'झी 24 तास'चा दणका, आंबेडकरांचं स्मारक होणार - Marathi News 24taas.com

'झी 24 तास'चा दणका, आंबेडकरांचं स्मारक होणार


www.24taas.com, तळेगाव

 
 
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं तळेगावात स्मारक होणार आहे. झी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आलीय. तरीही बाबासाहेबांचं एक स्वप्न अपुरच राहिलं आहे.
 
 
तळेगावातली बुद्ध लेणी आणि प्रसन्न वातावरण यामुळं बाबासाहेब आंबेडकर इथं कायम येत असत... त्यांनी या ठिकाणी बंगलाही बांधला होता. इथेच नालंदा विश्व विद्यालयाच्या धरतीवर विद्यापीठ उभारण्याचं त्यांचं स्वप्न होतं... त्यासाठी त्यांनी ८७ एकर जमीनही खरेदी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर त्यांचे पुत्र यशवंत आंबेडकर यांनी ही जमीन सरकारला परत दिली आणि अखेर जमीन विकली गेली. हे वृत्त झी 24 तासनं प्रसारित केलं होतं. बाबासाहेबांच्या बंगल्याच्या ठिकाणी किमान त्यांच स्मारक व्हावं ही आंबेडकर अनुयायांची मागणीही झी 24 तासनं उचलून धरली.
 
 
झी 24 तासच्या या पाठपुराव्यानंतर अखेर बाबासाहेबांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय. बाबासाहेबांचा बंगला नगर परिषदेन ताब्यात घेतला आहे. ज्या बाबासाहेबांनी राज्य घटना लिहिली त्या बाबासाहेबांचं एक स्वप्न विकलं गेल्याची खंत कायम रहाणार आहे. पण किमान बाबासाहेब आंबेडकर ज्या वास्तूत रहात होते त्या वास्तूचं स्मारक लवकरात लवकर व्हावं, ही अपेक्षा आहे.

First Published: Wednesday, May 2, 2012, 10:40


comments powered by Disqus