Last Updated: Wednesday, April 25, 2012, 00:08
www.24taas.com, मुंबई सिमरन सूद.....मायानगरी मुंबईतील एक असा सुंदर चेहरा...ज्याच्या विषयी ना फारसं कुणी ऐकलं होतं.. ना कुणी तिला फारसं ओळखत होतं..पण जेव्हा तो सुंदर चेहरा प्रसिद्धीत आला तेव्हा मृत्यूचं एक भयंकर जाळंच सर्वांसमोर आलं... हे असं चक्रव्यूह आहे ज्यामध्ये कुणी प्यादा आहे...... कुणी शिकारी... तर कुणी सावज....पण या चक्रव्यूहातील प्रत्येकजण एका सुंदर चेह-याशी जोडला गेला आहे...तो चेहरा आहे मुंबईतील मॉडेल सिमरन सूद हिचा...मॉडेल, माफिया आणि खुनाचं रहस्य या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे सिमरन सूद...
अरुण टिक्कू खून प्रकरणी सिमरन सूदवर पोलिसांना संशय आहे. पण ती केवळ या एकाच प्रकरणात अडकलीय असं नाही तर करन कक्कड हत्या प्रकरणी तिच्यावर संशय असून आता विवेका बाबाजीच्या मृत्यू प्रकरणीही सिमरन सूदवर संशयाची सुई वळलीय. गौतम वोराच्या अटकेमुळं विवेका बाबाजीचं प्रकरण पुन्हा बाहेर आलाय. विवेका बाबाजीचा मित्र गौतम वोराला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. अरुण टिक्कू खून प्रकरणातील आरोपी विजय पलांडेला आश्रय दिल्याचा गौतम वोरावर आरोप आहे. मॉडेल सिमरनशी आरोपी विजय पालांडेचे संबंध आहेत. मॉडेल आणि माफिया या जोडगोळीवर टिक्कू आणि कक्कर खूनप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा आरोप आहे.
आरोपी मॉडेल सिमरन सूदने रचलेलं षडयंत्र अत्यंत घातक असं होतं. तिच्या त्या मोहक चक्रव्यूहात केवळ दोघांनाच जीव गमवावा लागलाय, असं नाही तर मॉडेल विवेक बाबाजीच्या मृत्यूलाही ते कारणीभूत ठरल्याचा संशय आहे.अरुण टिक्कू आणि करन कक्कडच्या हत्येमागे संपत्ती आणि पैसा कारणीभूत असल्याचं मानलं जातंय..मात्र विवेका बाबाजीच्या रहस्यमय मृत्यूमागे मानसिक ताणतणाव कारणीभूत असल्याचं आतापर्यंत मानलं गेलंय.
पण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम वोरा आणि विवेका बाबाजी यांच्यातल्या संबंधांमध्ये तिसरी व्यक्ती आली होती..आणि त्यामुळेच विवेका बाबाजीचा मानसिक ताणतणाव वाढला होता....त्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती सिमरन सूद असल्याचं बोललं जातयं. गौतम आणि सिमरन सूद यांच्यात त्यावेळी मधूर संबंध असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे. अरुण टिक्कू खूनप्रकरणी तपासादरम्यान माफिय़ा पलांडे आणि मॉडेल सिमरन सूद हे दोघे पोलिसांच्या हाती लागले आहे..पण या प्रकरणाची चौकशी करतांना एक खून आणि मृत्यूच्या रहस्यावरचा पडदा दूर होणार आहे.
अरुण टिक्कूंच्या हत्येप्रकरणी विजय पालांडे आणि सिमरनला पोलिसांनी अटक केलीय.पण आता विवेका बाबाजीच्या मृत्यूप्रकरणीही मॉडेल सिमरनचा संबंध जोडून पाहिला जाण्याची शक्यता आहे . विजय पालांडे आणि गौतम वोरा यांच्यातली मैत्री उघड झाल्यानंतर ही चर्चा सुरु झालीय. अरुण टिक्कू खून प्रकरणी सिमरन सूद, विजय पलांडे, आणि गौतम वोराचं नावही आता समोर आलं आहे...टिक्कू खून प्रकरणाचा तपास करत असतांना एक गोष्ट स्पष्ट झाली असून ती म्हणजे सिमरन सूद ही ब-याच काळापासून गौतम वोराच्या संपर्कत होती..गौतम वोराच्या वकिलांनी कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार , सिमरनने गौतमची विजय पलांडेशी ओळख करुन दिली होती...विजय आपला भाऊ असल्याचं सिमरनने गौतमला सांगितलं होतं..पलांडेने आपलं नाव करन सूद असल्याचं त्यावेळी सांगितल्याचा दावा गौतमच्या वकिलांनी केलाय.
विजय पलांडे हा आपलं नाव करन सूद असल्याचं सांगत असे..मयत अरुण टिक्कूचा मुलगा अनुज यालाही त्याने आपलं नाव करन सूद असंच सांगितलं होतं..तसेच त्यांची ओळख सिमरनने करुन दिली होती....अरुण टिक्कू खून प्रकरणाचा तपास करत असतांना विजय पलांडेकडं गौतम वोराचा फोननंबर आढळून आल्यानंतर पोलिसांना गौतमवर संशय आला. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजय पलांडेच्या मोबाईल फोनमध्ये गौतम वोराची माहिती पोलिसांना मिळाली होती..त्यावरुन पोलिसांनी विजयकडं चौकशी केली आणि गौतमशी असलेल्या त्याच्या मैत्रीचा खुलासा झाला..
10 एप्रिल 2012 रोजी विजय पालांडे जेव्हा पोलिसांच्या तावडीतून निसटला तेव्हा त्याला गौतम वोराने मदत केली होती. पलांडेच्या म्हणण्यानुसार गौतम वोरा त्याला चर्चगेट रेल्वेस्थानकावर भेटला. त्यानंतर गौतम त्याला आपल्या करमधून कुलाब्यातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे ते जवळपास चार तास थांबले होते.त्या घटनेनंतर दुस-या दिवशी पलांडे पोलिसांच्या हाती लागला..तो थायलंडला पळून जाण्याच्या बेतात होता. सिमरन सूदने पलांडेशी आपली ओळख करुन दिल्याचा दावा गौतमने केलाय..मात्र जुजबी ओळख असतानाही गौतम रेल्वे स्टेशवर पलांडेला भेटण्यसाठी गेला तसेच तेथून तो विजयला थेट हॉटेलात घेऊन गेला. त्यावर त्यांची मैत्री जुजबी होती की जुनी असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांकडून केला जात आहे..पण विजय पलांडे,सिमरन सूद आणि आता गौतम वोराच्या अटकेमुळं दोन वर्षांपूर्वी विवेक बाबाजीच्या मृत्यू बाबतही संशयाचं धूक अधिकच गडद होत चाललंय. करन सूद ..होय ..हेच नाव धारण करुन विजय पलांडेने बॉलिवूडमधील अनेक लोकांशी ओळख वाढवली होती..मात्र त्यांच्यातला दुवा होती सिमरन सूद...विजय पलांडेनं सिमरनचा वापर हनी ट्रॅप म्हणून केला होता. ह्रदय घायाळ करणारं सौंदर्य आणि त्या सौंदर्यामागे लपलेली गुन्हेगारीची एक भयंकर कहाणी...
सिमरन सूदचे विजय पलांडेशी जेव्हडे घनिष्ठ संबंध आहे तेवढीच ती गुन्हेगारीच्या जवळ असल्याचं पोलिस सुत्रांनी सांगितलंय. विजय पलांडे कधी तिची भाऊ म्हणून समोर येतो, तर कधी मित्र, तर कधी चुलता म्हणून लोकांसमोर जात असे.. मॉडेल सिमरन सूद ही विजय पलांडेची लांबची नातेवाईक असल्याचं बोललं जातंय... 14 - 15 वर्षापूर्वी मायानगरी मुंबईत बॉलीवूडमध्ये नशिब आजमावण्यासाठी ती आली होती..त्यावेळी विजय पलांडेशी तिची भेट झाली..आणि त्यांनंतर काही महिन्यातच त्या दोघांचं नाव एका खूनप्रकरणात समोर आलं..
1998पासून सिमरन ही विजय पलांडेसाठी हनी ट्रॅप म्हणून काम करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. एअर इंडियातील इंजिनिअर अनूप दासला जाळ्यात ओढण्यासाठी सिमरनचा मोहरा म्हणून वापर केला गेला होता. त्यानंतर अनूप दास आणि त्याच्या पित्याच्या खून प्रकरणात विजय पलांडेचं नाव समोर आलं होतं.त्या घटनेनंतर बराच काळ पलांडे फरार होता.. त्या काळात सिमरनने आपल्या सौंदर्याच्या जोरावर अनेक फिल्म प्रॉड्यूसर्सला आपल्या जाळ्यात ओढलं होतं. 2004मध्ये सिमरनने ‘अनोखा अनुभव’ नावाच्या एका बी ग्रेड सिनेमात काम केलं.
विजय पलांडेने याच काळात आपल्या चेह-याची प्लॅस्टीक सर्जरी करुन घेतली असावी असा पोलिसाना संशय आहे...तो सिमरनला पेज थ्री पार्ट्यांमध्ये पाठवित असे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मॉडेल सिमरन आठवड्याला कमीत कमी चार पार्ट्यांना हजेरी लावीत असे. पेज थ्री पार्ट्यांदरम्यानच ती उद्योगपती आणि बॉलिवूडमधील बड्या व्य़क्तींच्या भेटीघाटी घेत असे..अविवाहीत किंवा घटस्फोटीत पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सिमरनकडून केला जात होता..एकदाका सावज टप्प्यात आलं की विजय पलांडे ती आघोरी चाल खेळत असे..
सिमरेन सूदशी गौतम वोराचे संबंध उघ़ड झाल्यानंतर विवेका बाबाजीच्या मृत्यूशी याच्या संबंधांना जोडून बघीतलं जातंय..मायानगरी मुंबईतील चार खूनांवर नजर टाकल्यास विजय पलांडे आणि सिमरन सूदशी त्यांचा संबंध असल्याचं उघड झालंय..हे दोघे करन आणि टिक्कू खून प्रकरणात आरोपी आहेत..या जोडगोळीवर 1998 मध्ये एअर इंडियातील इंजिनिअर अनूप दास आणि त्याच्या पित्याचा खूनाचा आरोपही आहे..विजय पलांडेची गौतम वोराशी मैत्री असल्याचं आता उघड झाल्यामुळं विवेका बाबाजीच्या मृत्यू विषयी पुन्हा चर्चा सुरु झालीय..पोलीस सुत्रांच्या म्हणण्यानुसार विजय पलांडे हा सिमरनचा हनी ट्रॅप म्हणून वापर करत होता..
First Published: Wednesday, April 25, 2012, 00:08