'झी २४ तास'ची करणी, जत तालुक्याला पाणी - Marathi News 24taas.com

'झी २४ तास'ची करणी, जत तालुक्याला पाणी

www.24taas.com, सांगली
 
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनचे पाणी दुष्काळी जत तालुक्याला देण्याऐवजी, हे पाणी तासगावला पळवल्याचे वृत्त  'झी २४ तास' वरून प्रसारित केल्यावर, म्हैसाळ उपसा जलसिंचन विभागाने याची तातडीने दखल घेतली आहे.
 
या विभागाच्या वरिष्ठ अधिकारी आणि जतचे आमदार प्रकाश शेंडगे यांनी या योजनेचा पाहणी  दौरा  केला. यावेळी  जतला पाणी  देण्याबाबत  विचार विनिमय करण्यात  आला.
 
दुष्काळग्रस्त  जतची  पाण्याची  उपेक्षा सोडवण्यासाठी  तत्काळ  निर्णय घेण्यात आला. म्हैसाळ योजनेचे पाणी ५ जून  पर्यंत जतच्या शिवारात येणार आहे, अशी माहिती आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे.

First Published: Saturday, May 12, 2012, 21:06


comments powered by Disqus