Last Updated: Thursday, May 16, 2013, 23:26
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईआयपीएलच्या सहाव्या सिझनमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केलाय..राजस्थान रॉयल्सचे तीन क्रिकेटर आणि सट्टेबाज यांच्यात झालेलं संभाषण पोलिसांनी रेकॉर्ड केलं असून त्या आधारे पोलिसांनी कारवाई केलीय.
श्रीशांत...अजित चंडेला ...अंकित चव्हाण... या तीन क्रिकेटपटूंनी क्रिकेटला काळीमा फासलाय...आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान स्पॉट फिक्सिंग केल्याचा या तिघांवर आरोप आहे....दिल्ली पोलिसांनी आय़पीएलमधील या स्पॉट फिक्सिंगचा पर्दाफाश केलाय..
तारीख
०५ मे २०१३
ठिकाण
जयपूर
पुणे वॉरियर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
ग्राफिक्स आऊट-
क्रिकेटप्रेमी आपआपल्या टीमला प्रोत्सहन देत होते...प्रत्येक बॉलवर क्रिकेटप्रेमींचा उत्साह वाढत होता...पण खरंतर या सामन्यात स्पॉट फिक्सिंग झालं होतं...तो क्रिकेटपटू आपल्या कॅप्टन ऐवजी स्टेडियम बाहेर बसलेल्या बुकीच्या इशा-यावर खेळत होते...राजस्थान रॉयल्सचा बॉलर अंकित चंडेला आणि सट्टेबाज यांच्यात हे फिक्सिंग झालं होतं..
ग्राफिक्स इन-
अजित चंडेला : मी मैदानत जातो तेथून मी सिग्नल देईन.पहिली ओव्हर टाकतो त्यानंतर बघतो
बुकी : हे बघ पहिली ओव्हर चांगली टाक आणि दुसरी ओव्हर आमच्यासाठी चांगली टाक
अजित: ठिक आहे करतो
बुकी :सिग्नल काय देणार ?
अजित:मी ओव्हर सुरु होण्याआधी आपलं टी शर्ट बाहेर काढतो आणि आकाशाकडं बघून त्यानंतर `आपली` ओव्हर सुरु करतो
या ओव्हरमध्ये अजित चंडेलाने १४ रन्स देण्याचं बुकीला कबुल केलं होतं. त्या बदल्यात बुकी त्याला चाळीस लाख रुपये देणार होता..पण अजित ओव्हर टाकण्यापूर्वी बुकीला इशारा करण्यास विसरला त्यामुळे त्याला अँडव्हन्स घेतलेले २० लाख रुपये परत करावे लागले..
तारीख
०९ मे २०१३
ठिकाण
मोहाली
किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स
या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा बॉलर श्रीशांत याने स्पॉट फिक्सिंग केलं होतं..श्रीशांतचा जवळचा मित्र जिजू जनार्दन याने बुकी आणि श्रीशांत यांच्यातमध्यस्ती केली होती..या मॅचच्या एका ओव्हरमध्ये श्रीशांतने १४ रन्स देण्याच मान्य केलं होत आणि त्याबदल्यात त्याला बुकीने ४० लाख दिले..
बुकी :त्याला ( श्रीशांत ) इशारा करण्यास सांग. तो ( श्रीशांत ) कोणता इशारा करणार आहे ?
जीजू : मी त्याला आधीच सांगितलंय, तो असा कुठलाच इशारा करणार नाही जो नजरेत येईल. पण दुस-या ओव्हरच्या सुरुवातीला तो त्याचा टॉवेल कमरेला खोचेल आणि हाच तुझ्यासाठी इशारा असेल
बुकी : त्याला ( श्रीशांत)समजावून सांग की, टॉवेल खोचल्यानंतर आणि ही ओव्हर टाकण्याआधी थोडं थांब कारण यावेळेत आम्हाला आमचं काम सुरु करायचं आहे.आम्हाला बुकिंग करण्यासाठी वेळ हवाय
जीजू : ठिक आहे
या मॅचमध्ये ठरल्याप्रमाणे श्रीशांतने दुसरी ओव्हर सुरु करण्याआधी बुकीला इशारा दिला..आणि ठरल्याप्रमाणेच दुस-या ओव्हरमध्ये १४ रन्स दिले...
तारीख
१५ मे २०१३
ठिकाण
मुंबई
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा आणखी एक बॉलर फिक्सिंगमध्ये सहभागी झाला ....त्याचं नाव आहे अंकित चव्हाण..
बुकी आणि अंकित चव्हाण यांच्यात मध्यस्ती केली ती त्याच्याच टीमच्या अजित चंडेला याने..
अंकित : बोल... मी बाहेर आलो आहे
अजित : ठिक आहे मी त्याला ( बुकी) हो म्हणून सांगू का ?
अंकित : हो ... पण किती ठरलेत ( रन्स )
अजित :ते १२( रन्स) म्हणत आहेत
अंकित : नाही... १२ जास्त होतात
अजित : नाही रे मी होईल म्हणून सांगितलंय , डन करु ?
अंकित : ठिक आहे करुन टाक,पण किती ठरलेत ?
अजित:मी त्यांना ६० लाख रुपये सांगितले आहेत आणि ते तयार आहेत
अंकित:ठिक आहे
अजित: कोणता इशारा करणार ?
अंकित:ओव्हर टाकण्याआधी मी रिस्ट बँड हलवीन
अजित:कोणताही स्पेलच्या दुस-या ओव्हरमध्ये १४ किंवा त्यापेक्षा जास्त रन्स दे
अंकित : ठिक आहे
ठरल्याप्रमाणे अंकितने या समान्यात आपल्या दुस-या ओव्हर १५ रन्स दिले...ही ओव्हर संपल्यानंतर अजित आणि बुकी मन्नान यांच्या संभाषण झालं..
अजित :खूष झालात ना ?
मन्नान (बुकी ):ठिक आहे बोल काय करायचं ?
अजित : सेशनसंपल्यावर बोलूया
मन्नान : अंकितच्या सामानाचं (पैसे) काय ?
अजित : हो सांगतो, पण थेट त्याच्याकडं सामान (पैसे) देवू नको, मी मध्यस्ती केली म्हणून सामानही( पैसे) मीच देईल
मन्नान : ठिक आहे
या सामन्यासाठी बुकीने अंकितला साठ लाख रुपये दिल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलंय..तसेच या संदर्भातले पुरावेत पोलिसांच्या हाती लागले आहेत.या प्रकरणी या तीनही क्रिकेटरसह दिल्ली पोलिसांनी सट्टेबाजांना अटक केलीय. आयपीएलमधल्या या स्पॉट फिक्सिंगमुळे क्रिकेट जगतात एकच खळबळ उडालीय.
आयपीएलमधली ही स्पॉट फिक्सिंग जयपूर, मोहाली आणि मुंबईतल्या मॅचेसमध्ये झाली असली तरी यामागचा मास्टर माईंड परदेशात बसून सूत्र हलवत होता. दिल्ली पोलिसांनी तसा दावा केलाय. श्रीशांत...अजित चंडेला ...अंकित चव्हाण हे तिन्ही राजस्थान रॉयल्सचे क्रिकेटर फिक्सिंग प्रकरणात अडकलेत...पण धक्कादायक बाब म्हणजे या स्प़ॉट फिक्सिंग प्रकरणाला अंडरवर्ल्डची किनार आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्य़ा माहितीनुसार या स्पॉट फिक्सिंगची पाळंमुळं परदेशात असून त्याविषयी त्यांनी आधिक माहिती देण्यास नकार दिलाय...मात्र या स्पॉट फिक्सिंगची सूत्र परदेशातून हलवली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय..
या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले सट्टेबाज जीजू जनार्दन आणि चंद्रेश उर्फ जुपीटर यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय...हे दोघेही कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय... या स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंना हवालाच्या माध्यमातून पैसे दिले जाणार होते..त्यामध्ये काही रोकड आणि काही डॉलर्स दिले जाणार होते...पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सट्टेबाज चंद्रेश उर्फ जुपीटर हा दुबईतील बुकी मनोज मेट्रोच्या संपर्कात होता...या फिक्सिंग विषयी जुपीटरने मनोजला माहिती दिली होती...जुपीटरकडं सात फोन लाईन्स असून त्यावर गेल्या दोन महिन्यापासून दिल्ली पोलिसांची बारीक नजर होती..सट्टेबाजांनी दुबईमार्गे पैसे खेळाडूंक़डं पोहचवले होते तसेच जवळपास ३० फोन कॉल्स पाकिस्तानातून रुट करण्यात आले होते...
क्रिकेटला फिक्सिंगचं ग्रहण लागलं असून त्याला अंडरवर्ल्ड कारणीभुत आहे... कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमची डी कंपनी क्रिकेट फिक्सिंगमध्ये सक्रीय असल्याचं वेळोवेळी उघड झालं आहे..दाऊद इब्राहिम कसं चालवतो हे सट्टेबाजीचं रॅकेट ते आता आपण पहाणार आहोत..
क्रिकेटला फिक्सिंग काही नवीन नाही...यापूर्वीही फिक्सिंगच्या घटना उघडकीस आल्या आहेत..तीन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात स्पॉट फिक्सिंग झालं होतं... इंग्लंडच्या एका वृत्तपत्राने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानचे क्रिकेटर फिक्सिंगमध्ये अडकल्याचं उघड केलं होतं... मझहर माजीद नावाच्या एजंट मार्फत हे फिक्सिंग करण्यात आलं होतं..
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, May 16, 2013, 23:26