोंड पहावं लागलंय..त्यामुळे देशातली राजकीय परिस्थितीला वेगळं वळण लागलं...एकाएकी मध्यावधी निवडणुका किंवा तिस-या आघाडीचं सरकार अशी चर्चाही सुरु झाली...अशातच राष्ट्रपतीपदाची निवडणूक जुलै महिन्यात होवू घातलीय..नेमकी संधी साधून उत्तर प्रदेशात एकहाती सत्ताकाबीज करणा-या आणि संसदेत 22 खासदार असणा-या समाजवादी पक्षाने माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांच नाव पुन्हा राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आणलं..समाजवादी पक्षाच्या या खेळीला सहाजिक मुस्लीम मतांची किनार आहे...कलामांच्या नावाला काही छोट्या-मोठ्या पक्षांकडूनही पाठिंबा मिळातोय..अशातच युपीएमधील एक महत्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतली आपली भूमीका जाहिर केली..आगामी राष्ट्रपती हा बिगर राजकीय असावा अशी गुगली खद्द शरद पवारांनीच टाकल्यामुळे काँग्रेससमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत
तसेच राष्ट्रपती पदाच्या निवडणुक रणनितीत काँग्रेसने राष्ट्रवादीला विश्वासात घ्यावं हे सांगायलाही पवार विसरले नाहीत. यंदाची राष्ट्रपतीपदाची निवडणुक युपीएसाठी सोपी नाही...त्यांना काही मतांची जुळवाजुळव करण्याबरोबरच आपल्या घटक पक्षांची मतं इतत्र जाणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच ही निवडणुक देशाच्या इतिहासात महत्वाची ठरणार आहे...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत युपीए आणि एनडीएत चांगलीच चुरस होणार आहे...या निवडणुकीत नेमकं काय घडू शकतं याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहे...कारण राष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराच्या नावावर युपीएतील घटक पक्षात एकमत होईल का हाच खरा प्रश्न आहे .राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत युपीए आणि एनडीए सोबतच इतर पक्षांचं पक्षीय बलाबल महत्वाचं ठरणार आहे

राष्ट्रपतीपदाची आगामी निवडणुक युपीएसाठी जेव्हडी अवघड आहे तेव्हडीच एनडीएसाठीही कठीण होऊन बसलीय..कारण दोघांकडेही बहुमताचा अभाव आहे...युपीएच्या मतांवर नजर टाकल्यास कॉँग्रेसकडं 1177 आमदार आणि 277 खासदारांच बळ आहे...त्यांच्या मतांच मुल्य 330485 इतकं आहे..युपीएचा घटकपक्ष तृणमूल काँग्रेसकडं 199 आमदार आणि 28 खासदार आहे त्यांच्या मतांचं एकूण मुल्य़ 48,049 इतकं आहे. द्रमुककडे 25 आमदार तर 25 खासदार आहेत त्यांच्या मतांचं मुल्य 21780 इतकं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडं 94 आमदार आणि 16 खासदार आहेत राष्ट्रवादीच्या मतांच मुल्य 23850 इतकं आहे..राजदकडं 27 आमदार आणि 6 खासदार आहेत त्यांच्या मतांचं मुल्य 8934 इतकं आहे...नॅशनल कॉन्फरन्सचे 28 आमदार आणि 5 खासदार आहेत त्यांच्या मतांच मुल्य 5556 इतकं आहे..मुस्लीम लीगकडे 20 आमदार आणि 2 खासदार आहेत त्यांच्या मतांचं एकूण मुल्य 4456 इतकं आहे.जेव्हीएमकडं 11 आमदार आणि 2 खासदार इतकं संख्याबळ आहे ..त्यांच्या मतांचं मुल्य 3352 इतकं आहे...एआयएमआयएमकडं 7 आमदार आणि 1 खासदार आहे त्यांच्या मतांच मुल्य 1744 इतकं आहे...बीपीएफचे 12 आमदार आणि 2 खासदार आहेत ..त्यांच्या मतांच मुल्य 2808 इतकं आहे...युपीएचा घटकपक्ष केरळा काँग्रेसचे 9 आमदार आणि 1 खासदार असं सख्याबळ असून त्यांच्या मतांच मुल्य 2076 इतकं आहे.
राष्ट्रीय लोकदलाचे 9 आमदार आणि 6 खासदार आहेत...त्याच्या मतांच मुल्य 6220 इतकं आहे...युपीएतील शेवटचा घटक पक्ष लोकजनशक्ती पक्षाचा 1 आमदार आणि 1 खासदार असून त्यांच्या मतांचं मुल्य 881 इतकं आहे. युपीएकडं एकूण 4,60,191 म्हणजेच (42%) मतांचा कोटा आहे. युपीए प्रमाणेच एनडीएकडेही आपल्या हक्काची काही मतं आहेत. एनडीएचं नेतृत्व करणा-या भाजपच्या आमदारांची संख्या 825 तर खासदारांची संख्या 163 इतकी आहे...त्यांच्या मतांच मुल्य 2,23,885 इतकं आहे....एनडीएतील घटक पक्ष जनता दल (यु)कडे 121 आमदार तर 30 खासदार आहेत त्यांच्या मतांच मुल्य 42,153 इतकं आहे...अकाली दलाचे 57 आमदार तर 7 खासदार आहेत त्यांच्या मतांच मुल्य 11,564 इतकं आहे...एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे 45 आमदार आणि 15 खासदार आहेत ..त्यांच्या मतांचं मुल्य 18,495 इतकं आहे...झामुमोकडं 18 आमदार आणि 2 खासदार असून त्यांच्या मतांच मुल्य 4,584 इतकं आहे..आसाम गण परिषदकडं 10 आमदार आणि 3 खासदार आहेत त्यांच्या मतांच मुल्य 3284 इतकं आहे.
एचजेसीकडं 1 आमदार आणि 1 खासदार असून त्यांच्या मतांच मुल्य 820 इतकं मुल्य आहे. हे पक्षिय बलाबल पहाता एनडीएची एकूण - 3,04,785 मतं आहेत. एनडीए आणि युपीए या दोन्ही आघाड्यांपासून समान अंतर ठेवून असलेल्या इतर राजकीय पक्षांकडंही जवळपास 24 टक्के मतं आहेत. समाजवादी पक्षाकडं 230 आमदार असून 30 खासदार आहेत...त्यांच्या मतांच मुल्य़ 68812 इतकं आहे..मायवतीच्या बसपाकडं 91 आमदार तर 36 खासदार आहेत ..बसपाच्या मतांच मुल्य़ 43349 इतकं आहे..अण्णा द्रमुककडं 158 आमदार असून 14 खासदार आहेत..त्यांच्या मतांच मुल्य 36920 इतकं आहे...डाव्या पक्षाकंड 196 आमदार आणि 39 खासदार आहेत ..त्याच्या मतांच मुल्य 51682 इतकं आहे...बीजेडीकडं 103 आमदार आणि 20 खासदार असून त्यांच्या मतांचं मुल्य 30215 इतकं आहे...टीडीपीचे 86 आमदार तर 11 खासदार आहे..त्यांच्या मतांच मुल्य 20516 इतकं आहे...जनता दल सेक्युलरकडं 30 आमदार आणि 3 खासदार असून त्यांच्या मतांच मुल्य 6138 इतकं आहे.
पीडीपीचे 22 आमदार असून त्यांच्या मतांच मुल्य 1584 इकतं आहे...टीआरएसचे 12 आमदार असून 2 खासदार आहेत...त्यांच्या मतांचं मुल्य 3192 इतकं आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आमदार आणि खासदार मतदान करतात..त्यांच्या मतासाठी ठरावीक मुल्य निश्चित करण्यात आलं आहे...ही प्रक्रिया नेमकी कशी पार पाडली जाते. राष्ट्रपतीच्या निवडणुक ही आमदार आणि खासदारांच्या मतांच्या मुल्यावर ठरते...सर्व राज्यातले विधानसभेचे आमदार, लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मिळून राष्ट्रपतीच्या निवडणुकीचं इलेक्ट्रोल कॉलेज बनतं...प्रत्येक खासदाराच्या मताचं मुल्य असतं 708 तर आमदाराच्या मतांचं मुल्य त्यात्या राज्यातली लोकसंख्या आणि विधानसभेच्या सदस्य संख्येनुसार ठरतं..प्रत्येक मतदाराला उमेदवारांच्या संख्येनुसार प्राधान्यक्रमानुसार मतदान करावं लागतं..मात्र या निवडणुकीत संसदेतल्या नियुक्त खासदारांना मतदान येत नाही,...जुलै महिन्यात होणा-या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण मतांची संख्या आहे 10,98,882. त्यातली युपीएची हक्काची मतं आहे ती 4,60,191 म्हणजेच 42%...तर एनडीएकडं 3,04,785 मतं आहेत... म्हणजेच 28%...तसंच बिगर एनडीए - युपीए पक्षांकडं 2, 62, 408 म्हणजेच ( 24 %) मतांचा कोटा आहे..
राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत काही नावांची चर्चा आहे..
हमीद अन्सारी -सध्या भारताचे उपराष्ट्रपती असल्यामुळे राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी मिळण्याची शक्यतामुस्लिम असल्यामुळे समाजवादी पक्षाचा पाठिंबा मिळण्याची शक्यताहमीद अन्सारी यांना तोडीचा विरोधक नाहीविरोधकांनी मुस्लिम उमेदवार उभा केल्यास अन्सारींना शर्थीचे प्रयत्न करावे लागतील-----------------------------------प्रणव मुखर्जीराजकारणात मुरलेलं व्यक्तिमत्वयुपीएसाठी मतं खेचून आणण्याची कुवतकेंद्रातील युपीएची परिस्थिती आणि मुखर्जींचं सक्रीय राजकारण बघता राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी---------------------------------------------शिवराज पाटीलसोनिया गांधींशी सलोख्याचे संबंधप्रतिभा पाटील यांच्यानंतर पुन्हा राष्ट्रपतीपदासाठीमहाराष्ट्राला संधी मिळण्याची शक्यता कमी------------------------------------ए. के. अँटनीस्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणीसर्वांशी जुळवून घेण्याची क्षमताडाव्या पक्षांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यतानुकतच गाजलेलं लष्करातील टेट्रा ट्रक घोटाळा प्रकरणामुळे उमेदवारी मिळण्यात अडथळे------------------------------------मीरा कुमार2009 साली लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडणूकबाबू जगजीवन राम यांची कन्या आणि दलित असल्यामुळे अनेक पक्षांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता------------------------------गोपाल कृष्णन गांधीमहात्मा गांधी यांचे नातू असल्यामुळे विरोधाची शक्यता कमीमुख्यमंत्री नितीश कुमार, नवीन पटनायक आणि जयललिता यांच्यांशी सलोख्याचे संबंधममता बॅनर्जींचा पाठिंबा--------------------------------------करन सिंगकाश्मीरचा वारसागांधी घराण्याशी जवळीकअनेक महत्वांच्या प्रश्नासाठी यशस्वी मध्यस्थीराजकारणात प्रत्यक्ष सहभाग कमीइतर पक्षांचा पाठिंबा मिळवण्यात अडचणी-----------------------------------एस. वाय. कुरेशीमुख्य निवडणूक आयुक्तमुस्लिम कार्डकाही पक्षांना आक्षेपबिगर एनडीए आणि बिगर युपीए तसेच इतर छोट्या पक्षांच्या मतांची गोळाबेरीज 3,33,906 इतकी आहे..राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी 5, 49,442 मतांची आवश्यकता आहे...आजच्या घडीला हे संख्याबळ युपीए आणि एनडीए या दोन्ही प्रमुख आघाड्यांकडं नाही...हा आकडा जुळवण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वा खालच्या युपीए सरकारला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे...त्यांमुळे या निवडणुकीत चांगलीच रस्सीखेच होणार आहे...राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी युपीए कमजोर झाल्याचं चित्र पहायला मिळतंय.... उत्तरप्रदेश आणि पंजाबमधील विधानसभेच्या निवडणुकीमुळे काँग्रेसची सगळी गणितं चूकली आहेत...पाच राज्यांच्या निवडणुकीतील पराभवातून काँग्रेस एकीकडं सावरतं असतांनाच युपीएतील घटकपक्ष असलेल्या तृणमुलने रेल्वेच्या बजेटवरुन मोठा धक्का दिला ...रेल्वेच्या प्रवासी दरात भाडेवाढ केली म्हणून ममता बॅनर्जीनी आपल्या पक्षाच्या रेल्वे मंत्र्यांला राजीनामा देण्यास भाग पाडलं..त्यावेळीही काँग्रेसला हतबलपणे पहात राहण्यावाचून पर्याय उरला नाही...तसेच समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांनीही मध्यावदी निवडणुकीला तयार रहा असं सांगून काँग्रेसला सुचक इशारा दिला होता...त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तृणमुल काँग्रेस, अण्णाद्रमुक, बहुजन समाज पार्टी, आणि बिजू जनता दल या प्रादेशिक पक्षांची भूमीक महत्वाची ठरणार आहे... या सगळ्या पार्श्वभूमिवर काँग्रेसला राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडतांना फेरविचार करुन नव्याने सगळा सारिपाट मांडावा लागणार आहे...
First Published: Tuesday, April 24, 2012, 00:00