नक्षलवाद्यांची अपहरणनीती - Marathi News 24taas.com

नक्षलवाद्यांची अपहरणनीती

www.24taas.com, मुंबई
 
शेतमजूर, कष्टकरी,दबल्या पिचलेल्या वर्गाच्या हक्कासाठी पश्चिम बंगालच्या नक्षलबारी या खेड्यातून एक चळवळ सुरु झाली....आणि पहाता पहाता ती चळवळ अनेक राज्यात जाऊन पोहोचली. नक्षलबारी -  नक्षलवादी असा प्रवास नक्षवादी चळवळीने केलाय.. शोषीत वर्गाला न्याय आणि त्यांचा हक्क मिळवून देण्याच्या उद्देशातून नक्षवादी चळवळीचा जन्म झाला..
 
1925 साली बंगालमध्ये स्थापण झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये 1964 च्या चीनयुध्दानंतर वैचारीक फुट पडली..आणि त्याच दरम्यान उग्र डाव्या विचारसरणीच्या  चारु मुजुमदार यांनी वेगळी वाट धरली..  18 मे 1967 ला जंगल संथाळच्या सिलीगुडीत झालेल्या किसान सभेत त्यांनी सशस्त्र उठावाचा ठराव मंजूर केला .. त्यासभेची  परिणती म्हणून पश्चिम बंगालमधील नक्षलबारी या छोट्याश्या खेड्यात  एका श्रीमंत सावकाराची हत्या करण्यात आली ..नक्षलबारीतल्या सर्व शेतक-यांना त्या सावकाराच्या जाचातून मुक्त करण्यात आलं....त्या घटनेनंतर आदीवासींच्या  सगळ्या आंदोलनाचे रुपच बदलून टाकलं.....स्वहक्कासाठी लढणा-या आदीवासींना आता नक्षलवादी असं नाव मिळालं होतं...पश्चिम बंगालच्या एका लहानशा खेड्यातून सुरु झालेल्या या   लढ्याला पुढे शोषीतांचं मोठं समर्थन  मिळालं...हातात शस्त्र घेतलेल्या गरिब- आदीवासींना पाहून जुलमी सावकारांना घाम फुटू  लागला होता.
 
जंगल  आणि अविकसीत भागातील जनतेकडून या चळवळीला मोठं समर्थन मिळत गेलं...नंतरच्या काळात आंध्रप्रदेशात या चळवळीने आपली पाळमुळ रोवायला सुरुवात केली..तसेच महाराष्ट्राच्या अतिदुर्गम समजल्या गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातही ही चळवळी पोहोचली.....हे दोन्ही जिल्हे जंगल आणि  नैसर्गिक साधनसंपत्ती  नटलेलं आहे..तेंदूपत्ता ,पेपरमिल्स आणि खनिज खाणी या परिसरात आहेत...आणि त्याचा फायदा नक्षलवादी चळवळीला होतआहे... 60 च्या दशकात जे नक्षलवादी शोषणाविरुध्द उभे ठाकले होते तेच आता शोषणकर्ते बनल्याचं चित्र आहे....भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,बल्लारपूर आणि  गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडं पैसा आहे...तसेच   अत्याधुनिक शस्त्रास्त्रही त्यांच्या हाती  आली आहेत..पैसा आणि शस्त्रांच्या जोरावर नक्षलवाद्यांनी रेड कॉरीडॉरच्या  नावाखाली  देशातल्या 630 पैकी 180 जिल्ह्यात आपलं नेटवर्क तयार केलं आहे....खरं तर ही चळवळ रोखण्याऐवजी त्यांना खतपाणी घालण्यातच अनेकांना रस असल्याचं एकंदरीत चित्र निर्माण झालय...आणि त्यामुळेच नक्षलवाद्यांच्या  क्रांतीचा रंग लाल झालाय.. तो फक्त दडपल्या गेलेल्या निष्पाप आदिवासींच्या रक्तानं......

केवळ राज्यातच नाहीतर देशभरात नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्यायत.. भुसुरुगाचे स्फोट आणि बंदची हाक देणा-या नक्षलवाद्यांनी आता अपहरणच्या माध्यमातून सौदेबाजीला सुरुवात केलीय.. ओडिशातील आमदार झिना हिकाका यांचे अपहरण करुन त्यांची सुटका करण्यात आली.. आपल्या मागण्यांसाठी अपहरण करण्याची नक्षलवांद्याची नवी अपहरणनीती आता सगळीकडेच दिसू लागलीय..
 
14 मार्चला दोन इटालियन पर्यटकांचे अपहरण
24 मार्चला ओदिशातील आमदार झिना हिकाकाचे अपहरण
21 एप्रिलला छत्तीसगडमधील सुकामचे जिल्हाधिकारी एलेक्स मेनन यांचे अपहरण
 
अवघ्या दोन महिन्यातल्या या घटनांनी पोलिस- प्रशासन आणि सर्वसामान्यही हतबल झालेयत.. आपल्या मागण्यांसाठी बंद आणि भुसुरुंगाचे स्फोट घडवणा-या नक्षलवाद्य़ांनी आता अपहरणाची खेळी करत आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यास सुरुवात केलीय.. गडचिरोलीत नक्षलवाद्याचा खरा चेहरा मात्र समोर यायाला सुरुवात झालीय.. आपली लढाई ही आदिवासी आणि गावक-यांसाठी आहे अस भासवत हत्या करुन गावक-यांमध्ये आपली दहशत पसरावयाची आणि प्रशासनानं आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी अपहरण करायचं हे सूत्र नक्षल्यांनी राबवलय..

गेल्या काही दिवसात नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी राज्याच्या गृहखात्याने नक्षलविरोधी मोहिमेचा धडाका लावलाय.. त्याला रोकण्यासाठी आता नक्षलवाद्यानी या रक्तरंजित पर्वाकडे पुन्हा वाटचाल सुरु केलीय..आजपर्यत माओवाद्याचा बुरखा पांघरलेल्या नक्षलवाद्यानी अपहरण करा आणि आपल्या मागण्या मान्य करा या हुकूमी पद्धतीचा वापर करायला सुरुवात केलीय.
 
14 मार्चला ओडिशात क्लॉडिओ कोलॅंजेलो आणि पोओलो बोस्कुस्को या इटालियन पर्यटकांचे माओवादी नक्षलवाद्यानी अपहरण केले. माओवाद्याचा म्होरक्या सव्यसाची पांडाची पत्नी शुभश्री दास हिची ओडिशा सरकारने मुक्तता केल्यावर त्या दोन पर्यटकाना सोडून देण्यात आलं.24 मार्चला ओदिशातील बिजू जनता दलाचे आमदार झिना हिकाकाचे कोरापुट जिल्ह्यातून लक्ष्मीपूर गावातून अपहरण करण्यात आले होते. त्या बदल्यात 26 नक्षलवाद्याना सोडण्याची मागणी करण्यात आली होती. ओडिशा सरकारने पाच नक्षलवांद्याना सोडून देऊनही मागणी मान्य न झाल्यानं सरकार हतबल बनत चालले होते. अखेर झिनांचा निर्णय प्रजा कोर्टात घेण्याचं ठरले. या सभेत झिना यानी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आणि 26 एप्रिलला नक्षलवाद्यानी सुटका केलीय पण नक्षलवाद्यांसमोर मान तुकवून आमदारकीचा राजीनामा मात्र द्यावाच लागणार आहे..
 
21 एप्रिलला छत्तीसगडमधील सुकामचे जिल्हाधिकारी एलेक्स पॉल मेनन याचं नक्षलवाद्यानी अपहरण केलं. छत्तीसगडमधला दक्षिण बस्तर  नक्षलवादविरोधी कारवाया जोरात सुरु आहेत त्या थांबवण्याची मागणी करण्यासाठी मेनन यांचे अपहरण करण्यात आलं. नक्षलवाद्यांकडून सरकारी कर्मचारी आणि केंद्रीय राखील दलाच्या जवानांवर हल्ले केले जात आहे..गेल्या काही वर्षात या हल्ल्यांच प्रमाण वाढलं होत.. पण आता मात्र स्फोटक न वापरता अपहरणाची स्फोटक खेळी खेळण्याचा डाव नक्षलवादी करतायत.
 
लाल क्रांतीचा नारा देणा-या नक्षलवादाचा काळाकुट्ट चेहरा समोर आला आहे. गेल्या काही वर्षात  नक्षलवाद्यांकडून जवानांबरोबरच गावक-यांना टार्गेट करण्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.....जंगल प्रदेशाला लागून असलेल्या भूभागावर आपलं वर्चस्व कायम रहावं तसेच त्या भागात विकासाची किरणे पोहचू नये हाच या हल्ल्यामागचा नक्षलवाद्यांचा उद्देश आता समोर येवू लागलाय...या भागात विकास गंगा पोहोचल्यास आपल्या वर्चस्वाखाली असलेले लोक आपली साथ सोडतील याची भिती नक्षलवाद्यांना सतावते आहे..त्यामुळेच हत्या, बंद, जाळपोळ या दहशतीच्या माध्यमातून नक्षलवादी गावक-यांवर आपला प्रभाव कायम ठेवण्य़ाचा प्रयत्न करत आहेत.....नक्षली प्रभावाखाली असलेल्या  80 टक्के भूभागावर जंगल पसरलेलं आहे....या प्रदेशात आदिवासीचं प्रमाण मोठं आहे...दुर्गम भागात आजही मुलभूत सेवा सुविधा पोहोचलेल्या नाहीत...त्यामुळे स्थानिक जनतेच्या मनात व्यवस्थे बद्दल रोष आहे..आणि त्याचाच फायदा घेत  सशस्त्रक्रांतीचा विचार नक्षलवाद्यांकडून पद्धतशीरपणे आदिवासी भागात रुजवला जात आहे...आणि नक्षलवादी याच  भावनेचा फायदा करुन  घेत आहेत. प्रशासनाविषयी नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या मनातील भावना जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे..खरंतर सरकारकडून या भागासाठी विशेष  योजना चालविल्या जातात...पण आदिवासींचा विश्वास संपादन केल्य़ाशिवाय सरकारला नक्षलवादा विरुद्धची लढाई जिंकता येणार नाही. आणि यासाठी गावक-यांनाही विश्वासात घेणं महत्वाचं ठरलंय...
 
रस्ते, आरोग्य,शिक्षण , नवे तंत्रज्ञान या मुलभूत सुविधा त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे...मात्र ते आदिवासींपर्यंत पोहोचू न देण्याचा काम नक्षलवादी करत आहेत...आदिवासी भागात खोलवर रुजलेल्या या चळवळीने आता शहरी भागातही पाळमुळं रोवायला सुरुवात केली...राज्याची सांस्कृतीक राजधानी पुणे आणि डोंबिवली या शहरात त्यांचा वावर वाढल्याचं  गेल्या दोन - तीन  वर्षात उघड झालंय. हे केवळ गडचिरोलीच्या जंगलात चाललय या भ्रमातून सरकारनं आता बाहेर पडायला हव.. सरकारी व्यवस्थेवरचा विश्वास उडत चाललेल्या शहरी भागातील लोकांना हाताशी धरून नक्षलवादी आपलं जाळं तयार करत आहेत...नक्षलवाद्यांनी सुरु केलेल्या अपहरण- रणनितीची राजकारणी आणि प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे..

नक्षलवाद रोखण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहेत...मात्र त्या योजना नक्षलग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत..तसेच तिथल्या नागरिकांच होणारं शोषण आजही थांबलं नाही...त्यामुळेच गडचिरोली सारख्या दुर्गम भागात आजही नक्षलवाद्यांचा कारनामे सुरुच आहेत..गडचिरोली..... हा गड आहे... नक्षलवाद्यांचा ......दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात 80च्या दशकात  माओवाद्यांच्या एका पथकानं पहिलं पाऊल ठेवलं ...तेव्हांपासून  आज पर्यंत हा भाग नक्षलवाद्यांच्या वर्चस्वाखाली राहिला आहे. राजकारणी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळं या भागात मुलभूत सेवासुविधांचा आभाव आहे...त्यामुळं नक्षलवाद्यांना  जनतेचा पाठिंबा मिळत आहे. नक्षलग्रस्तभागात आजही परिस्थिती जैसे- थे आहे..आणि त्यामुळं नक्षलवादाचा बिमोड करण्यात सरकारला यश मिळतांना दिसत नाही..नक्षलवाद हा कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न नसून तो समाजीक प्रश्न असल्याचं अभ्यसकांच म्हणणं आहे.
 
सीआरपीएफचे जवान नेहमीच  नक्षलवाद्यांच्या निशाण्य़ावर  राहिले आहेत....पण गेल्या काही वर्षात नक्षलवादी चळवळीत बराच बदल झाल आहे..नक्षलग्रस्त भागात सरकारकडून चालविल्या जाणा-या विविध योजनांमधील काही हिस्सा नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. नक्षलवाद्यांनी आपल्या प्रभावाखाली असलेल्या भागात एक समांतर य़ंत्रणाच उभारली आहे...एकीकडं नक्षलवाद्यांचा प्रभाव वाढत असतांना त्यांना रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कडक उपाय योजना करण्याची आवश्यता आहे..मात्र या दोन्ही मध्ये समन्वयाचा अभाव असून त्यात एकसुत्रीपणा आणण्याची आवश्यकता आहे.
 
 

First Published: Thursday, April 26, 2012, 23:45


comments powered by Disqus