लादेनची १० रहस्य - Marathi News 24taas.com

लादेनची १० रहस्य

www.24taas.com, मुंबई
एक वर्षापूर्वी अफगाणिस्तानातील एका एअरबस स्टेशनवरुन अमेरिकेच्या दोन हेलिकॉप्टर्सनी उड्डाण घेतलं..आणि काही वेळातच ते पाकिस्तानातील अबोटाबादमधल्या सैन्य अकादमी जवळ जाऊन पोहोचलं..अमेरिकेच्या कमांडोंनी त्या परिसरातील एका इमारतीवर हल्ला चढवला..रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास अबोटाबादपासून सात हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या अमेरिकेत एक खबर जाऊन पोहोचली...ती खबर होती जगातील कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन ठार झाल्याची...ओसामा मारला गेला खरा पण तो आपल्या मागे सोडून गेलाय अनेक रहस्यं...
 
ऑपरेशन 'जेरेनिमा' या नावाखाली अमेरिकेनं केलेली कारवाई हे अमेरिकेचं अलिकडच्या काळातलं सर्वात मोठं यश मानलं जातंय..लादेनचा खात्मा करण्यापूर्वी अमेरिकेच्या कमांडोनी त्याला एक संदेश ऐकवला...पण त्या कारवाईलाही अपयशाची किनार होतीच..
 
हवेलीमुळे कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर ?
दहावर्ष जंगजंग पछाडल्यानंतर अमेरिकेनं पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याला ठार केलं...बरोबर एका वर्षापूर्वी 1 आणि 2 मेच्या दरम्यान जगातील एक मोठी घटना घडली होती...अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडोजनी ते ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडलं होतं..मात्र त्या सफल कामगिरीलाही अपयशाची एक बारीक किनार होती..
लादेनचा खातमा करण्यासाठी अमेरिकेनं आखलेल्या ऑपरेशनला सुरुवात झाली आणि त्यांचं ब्लॅक हॉक एमएच - 60 हे हेलिकॉप्टर जमिनीपासून काही फुट उंचीवर असतांना कोसळलं..ही घटना आकाशात दोन मैल उंचीवर असलेल्या अमेरिकेच्या ड्रोन आरक्यू - 170 विमानाने टिपली होती...त्याचवेळी अबोटाबादपासून सात हजार किलोमिटर अंतरावर अमेरिकेतल्या एका कंट्रोलरुममध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे ऑपरेशन पडद्यावर पहात होते... ब्लॅक हॉक एमएच - 60 हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं पाहून ओबामा आणि त्यांची टीम अस्वस्थ झाली होती.. ती परिस्थीती पहाताच कंट्रोल रुममध्ये असलेले ऑपरेशन कमांडर मॅकराव्हेन हे सीईए प्रमुख लियोन पनॅटा यांना म्हणाले.. तुम्ही चिंता करु नका, आम्ही हे मिशन पुढे नेहणार असून , प्लॅन 'बी' तयार आहे
प्लॅन 'बी'नुसार दुस-या हेलिकॉप्टरच्या मदतीने अमेरिकेचे कमांडो लादेन रहात असलेल्या इमारतीच्या छतावर उतरले..लादेनच्या इमारतीची रचना विशिष्ट प्रकारे करण्यात आली होती..त्यामुळे या ऑपरेशनच्या प्लॅन 'ए'चा पहिला टप्पा अयशस्वी ठरला होता..मात्र लादेन त्या इमारतीत राहात असल्याचा संशय 2011मध्ये अधिकच बळावला होता..
लादेनचा खातमा करण्यासाठी अमेरिकेच्या कमांडोनी अफगाणिस्तानातील एका ठिकाणी लादेनच्या हवेलीची प्रतिकृती तयार करुन तिथं हल्ल्याचं प्रशिक्षण घेतलं होतं..मात्र त्या प्रशिक्षणादरम्यान झालेल्या चुकीमुळेच प्रत्यक्ष हल्ल्या दरम्यान अमेरिकेचं हेलिकॉप्टर कोसळल्याचा संशय आहे.. कमांडोंनी प्रशिक्षण घेतांना भिंतींऐवजी काटेरी कुंपनाचा वापर करुन हेलिकॉप्टर लँडिंगचा सराव केला होता..पण प्रत्येक्षात लादेनच्या इमारतीला असलेल्या भिंतींमुळे त्या परिसरातील हवा तापली आणि कमांडोच्या हेलिकॉप्टरचं संतुलन गेलं..अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर क्रॅश करण्यावाचून पायलेट समोर दुसरा पर्य़ाय उरला नव्हता....
 
स्व:तच्या चुकीमुळे मारला गेला लादेन ?
लादेनने जर चूक केली नसती तर कमांडोंनी आखलेला प्लॅन बी ही फसला असता..अबोटाबादमधल्या त्या इमारतीला केवळ एक खिडकी होती आणि त्या खिडकी असलेल्या खोलीत लादेन राहात होता..त्या दिवशी लादेन खिडकी बंद करण्यास विसरला आणि त्याच मार्गाने कामांडो इमारतीत शिरले..धोक्याच्या क्षणी इमारतीच्या छतावर जाण्याचा मार्ग लादेनने तयार करुन ठेवला होता...मात्र कमांडो छातावर उतरल्यामुळे त्याचा तोही मार्ग बंद झाला होता..
 
कमांडोंनी लादेनला ऐकविला 'अमेरिकेचा संदेश '
प्लॅन - ए नुसार लादेनचा खातमा करण्याची जबाबदारी जमीवर उतरलेल्या कमांडोंवर होती..ते इमारतीत शिरले आणि वरच्या मजल्यावर पोहताच सील कमांडोंनी मोठ्या आवाजात एक संदेश वाचून दाखवला...
 
ईश्वर आणि देशासाठी जेरोनिमो! जेरोनिमो! जेरोनिमो!
हा संदेश दिल्यानंतर अमेरिकेच्या कमांडोने लादेनवर रोखलेल्या आपल्या अत्याधुनिक बंदूकीचा चाप ओढला..एकापाठोपाठ एक अशा दोन गोळ्या त्याने झाडल्या..5 .46 मिलिमीटरची पहिली गोळी सूसू करीत लादेनच्या छातीत घूसली..तर एका क्षणात दुस-या गोळीने लादेनच्या डोळ्याच्यावरचा भागाचा वेध घेतला..आणि पापणी लवते न लवते तोच जगातील एक कुख्यात दहशवादी निर्जीव होऊन जमीनीवर निचपत पडला ...
9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानावर भीषण हल्ल्या चढवला..त्या हल्ल्यात लादेन ठार झाल्याचं बोललं जात होतं...पण त्याचा मृतदेह न मिळाल्यामुळं शोध सुरुच होता..2002मध्ये तो पाकिस्तानात जाऊन लपला...अबोटाबादमध्ये त्याने जिवनाचा भरपूर आनंद घेतला पण मृत्यूनेही त्याला शोधून काढलंच...
लादेनच्या मृत्यूला आता एक वर्ष पूर्ण झालंय..मात्र त्याच्या मृत्यूनंतर एक-एक रहस्य बाहेर येऊ लागली आहेत..अमेरिकेच्या कमांडोंनी हल्ला केल्यानंतर लादेनला मृत्यूची चाहूल लागली होती..
 
मृत्यूला तयार होता लादेन !
लादेनची मुलगी मरियम त्याच्या खोलीत गेली त्यावेळी तो अत्यंत शांत होता..त्यावेळी मरियम लादेनला म्हणाली 'मी
स्फोटांचा आवाज ऐकलाय..त्यावर लादेन तिला म्हणाला तु इथून जा, तुझ्या खोलीत जाऊन झोप...तुझ्या खोलीतील कोणताच दिवा लाऊ नकोस अशी ताकीदही त्याने मरियमला दिली..
पण त्यांची ती धडपड व्यर्थ ठरली..आजू-बाजूच्या परिसरातील घरांचे मालवले होते..केवळ लादेनच्या इमारतीतील दिवे सुरु होते..त्यावेळी अमेरिकेचे कमांडो इमारतीत शिरले होते..तो पर्यंत लादेनची मुलगी तिच्या खोलीत गेली होती..
 
 
एका छताखाली 3 पत्नी आणि 13 मुलं
लादेची सर्वात लहान पत्नी अमल ही शेवटच्या क्षणा पर्यंत त्याच्या सोबत होती..तिच्या समोरच कमांडोने लादेनला गोळ्या घातल्या....या घटनेनंतर पाकिस्तानी अधिका-यांनी लादेनच्या तीन पत्नी आणि 13 मुला-मुलींना ताब्यात घेतलं..काही दिवसानंतर त्या सर्वांना पाकिस्तानाबाहेर पाठविण्यात आलं..
लादेनच्या इमारतीत चार गॅस कनेक्शन आणि चार वीज मिटर आढळून आले होते..त्यावरुन ती एक इमारत असली तरी चार परिवार वेगवेगळे रहात असल्याचं उघड झालं..
लादेन केवळ दहशतवादी संघटनाच नाही तर तीन पत्नींसोबत आपलं कुटुंबही चालवित होता..
अमेरिकेला गुंगारा देणारा लादेन बनला 5 मुलांचा पिता
9/11च्या अमेरिकेवर केलेल्या हल्लानंतरही लादेनचं कुटुंब वाढतच होतं....2001ला लादेन अमेरिकेचा ससेमिरा टाळत लपत फिरत होता..त्यावेळी कंधारमध्ये त्याची मोठी मुलगी साफिया हिचा जन्म झाला..त्यानंतर तो 2003मध्ये पाकिस्तानच्या हरिपूरमध्ये येवून लपला...एका सरकारी रुग्णालयात लादेनच्या पत्नीने आशियाला जन्म दिला..2004मध्ये हरिपूरच्या सरकारी रुग्णालयातच त्याचा मुलगा इब्राहिमचा जन्म झाला..2005मध्ये लादेनने अबोटाबादच्या या इमारतीत आश्रय घेतला..2006मध्ये त्याच्या जैनब नावाच्या मुलीचा जन्म झाला..2008मध्ये त्याचा मुलगा हुसैन याचा जन्म झाला..अशा प्रकारे 10 वर्षात लादेनच्या कुटुंबाचा विस्तार झाला होता..त्याच्या मुलांचा पाकिस्तानच्या सरकारी रुग्णालयात जन्म होवूनही पाकिस्तानला त्याची माहिती नव्हती हे विशेष..
 
लादेनच्या शेवटच्या क्षणी त्याची सर्वात लाकडी पत्नी अमल त्याच्या सोबत होती..ती 17 वर्षाची असतांना लादेनने तिच्याशी निकाह केला होता..लादेनला एकून पाचजणींशी निकाह केला होता...पण काही वर्षांपूर्वी लादेनचे एका अभिनेत्रीशी प्रेमसंबंध होते
नाजवा गहनम, खादजिया शरीफ़, खैरियाह सबर, सिहाम सबर, अमल अल सदाह  ही सगळी नाव ओसमा बिन लादेनच्या पत्नीची आहेत..त्याच्या पाचव्या नंबरच्या पत्नीने निकाहनंतर अवघ्या 48 तासातच तलाक घेतला होता..अलम ही लादेनची सर्वात लहान आणि आवडती पत्नी होती..
अडीच लाखांचा मेहर देऊन अमलशी निकाह
अमेरिकेतील प्रसारमाध्यमांच्या म्हणण्यानुसार लादेनच्या सांगण्यावरुन अलकायदाचा दहशतवादी राशद मोहम्मद सईद याने यमनीमध्ये अमलचं स्थळ शोधून काढलं होता..निकाह करण्यासाठी लादेनने अमलच्या कुटुंबाला 5 हजार डॉलर अर्थात अडिच लाख रुपय मेहेर दिला होता..2000साली लादेनने अमलशी कंधहारमध्ये
निकाह केला ..त्यावेळी अमल केवळ 17 वर्षाची होती..तर लादेन 44 वर्षाचा होता.. वयात अंतर असतांनाही त्यांतं एकमेकांवर नितांत प्रेम होतं..
 
पत्नींच्या भांडणामुळे वैतागला होता लादेन
अमल लादेनसोबत सर्वाधिक वेळ घालवीत असे..त्याच्या मृत्यूच्यावेळीही ती त्याच्या सोबत होती..लादेनच्या इतर पत्नींना मात्र अमल विषयी आकस होता..पण लादेन नेहमीच अमलची बाजू घेत असे..लादेनच्या मृत्यूनंतरही याच मुद्यावरुन अमल आणि लादेनच्या तीन नंबरची पत्नी खैरियाह सबर या दोघीमध्ये पाकिस्तानच्या तुरुंगात कडाक्याचं भांडण झालं होतं..कधी काळी लादेनचा अंगरक्षक म्हणून काम केलेल्या नासिर अल बहरीनेही आपल्या 'इन द शॅडो ऑफ बिन लादेन'या पुस्तकात लादेन पत्नींच्या भांडणामुळे पुरता वैतागला होता असं लिहिलं आहे..
 
ओसामा पडला होता प्रेमात ?
लादेन आणि अमलची प्रेम कहानी आता इतिहासात जमा झालीय..मात्र ऐकेकाळी लादेन एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता..सूडानची अभिनेत्री कोला बूफने आपल्या
'डायरी ऑफ द लॉस्ट गर्ल' नावाच्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे..1996मध्ये मोरक्कोमध्ये राहात असतांना लादेनशी तिचे प्रेम संबंध होते..एका हॉटेलात तिला बघीतल्यानंतर लादेनने तिचं अपहरण केलं होतं..चार महिने त्याने तिचं लैंगिक शोषण केलं...कोलाच्या पुस्तका दिलेल्या माहितीनुसार लादेनला हॉलिवूडची अभिनेत्री व्हिटनी ह्यूस्टन आवडत होती..तसेच अश्लिल फिल्म पहाणे हा त्याचा छंद होता.. .
अश्लील फिल्म पाहून वेळ घालवत असे लादेन
अबोटाबादमध्ये लादेनच्या घरात आढळून आलेल्या पुराव्यावरुन
कोलाच्या या दाव्यात तथ्य़ असल्याचं उघड झालंय..लादेनच्या घरातून अनेक अश्लिल फिल्मच्या सीडीज आणि छायाचित्र मिळाले आहेत..
लादेनला ठार करुन अमेरिकेने अलकायदाच्या धोक्यापासून स्व:ताची सूटका करुन घेतलीय..पण त्याच्या खातम्यानंतर अलकायदाने पाकिस्तानात आपल्या नव्या कमांडरची नियुक्ती केलीय आणि धक्कादायक बाब म्हणजे अलकायदाचा त्या नवा कमांडरचा काश्मीर मधील अनेक दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता....
 
2 मे 2011 अबोटाबादमध्ये अमेरिकेचा हल्ला
10 वर्षाच्या शोधमोहिमेनंतर जगातला सर्वात मोठा दहशतवादी ओसामा बिन लादेन याला ठार करण्यात अमेरिका यशस्वी झाली....आता अमेरिकेने 2014 पर्यंत अफगानिस्तानातून फौजा मागे घेण्याचा निर्णय जाहिर केलाय..पण लानेदनच्या खात्म्यानंतर जगातला दहशतवाद संपलाय का? असा सवाल केला जात आहे..पण या प्रश्नाचं उत्तर सगळ्यानांच ठावूक आहे..
अफगानिस्तानात नुकतेच भीषण दहशतवादी हल्ला झाला...ओसामानंतर अल कायदाचा नंबर दोनचा नेता अल जवाहिरी याने अल कायदाची सुत्र हाती घेतलीयेत..मात्र मोठमोठे दावे करूनही अमेरिका त्याचा शोध घेवू शकली नाही..तालिबानचा प्रमुख मुल्ला उमरही अमेरिकेच्या हाती लागू शकला नाही...अमेरिकी फौजा अफगानिस्तानातून माघारी गेल्यावर आम्हाला कुणीच रोखू शकणार नाही अशी दर्पोक्ती तालिबानी नेत्यांनी केलीय... दहशतवादाविरूध्दची लढाई अर्ध्यात सोडून देणाची अमेरिकेची ही रणनीती भारतासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.
 
अल कायदाने पाकिस्तानातील आपला नवा कमांडर नियुक्त केला आहे...धक्कादायक बाब म्हणजे काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्याशी त्या कमांडरचा संबंध आहे..
भारताला अल - कायदाचा धोका
फरमान अली सिनवारी पाकिस्तानातील अल-कायदाचा नवा कमांडर
सिनवारीचे चार भाऊ हरकत - उल - अन्सारीचे सदस्य
जम्मू - काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यामागे हरकत - उल - अन्सारी
पाकिस्तानातील अलकायदाचा कमांडर म्हणून सिनवारीच्या नियुक्तीमुळे 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याला आणखी बळ मिळणार आहे..26/11च्या हल्ल्याला लादेनने सहमती दर्शवली होती असा गौप्यस्फोट
ओसामा बिन लादेनच्या घरात आढळून आलेल्या कागद पत्रावरुन अमेरिकेनं केला होता..भारताविरुद्ध नेहमीच गरळ ओकणा-या हफीज सईदच्या नापाक मन्सुब्याची भारताला चांगलीच जाण आहे..काश्मीरमध्ये जेहाद छेडण्याचं ष़डयंत्र त्याने रचलं आहे.. दहशतवादाविरुद्धचं युद्ध अर्धवट सोडून आफगाणिस्तानातून माघार घेण्याचा अमेरिकेचा निर्णय केवळ अफगाणिस्तानासाठीच नाही तर भारतासाठीही धोकादायक ठरण्याची शक्यता आहे...
 
 
लादेनच्या हवेलीतून अमेरिकेच्या कमांडोंना मोठ्या प्रमाणात दस्तऐवज मिळाले आहेत..त्या दस्ताऐवजाच्या माध्यमातून अनेक रहस्य उलगडणार आहेत...अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच विमान स्फोटात उडवूण्याचा कटही लादेननं आखला होता...
विमानांचं अपहरण करुन त्याचा क्षेपणास्त्राप्रमाणे वापर करणं किंवा अबोटाबादमध्ये आधुनिक दूरसंचार तंत्रज्ञानाचा वापर न करता अलकायदा सारखी दहशतवादी संघटना चालविण्याची करामत लादेननं केलीय..तसेच अमेरिकेवर हल्ला केल्यानंतर दहा वर्ष तो अमेरिकेच्या हाती लागला नाही..त्यामागचं कारण म्हणजे त्याने तंत्रज्ञानापेक्षा साध्यासाध्या पद्धतीचा अवलंब केला..इंटरनेट कनेक्शन नसतांनाही त्याने अल कायदाच्या कारवाया खंड पडू दिला नाही...
मृत्यू दिसत होता लादेनला !
लादेनच्या इमारतीततून मोठ्याप्रमाणात दस्ताऐवज जप्त करण्यात आलेत...सीआयएला 100 फ्लॅश ड्राईव्ह,5 कॉम्प्यूटर,लॅपटॉप,तसेच हस्तलिखीत मिळाले आहेत..अलकायदाच्या सहकार्यांना पाठविलेले संदेश लादेनने स्व:ता टाईप केले होते..ते संदेश मेमरी कार्डाच्या फ्लॅश ड्राईव्हवर सेव्ह करुन ते कुरियरच्या हवाली केलं जात असे..लादेनचा कुरिअर शेजारच्या शहरात जाऊन इंटरनेटच्या माध्यमातून लादेनचा संदेश संबंधीतांपर्यंत पोहोचवित असे..तसेच लादेनच्या साथिदारांकडून येणारे संदेश फ्लॅश ड्राईव्हवर सेव्ह करुन कुरिअर ते लादेन पर्यंत पोहोचवित असे..इंटरनेटचा अशा प्रकारे वापर करुनही अमेरिकेला त्याचा ठावठिकाणा लागला नाही..अबोटाबादच्या आपल्या हवेलीतून लादेन कधीच बाहेर पडत नसे..पण टीव्हीच्या माध्यमातून जगभरातील बातम्यांवर त्याची बारीक नजर असे..लादेनकडं टीव्ही, डीटीएच कनेक्शन,आणि वीज कनेक्शन होतं....ओबामा राष्ट्रपती झाल्याची खबर त्याने टीव्हीवरच बघीतली होती...त्यानंतर त्याने एअर फोर्सवन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं विशेष विमान बॉम्बस्फोटात उडून देण्याचा प्लॅन आखला होता..पण त्याचा तो प्लॅन तडीस जाऊ शकला नाही..
लादेनने लिहिलेला पत्रातून त्याचा ओबामावरचा राग स्पष्ट होतोय.. अलकायदाचा नाय़नाट म्हणजे दहशतवादाचा अंत असा रंग ओबामा प्रशासनाने दिल्यामुळे लादेन ओबामांवर नाराज होता...अमेरिकेच्या या खेळीमुळे मुस्लिम जगतात अलकायदाची नाचक्की होत असल्याचं लादेनला वाटत होतं..त्यामुळेच आपल्या संघटनेचं नाव बदल्याचा विचार तो करत होता..अलकायदाचा प्रचार करणा-या व्हीडीओ अमेरिकेतील प्रसार माध्यमांना पाठविण्याची त्याची योजना होती.. पण हा सगळा खटाटोप करण्यापूर्वीच अमेरिकेच्या सील कमांडोजनी त्याला गाठून यमसदनी धाडली...
 

First Published: Wednesday, May 2, 2012, 21:21


comments powered by Disqus