दीपमाळेची सावली, अंतर्धान पावली! - Marathi News 24taas.com

दीपमाळेची सावली, अंतर्धान पावली!

www.24taas.com, कोल्हापूर
 
कोल्हापुरकरांना आज झिरो शॅडो डेच्या निमित्तानं ऊन-सावल्यांचा खेळ पहायला मिळाला. पंचगंगा नदी काठावरील पुरातन मंदिरांच्या अनोख्या रचनेमुळं याठिकाणी झिरो शॅडो डे अनुभवता आला.
 
या मंदिरांची रचनाच ऊन-सावलीचा अभ्यास करुन करण्यात आलीयत. त्यामुळं नदीपात्रातील दीपमाळेची सावली आज दिसलीच नाही. डोक्यावर सूर्य आल्यावर ही दीपमाळ पूर्ण सूर्यप्रकाशानं उजळून निघाली आणि त्यांची सावली गायब झाली. वर्षभरात वेगवेगळ्या ठिकाणी ७२ वेळा झिरो शॅडो डे होतो.
 
सध्या उत्तरायण चालू आहे आणि कोल्हापूर पावणेसतरा अक्षांशावर आहे. त्यामुळं 8 मे रोजी सूर्य डोक्यावर येतो. यावेळी कानाची सावली खांद्यावर पडते तर पूर्ण शरीराची सावली फक्त मानेभोवतीच राहते.
 

First Published: Tuesday, May 8, 2012, 22:13


comments powered by Disqus