Last Updated: Tuesday, November 6, 2012, 23:33
www.24taas.com, मुंबईअवघ्या २४ तासात मुंबईत एका परदेशी तरुणीवर बलात्काराची तसेच एका वृद्ध महिलेचा खून झाल्यांच उघड झालंय. पण केवळ या दोनच घटना घडल्या असं नाही तर गेल्या काही महिन्यात अशा प्रकरणांमध्ये वाढ झालीय. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
वांद्रे
-----------------
इथं स्पॅनिश तरुणीवर बलात्कार
मालाड
---------------
वृद्धेची हत्या
वडाळा
-----------------
पल्लवी पुरकायस्थचा खून
गेल्या काही दिवसात घडलेल्या या घटनांवर नजर टाकल्यास मायानगरी मुंबईत महिला सुरक्षित नसल्याचं पहायला मिळतंय...खून... बलात्कार, विनयभंग, लूट अशा घटनांमध्ये वाढ झालीय..... गुन्हेगारांच्या दृष्टीने महिला य़ा सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे त्यांना सावज केलं जातंय...
12 ऑगस्ट 2012
पल्लवी पुरकायस्थची हत्या
19 ऑगस्ट 2012
सांताक्रुझमध्ये महिलेचा मृतदेह सापडला
8 सप्टेंबर 2012
दक्षा दफ्तरीचा घाटकोपरमध्ये खून
2 नोव्हेंबर 2012
गुजरातहून आलेल्या महिलेचं अपहरण करुन हत्या
6 नोव्हेंबर 2012
मालाडमध्ये वृद्धेचा खून
6 नोव्हेंबर 2012
स्पॅनिश तरुणीवर बलात्कार
या सगळ्या घटना पहाता मुंबईत
गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशतच उरलेली नाही असं म्हटलं तर वावगं ठरु नये...एकीकडं गुन्हेगारांकडून महिला टार्गेट केलं जात असतांना मुंबई पोलीस मात्र बेफिकीर असल्याचं पहायला मिळतंय...मुंबईत कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे...रात्री उशिरापर्यंत त्यांना लोकल किंवा बसने प्रवास करावा लागतो...अशा परिस्थितीत वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे महिलावर्गात भीतीचं वातावरण पसरलं आहे..
एकेकाळी मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जात असे...पण आता मुंबईत जी परिस्थिती निर्माण झालीय ती पहाता गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक उरला नाही...दिवसेंदिवस महिलांविषयीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्यामुळे महिलांमध्ये चिंता वाढलीय...
मायानगरीत महिलांच्या सुरक्षिततेचा बोजवारा उडला असल्याचं पोलीसांच्या दप्तरावर नजर टाकल्यास लक्षात येईल.. गेल्या पाच वर्षातील ही आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे.....
गेल्या काही महिन्यात मायानगरी मुंबई महिला असुरक्षित असल्याचं चित्र निर्माण झालंय...अपहरण, बलात्कार,खून, लैंगिक छळ अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे महिलांना लक्ष्य केलं जातंय...गेल्या पाच वर्षातील मुंबईची आकडेवारी पहाता मायानगरीत महिला किती असुरक्षित आहेत हे सहज लक्षात येईल ..
2011
-------
एकूण गुन्हे 32,647
2011
-------
महिलांविषयीचे गुन्हे 32,647
5 वर्षात महिलांविषयीच्या गुन्ह्यात 26% वाढ
ही आकडेवारी पहाता मुंबईत महिलांच्या सुरक्षेची अवस्था किती केविलवाणी झालीय हे लक्षात येईल. गेल्या पाच वर्षात मुंबईत बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालीय..
बलात्कार
2007
------------
174 गुन्हे
2008
------------
218 गुन्हे
2009
------------
182 गुन्हे
2010
------------
194 गुन्हे
2011
------------
221 गुन्हे
दरवर्षी या गुन्ह्यांमध्ये वाढ होत गेल्याचं पहायला मिळेल...बलात्काराप्रमाणेच गेल्या पाच वर्षात विनयभंगाच्या घटनांही वाढल्या आहेत...
विनयभंग
2007
------------
365 गुन्हे
2008
------------
436 गुन्हे
2009
------------
400 गुन्हे
2010
------------
475 गुन्हे
2011
------------
553 गुन्हे
विनयभंगाप्रमाणेच लैंगिक छळाच्या घटना वाढत आहेत.
लैंगिक छळ
2007
------------
112 गुन्हे
2008
------------
121 गुन्हे
2009
------------
101 गुन्हे
2010
------------
138 गुन्हे
2011
------------
162 गुन्हे
विनयभंग, लैंगिक छळ, बलात्काराच्या घटनांप्रमाणेच अपहरणांच्या घटनांची आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे....
अपहरण
2007
------------
120 गुन्हे
2008
------------
116 गुन्हे
2009
------------
86 गुन्हे
2010
------------
146 गुन्हे
2011
------------
266 गुन्हे
मुंबईत महिला किती असुरक्षित आहेत हे गेल्या पाच वर्षात बळी पडलेल्या महिलांच्या संख्यवरुन तुमच्या लक्षात येईल...
खून
2007
------------
230 गुन्हे
2008
------------
210 गुन्हे
2009
------------
217 गुन्हे
2010
------------
228 गुन्हे
2011
------------
203 गुन्हे
महिलांना केवळ गुन्हेगारांकडून लक्ष्य केलं जातंय असं नाही तर कौटुंबिक वादातूनही त्यांना छळ सहन करावा लागतोय...
मुंबईत महिला असुरक्षित ( हेडर)
पती आणि नातेवाईकांकडून छळ
2007
------------
380 गुन्हे
2008
------------
502 गुन्हे
2009
------------
434 गुन्हे
2010
------------
312 गुन्हे
2011
------------
393 गुन्हे
मुंबईतील ही आकडेवारी पहाता...पोलीस यंत्रणा काय करतेय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्या शिवाय रहणार नाही..
First Published: Tuesday, November 6, 2012, 23:33