Last Updated: Friday, May 4, 2012, 22:57
www.24taas.com, मुंबई उमदा , देखणा, आणि शक्तीचं प्रतिक असलेला प्राणी म्हणजे वाघ...त्याची ऐट काही वेगळीच असते ....वाघाची एक झलक पाहण्यासाठी वन्यजीव प्रेमी तासन् एका जागेवर तास खिळून बसतात ...मात्र गेल्या पाच महिन्यात या रुबाबदार प्राण्यावर संकट घोंगाऊ लागलंय...गेल्या पाच महिन्यात चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात शिका-यांनी वाघांचा घात केलाय..
जंगलात त्याचा मुक्त संचार आहे... त्याच्या पावलांची चाहूल लागताच इतर प्राण्यांचे कान टवकारल्या शिवाय राहात नाहीत.. त्याच्या डरकाळीने जंगलाचा कोणा न कोणा थरारून जातो. कारण अवघ्या जंगलावर त्याचं अधिराज्य आहे. महाराष्ट्रतल्या अभयारण्यात आजही वाघाची डरकाळी ऐकायला मिळते.वाघ मोठ्या चतुराईने आपलं सावज हेरतो ... एकदा का सावज त्याच्या टप्प्यात आलं की ते त्याच्या तावडीतून सूटनं अशक्य असतं.. जंगलावर राज्य करणा-या वाघावर मात्र शिका-याची काळी छाया गेल्या काही वर्षात गडद होवू लागलीय..एकापाठोपाठ एक वाघाच्या शिकारीच्या घटना घडत आहेत...
जानेवारी 2012ठिकाण : झरण, चंद्रपूरवीजेचा शॉक देऊन वाघाची शिकार फेब्रुवारी 2012ठिकाण : लोहारा, चंद्रपूरएका वाघिणीचा मृत्यू मार्च 2012ठिकाण :चंद्रपूर शहरालगतएका वाघाचा मृत्यू एप्रिल 2012ठिकाण : पळसगावसापळा लावून वाघाची शिकार एक वाघ जखमी------------------- मार्च 2012ठिकाणी : केळापूर, यवतमाळएका वाघाचा मृत्यू गेल्या वर्षभरात एकट्या महाराष्ट्रात वाघाच्या शिकारीच्या या घटना घडल्या आहेत...कधी सापळा लावून तर कधी तारेचा फास लावून तर कधी वीजेचा शॉक देवून वाघाची शिकारा केली जातेय. त्यामुळे जंगलात मुक्तपणे संचार करणा-या या प्राण्याचं जीवन धोक्यात आलंय...शिका-याकडून कधी त्याचा घात होईल याचा नेम नाही. विदर्भात मेळघाट, ताडोबा- अंधारी आणि पेंच या ठिकाणी व्याघ्रप्रकल्प आहेत आणि वाघाच्या शिकारीच्या घटनाही याच परिसरात सतत घडत आहेत. गेल्या पाच महिन्यात राज्यात पाच वाघांना ठार करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्राण्याच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह उभं राहीलय. वाघांची शिकार रोखण्याची जबाबदारी ही वन संरक्षकांची आहे. पण वाघाच्या शिकारीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत.
खरं तर एक चपळ शिकारी म्हणून ज्याची ख्याती आहे तो वाघचं आज शिकार ठरु लागला आहे. वाघाची शिकारी करण्यासाठी शिकारी टोळ्या अत्यंत क्रूर पद्धतीचा वापर करतात. एकदा का वाघ त्यांच्या सापळ्यात अडकला की त्याचा मृत्यू अटळ असतो.कारण शिका-यांनी वाघाचा पुरता अभ्यास केला आहे...
आंतराष्ट्रीय पातळीवर वन्यप्राणांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्यांची वक्रदृष्टी महाराष्ट्रातल्या व्याघ्र प्रकल्पावर वळली आहे. त्यामुळे या अभयारण्यातील वाघांवर संकट घोंघावू लागलं आहे. 27 एप्रिलला चंद्रपूरच्या पळसगावात घडलेली घटना मोठी धक्कादायक आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाशेजारी शिकारीचा तो प्रकार घडलाय. या शिकारी मागे वन्यप्राणांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीचा हात असल्याची माहिती उघड झालीय. मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील दोन टोळ्या वाघाच्या शिकारीसाठी कुख्यात आहेत.
शिकारीची ही घटना संरक्षित वनजंगलात घडल्याने महाराष्ट्राच्या वनविभागासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते. वाघाची शिकार करुन त्यांच्या अवयवांची मोठी किंमतीला विक्री करणे हा शिकारी टोळ्यांचा परंपरागत व्यवयाय आहे. वाघाच्या अवयवांना मोठी किंमत असल्यामुळे शिकारी टोळ्या जीवावर उदार होवून वाघांची शिकार करतात..अंतरराष्ट्रीय़ बाजारात साधारणतः एका वर्षाच्या वाघाची किंमत 28,000 अमेरिकन डॉलर्सच्या घरात आहे ...तर वाघाचे अवयव 50,000 अमेरिकन डॉलर्सला विकले जातात..
महाराष्ट्रातील नागपुरजवळचा पेंच,अमरावतीचा मेळघाट आणि चंद्रपुर परिसरातला ताडोबा या व्याघ्र प्रकल्पात वाघांचा मुक्त संचार आहे...हे तीनही व्याघ्र प्रकल्प मध्यप्रदेश जवळ असल्यामुळे शेजारच्या राज्यातून शिकारी इथं येतात..शिकाऱ्यांनी वाघाच्या सवयीविषयीचा अभ्यास केल्यामुळे वाघ सहज त्यांच्या सापळ्यात अडकतो ..अभय अरण्यातल्या पाणवठ्यात विषारी द्रव्य टाकणे,लोखंडी सापळ्यांचा वापर करणे,वीजेचा शॉक देणे, बंदुकीची गोळी झाडूने अशा विविध पद्धतीचा वापर करुन वाघाची शिकार केली जाते.
वाघाची शिकार केल्यानंतर त्याची नखं, कातडी आणि हाडे यांची विक्री केली जाते. चोरी छुपे हा व्यापार केला जातो...शिकारी टोळ्यांना वाघाच्या छुप्या मार्केटची माहिती असल्यामुळे ते शिकारी करण्यास मागेपुढे पहात नाहीत..कारण शिकारीनंतर मोठी रक्कम मिळणार हे त्यांना ठावूक असतं....काळ्याबाजारात वाघाच्या अवयवांना मिळणारी किंमतच वाघाच्या जिवावर उठली आहे. वाघाची शिकार करुन शिकारी वाघाचे अवयव घेऊन पसार होतात...त्यांना रोखण्यासाठी वन विभागाकडून अधिक कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता आहे..

ताडोबातील बांबूचं जंगल हे वाघाच्या प्रजननासाठी पोषक असल्याचं मानलं जातंय...ताडोबातील वाघाची संख्या वाढच असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय,..पण शिकारीच्या घटनाही काही कमी होत नाहीत...त्यामुळे वाघोबाचं भवितव्य टांगणीला लागलंयय..
महाराष्ट्राच्या विविध व्याघ्र प्रकल्पात दृष्टीस पडणारे वाघ गेल्या काही महिन्यात शिका-यांच्या टार्गेटवर आले आहेत...2011च्या व्याघ्रगणनेनुसार जगभरात चार हजार वाघ शिल्लक असून त्यातले पन्नास टक्के वाघ एकट्या भारतात आहे..महाराष्ट्रातल्या व्याघ्र प्रकल्पात जवळपास 169 वाघ आहेत....एकीकडं शिकारीच्या घटना वाढत असतांनाच ताडोबातील वाघांची संख्या मात्र वाढतेय...
ताडोबातील बांबूचं जंगल वाघाच्या प्रजननासाठी पोषक असल्यामुळे वाघाच्या संखेत वाढ होत असल्याचं अभ्यासकांचं मत आहे.... वाघाच्या जीवन पद्धतीचा विचार केल्यास प्रत्येक नर वाघाचा आपला स्वतंत्र परिसर असतो...त्यामुळे इतर नर वाघांना तिथून दूर जाण्यावाचून पर्याय उरत नाही...अशा वेळी वाघ संरक्षीत क्षेत्राबाहेर प़डतात आणि शिकारी किंवा गावकऱ्यांशी त्यांचा सामना होतो..
वाघांना केवळ शिका-यापासून धोका आहे असं नाही तर जंगलात राहणारे तसेच जंगलाला लागून असलेल्या गावांमुळेही वाघाचं जिवन धोक्यात आलं आहे. एक सर्वेक्षणानुसार देशातील जवळपास 30 टक्के वाघ हे संरक्षित क्षेत्राच्या बाहेर आहेत..तर वनविभागाने केवळ व्याघ्रप्रकल्पांवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे प्रकल्पाबाहेरच्या वाघांचं संरक्षण करण्यात अपयश येत आहे.खरंतर वाघ वाचले तर जंगलं वाचतील...जंगल वाचलं तर जलस्त्रोत वाचतील..त्यामुळे एकप्रकारे व्याघ्र प्रकल्प हा जंगल संरक्षण प्रकल्पचं आहे...वाघाच्या संरक्षणासाठी तसेच त्यांची संख्या वाढविण्यासाठी कसून प्रयत्न करण्याची आवश्यता आहे....
1970 पासुन सरकारचे सातत्याने प्रयत्न, अनेक अभियानं कोट्यवधीचा खर्च करूनही वाघावरचं संकट काही कमी झालेलं नाही.वन विभाग सरकारी पद्धतीने काम करतंय..पण वाघाची शिकार काही थांबण्याचं नाव घेत नाही.वाघ वाचविण्यासाठी आज पर्यत्न केले जात असले तरी त्यात म्हणावं तेव्हडं यश मिळतांना दिसत नाही...त्यामागे अनेक कारणं आहेत... देशातील वाघांच्या संरक्षणासाठी चार दशकांपूर्वी ख-या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली गेली होती.. 1970साली केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला होता...1973मध्ये व्याघ्र प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली..त्यामुळेच पुढे देशातील 9 जंगलांना व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषीत करण्यात आलं...वाघांचं संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सरकारी मशिनरी कामाला लागली..पण चाळीस वर्षापूर्वी देशात वाघाच्या संखेचा जो आकड होता तोच थोड्याफार फरकाने आजही कायम आहे...त्यावरुन वाघाच्या संवर्धनात किती प्रमाणात यश आलं हे कुणाच्याही सहज लक्षात येईल..वाघांच्य़ा संवर्धनात येणा-या अडचणींमध्ये वाघाचा कमी होत चाललेला अधिवास हे एक प्रमुख कारण मानलं जातंय....जंगल तोडीमुळे वाघांचा अधिवास कमी होत चालला आहे..

जंगलाखाली असलेलं क्षेत्र कमी होत असल्यामुळे वाघांचा प्रश्न बिकट बनत चालला आहे..देशातील 39 व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरील क्षेत्रात मोठं जंगल आहे...मात्र गेल्या पाच या जंगलाचं क्षेत्रफळ कमी झाल्याचं उघड झालंय....ही जंगलं नष्ट होण्यामागे अनेक कारणे आहेत...कोळसा खाणी आणि, विविध प्रकल्पांसाठी जंगल नष्ट करण्यात आली आहेत.. जंगल कमी होत चालल्य़ामुळे वाघाच्या संरक्षित क्षेत्रावरही मर्यादा येत आहेत..वाघांचा असुरक्षित क्षेत्रातील वावर त्यामुळे वाढला आहे...यापार्श्वभूमीवर वन विभागाच्या कामाच्या पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता असल्याचं वन्य़ जीव प्रेमींना वाटतय..
वन्य जीवांच्या संरक्षणासाठी वन विभागाकडून केली जात असलेली उपाय योजना अपुरी असल्याचं कर्मचा-यांच्या संख्येवरुन सहज लक्षात येईल...त्यामुळे भविष्यात सरकारने वन विभागाकडं अधिक लक्ष देवून वाघांच्या संरक्षणासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे..सरकारने वेळीच याची दखल न घेतल्यास शिका-याची शिकार होतच राहणार..
First Published: Friday, May 4, 2012, 22:57