शंभरीतले तरुण young @ 100

शंभरीतले तरुण

शंभरीतले तरुण
www.24taas.com, मुंबई

मुंबई मॅरेथॉनमध्ये एक वयोवृद्ध माणूस धावत होता..102 वर्षाचा माणूस धावत असतानाच सगळ्यांची नजर त्याच्यावर टिकूनच होती. धावणा-या या वेगाला पाहून तरुण ही थक्क झाले. सलमान आणि जॉन अब्राहमपेक्षाही दुपट्टीनं जास्त वय असणा-या या नौजवानाने आपल्या धावण्याने अनेक गोष्टीचे कुतुहल वाढवलं..केवळ फौजाच नाही तर कोलकात्याचे मनोहर, गुवाहाटीचे भोलादास, किवा भोपाळच्या जीनत बी असो.. या सगळ्याना पाहिल्यावर प्रश्न पडतो, की शंभरी पार केल्यानंतरही हा उत्साह त्यांच्यामध्ये नेमका आला कुठून आणि काय आहे रहस्य या वेगवान चिरतारुण्याचे...

वयाची शंभरी पार केलेले फौजा सिंह... ज्यानी आपल्या फिटनेसमध्ये तरुणांनीही मागे टाकलंय.. मॅरेथॉन मध्ये 42 किलोमीटर स्पर्धेत फौजा सिंह यांनी विश्वविक्रम नोंदवलाय.. मुंबई मॅरेथॉनमध्ये जेव्हा फौजा सिंह यांना धावताना सा-या जगानं पाहिलं, तेव्हा या शंभरी पार केलेल्या या तरुणाच्या उत्साह आणि हिम्मतीला मोठमोठ्या स्टार्सनीही सलाम केला..

कोलकत्तामधील मनोहर 1952 मध्ये भारताचे पहिले बॉडी बिल्डर मिस्टर युनिवर्स बनले होते. आणि वयाची 100 पार झाल्यानंतरही त्यांचे बॉडी बिल्डींगचे किस्से अजुनही प्रसिद्ध आहे.. 105 व्या वर्षातही ते कोलकत्ता मधील अनेक आखाडे असू दे, जीम वा नवीन व्यायामपटूना घडवणे असो... मनोहर नेहमीच आघाडीवर असतात. मोठमोठ्या आखाड्यात व्यायामपटूना अस्मान दाखवणारे कोलकत्याचे मनोहर आता आपल्या वयावर विजय मिळवत आहेत. यांना आता काय म्हणायचे शंभरी पार केलेले वयोवृद्ध की अवघं 100 वर्ष वय असलेला चिरतरुण..

गुवाहाटी मधील भोलादास यानी वयाच्या 100 व्या वर्षी पीचडी मिळवली आणि अवघी दुनिया थक्क झाली.. आज अनेक तरुणाची डॉक्टरी मिळवताना दमछाक होत असताना भोलादास यांनी वयाच्या शंभरीत शारीरीक आणि मानसिक संतुलनही व्यवस्थित सांभाळलय..

केवळ देशातूनच नाही तर विदेशातूनही लोक हैदराबादला मुद्दाम भेट देतात.. त्यांना जाणून घ्यायचं असत की 105 वर्षाचे आयएएस असलेले नारायण चेट्टी या वयातही स्वताला तंदुरुस्त ठेवलय..

भोपाळच्या जीनत बीना पाहिल्यावर लोक त्यांचे वय पाहून हैराण होतात. पण सगळ्यात संभ्रमात टाकते ते त्याचं 112 वर्ष असणारं वय आणि तंदुरुस्ती... जीनत बी आजही आपली सगळी काम आपणच करते. आणि जेव्हा बोलायला सुरुवात करते तेव्हा भल्याभल्यांची छुट्टी करतात...

या चेह-यांना पाहिल्यावर आपल्यालाही प्रश्न पडेल की हे खरच शंभरी पार केलेले वृद्ध आहेत की शंभरी ल्यालेले तरुण... प्रश्न हा ही निर्माण होतो की, या सगळ्यांनी आपल्या आयुष्यात असं नेमक काय केलय की ज्यामुळे त्यानी शंभरी सहज पार केलीय.. आणि म्हणुनच आज हे बुजुर्ग आज तरुणांना आव्हान देत आहेत..

या सगळ्यांची वानगीदाखल उदाहरणं जगण्याची उमेद समृद्ध करुन गेली. पण या प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे.. आणि या प्रत्येक कहाणीत आपल्याला शोधायचाय एक आशावाद...आपण आपल्या दररोजच्या जगण्यात व्यस्त असतो. व्यायाम करा किवा शाकाहार करुनही शंभरी गाठूच याची खात्री नसतो.. एवढं आय़ुष्य तणावांनी भरलंय. म्हणूनच अशा वेळी वयाची 100 पार केलेले आणि लोकांचे रोल मॉडेल बनलेले फौजा सिंह यांनी आपल्या वयाच जपलेले रहस्य हे अतिशय महत्वाचे ठरतंय..

ब्रिटन, अमेरिका, कॅनडा आणि आता भारतात.. जगातला असा कोणताही देश नाही जिथं फौजा सिहांचे नाव आणि त्यांचा वयातला जोश पोहोचला नाही असं नाही. यांना धावताना ज्यावेळी अवघ्या जगान पाहिलं तेव्हा बुजुर्गच नाही तर तरुण मंडळीही त्यांना आपला आदर्श मानू लागली आहेत. त्याचा धावतानाचा आवेश, जोश आणि उत्साह साऱ्यांनाच थक्क करुन गेलाय. मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणारे फौजा सिंह ज्यावेळी व्यासपीठावर आले, तेव्हा आजच्या पिढीच्या आयकॉन असणा-या बॉलीवुड स्टारनीही फौजा सिहंच खरे स्टार असल्याचं म्हणत त्या जिद्दीला सलाम केला. या स्पर्धेतल्या अनेक तरुण स्पर्धकांनीही फौजा सिहांचा या वयातला आवेश पाहत त्यांना आपलं गुरु मानलं. स्पर्धा किती मैलांची असो या फौजा सिंह यांचा स्पर्धा सुरु होण्यापूर्वीपासून ते स्पर्धा संपेपर्यत आवेश आणि जिद्द काही संपत नाही..

फौजा सिंह यांच्या म्हणण्यानुसार वाढत्या वयाबरोबरच अनेक लोक आपल्या स्वास्थ्याबाबत हलगर्जीपणा दाखवतात.. कारण अनेकजण आपल्या खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या सवयीवर ठाम नसतात..

फौजा सिहं यांच्या म्हणण्यानुसार ते स्वतः अजुनही फक्त घरचंच खाणं खातात. फौजा भलेही आज इंग्लडमध्ये राहत असतील. पण परदेशात गेल्यावरही त्यानी आपलं साधं आणि घरगुती जेवणाची सवय कायम ठेवलीय.. आणि तेच आपल्या प्रकृती स्वास्थाचे गमक आहे..

फौजा सिंह यांच्या म्हणण्यानुसार हिरव्या भाज्या, डाळ आणि ज्यूस हे त्यांच्या तंदुरुस्तीचे रहस्य आहे.. वैदकिय तज्ञाच्या मते शारीरिक फिटनेस बरोबरच फौजा सिंह यांनी स्वतहाला मानसिकदृष्ट्याही फिट ठेवलंय. शंभरी पार केलेल्या या माणसाची दिनचर्य़ाही तेवढीच वेगळी आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अनेक माणस या वयात रोगांचे शिकार ठरतात. त्याचे प्रमुख कारण असतं ते म्हणजे ते स्वतःला मनानं वृद्ध समजतात.

फौजा सिंह आपल्या या फिटनेसमध्ये आपल्या धर्मालाही महत्व देतात.. ज्यांच्या संस्कारामुळे सुरुवातीपासूनच त्याना फिट राहण्याची प्रेरणा मिळालीय. आणि त्यातही त्याना आपल्या पगडीचा विशेष गर्व आहे..

राहणी मान , खाण पिणं आणि अध्यात्म या त्रिसूत्रीवरच आहे फौजा सिहाचा विजयांचा मंत्र... फौजा सिंह म्हणजे आयुष्याचे एक प्रतिक आहेत.... त्याच्या फिट राहण्याचा फॉर्म्युला जाणून घेऊन आपणही तंदुरुस्त होऊ शकता..


केवळ फौजा सिहंच नाही तर तर आजघडीला देशात अनेक बुजुर्ग मंडळी आहेत ज्यांनी आयुष्याचे शतक पुर्ण केल्यानंतरही पुर्णतहा तंदुरुस्त आहेत.. आणि आपल्या वयोमानामुळे ही माणसं तरुणाईचे रोल मॉडेल बनलेत.. फौजा सिंहानंतर आता आम्ही तुम्हाला अशा माणसाची गाठ घालून देणार आहोत ज्यांच वय आहे १०५ वर्ष.. १०५ वर्षाच्या एका बॉडी बिल्डराची ही कथा..

हे आहेत मनोहर एईच.. ज्यावेळी सर्वसामान्यपणे आपल्या शिकण्याचे आणि स्वप्न पाहण्याचे वय असतं त्यावेळी या व्यक्तीनं वेगळाच कारनामा केला होता.. अवघ्या १२ व्या वर्षी त्यानी आय़ुष्यातल्या सर्वात मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्याचा भीमपराक्रम केला होता.. तो काळ मोठा वाईट होता.. कारण त्यावेळी सर्वत्र रोगराई पसरली होती.. मुलांचं आरोग्य ठिक असणं सोडाच पण जिवंत राहणंही कठीण बनलं होत.. पण साथीच्या त्या महामारीतही मनोहर यांनी आयुष्याची लढाई जिकंली.. आणि त्यानंतर मात्र फिटनेसलाच आपल्या आयुष्याचा मुलमंत्र बनवला.. लहानपणी फुटबॉल खेळण्याचा शौक असलेल्या मनोहर यांनी तंदुरुस्तीलाच आपला सखा मानला..१९५२ मध्ये मनोहर हे आपल्या स्वास्थाची काळजी घेत रोल मॉडेल बनले.. आणि त्यानी मिस्टर युनिवर्सचा किताब जिंकला.... १९५२ सालाचं हे स्वास्थ वैभव आज २०१३ मध्येही टिकून आहे. १०५ वर्षाच्या य़ा गड्यानं आजही आपल्या प्रकृतीवर विजय मिळवत ठणठणीत असल्याचे जगासमोर सिद्ध केलय....

मनोहर यांनी आपलं फिटनेस कस कायम राखलय, या वयातही ते चपळ कसे आहेत असे अनेक प्रश्न या निमित्तानं उभे राहिलेत.. आणि हेच प्रश्न मनोहर यांनाही सारखे विचारले जातात... पण त्यांच उत्तर १९५२लाही तेच होत आणि आज वयाच्या १०५व्या वर्षीही तेच आहे. मनोहरच्या कुटुंबातला सदस्यांच्या म्हणण्यानुसार मनोहर यांचं आहारावरील नियंत्रण कमालीचे आहे..

मोठ मोठ्या आखाड्यात व्यायामपटूना अस्मान दाखवणारे कोलकत्याचे मनोहर आता आपल्या वयावर विजय मिळवतायत.. यांना आता काय म्हणायचे शंभरी पार केलेले वयोवृद्ध की अवघं 100 वर्ष असलेला चिरतरुण..

कोलकत्तामधील मनोहरच नाही तर देशातल्य़ा अनेक भागात असे शतकी वयोमान पार केलेले अनेक तरुण मंडळी दिसतील.. गरज आहे ती निरखुन पाहण्याची आणि पारखून त्यांच्यातील गुण तरुण पिढीसमोर ठेवण्याची.. फौजा सिंह आणि मनोहर यांच्या यशस्वी आयुष्यानंतर आम्ही तुम्हाला आणखी दोन उदाहरण दाखवणार आहोत. . आणि ही उदाहरणं तुम्हाला तुमच्या आयुष्यातली चिरतारुण्याची उमेद नक्की वाढवतील..

वयावर आणि काळावर विजय मिळवलेले हे आहेत आयुष्ययोद्घे.. १०५ सालाच्या जवानांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे.. गेल्ली नारायण प्रसाद चेट्टी यांच जगण, राहणीमान, बोलण्याचा अंदाज पाहून सारेचजण थक्क होतात.. हैदराबादमधील बिरलामंदीर जवळ आमची टिम जेव्हा चेट्टी भेटायला गेली तेव्हा आमचीही स्थिती काही वेगळी नव्हती.. १९०८ साली जन्मलेले नारायण चेट्टी हे १९६८ साली आय़एएस पदावरुन रिटायर्ड झाले. पण आजही त्यांचा कामातला उत्साह आणि जगण्याचा अंदाज तरुणांनाही स्फुर्ती देणारा असाच आहे.. त्यांना त्याच्या या यशाचे रहस्य विचारलं तेव्हा त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार कुठलंही काम करण्यासाठी त्या कामातलं नियोजन आणि आवश्यक उमेद ही त्याला यशस्वी बनवते..

१०५ वय असणारे गेल्ली प्रसाद चेट्टी हे आजही तंदुरुस्त आहेत आणि आजही आपल्या वागण्या-बोलण्यात स्वच्छंदच आहेत. पण त्यांची एक गोष्ट मात्र आवर्जून स्वीकारण्यासारखी आहे.. ते जगण्याबद्दल प्रचंड आशावादी आहेत. पण त्याचबरोबर त्यांच्या बोलण्यात जाणवणारी आजच्या पिढीचा आयुष्याकडे पाहण्याचा निराशावादही प्रचंड अस्वस्थ करणारा आहे.. पण या सगळ्य़ात वरचढ ठरतं ते चेट्टीचे आयुष्याचे आशावादी तत्वज्ञान...

हैदराबादच्या चेट्टींप्रमाणेच भोपाळच्या जीनतबीचे उदाहरण बोलकं आहे.. भोपाळमध्ये राहणा-या जीनतबीनी आयुष्याची सेंच्युरी पार केलीय.. जीनत बी या रस्त्यावर चालताना भलेही त्या लक्षवेधी नसतील पण ज्यावेळी त्या आपल्या वय सांगतात त्यावेळी मात्र सारेच हैराण होतात. उंची भलेही छोटी असेल पण जीनतबी यांच्या जिद्दीची उंची कधीच छोटी नव्हती.. आयुष्यात येणारं प्रत्येक संकट हे त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारली. आणि त्या प्रत्येक वेळी स्वताचा विजयही सिद्ध केलाय.. प्रत्येक आव्हानाला हसत हसत सामोर जात जगण्याचा नवा वस्तुपाठ घालुन दिलाय.. आणि त्याची उमेदही आभाळाएवढी झाली.



११२ सालच्या जीनतबीच्या मोठ्या कारकीर्दनं ती सगळ्यांसाठी रोल मॉडेल बनलीय. जीनत ही भोपाळमधील सर्वात जास्त वयाची महिला ठरलीय़. त्यांची उंची तीन फूट असली तरी त्यांना अजुनही ब्रिटीश काळाची आठवण आहे. जीनत बीच्या म्हणण्यानुसार खाणं पीणं वेळेवर असेल तर आजारपण तुमच्या आजुबाजुलाही भटकत नाही... पण असं असलं तरी आयुष्याच्या या प्रवासात आता जीनत बी आपलं एकटेपण सतावतय.. कमी असणारी पेन्शन त्याना वेदना देऊन जातेय. सरकारी कडून आधार मिळाला तर त्यांचे जगण सुसह्य होईल.. तसच या वयात वेळीच सरकारी मदत मिळाली तर त्या उमेदीला पंख लाभतील..

First Published: Thursday, January 24, 2013, 23:49


comments powered by Disqus