Bank अकाऊंटवर दरोडा., your debit card danger

Bank अकाऊंटवर दरोडा..

Bank अकाऊंटवर दरोडा..
www.24taas.com,मुंबई

आजचं युग हे इंटरनेटचं युग मानलं जातंय. इंटरनेटमुळे अनेक गोष्टी तुम्ही घरबसल्या कॉ़म्प्यूटर, लॅपटॉप, टॅब किंब मोबाईलच्या माध्यमातून सहज करु शकता...विशेषता बँकिंगसाठी इंटनेटचा वापर करणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. पण आता तिथही दरोडा पडू शकतो. तुमच्या आयुष्यभराची कमाई एका क्षणात तुमच्यापासून हिरावून घेतली जाऊ शकतं...कोण आहे ते लोक ? आणि कशा पद्धतीने ? टाकला जातोय तो दरोडा ? आणि तुम्ही त्या दरोडेखोरांपासून आपलं खातं कसं सुरक्षित ठेवू शकता ? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या प्राईम वॉचमध्ये अकाऊंटवर दरोडा.

तुम्ही इंटरनेट बँकिंगचा वापर करत असला. आज पर्यंत सगळं काही सुरळीत असेल. पण तुमचं इंटरनेट बँक अकाऊंट खरंच सुरक्षित आहे का ? हा विचार तुम्ही कधी केला आहे का ? नाही ना ? पण आता आम्ही जे काही दाखवणार आहोत ते बघीतल्या नंतर तुमच्या पायाखालची वळू सरकल्याशिवाया राहणार नाही. तसेच आपलं बँक अकाऊंट खरच सुरक्षित आहे का, असा प्रश्न तुम्हाला ही पडल्याशिवाय राहणार नाही.

अवघ्या काही रुपयांमध्ये तुमच्या इंटरनेट बॅकिंगची सर्व माहीती हॅकर्सच्या हाती लागतेय. तुमचं बँकखातं,तुमचे एटीएमचे पासवर्ड, तुमच्या इंटरनेट बॅकिगचा पासवर्ड आणि तुमचा सर्व गोपनीय डाटा.. हे सगळी काही एका क्षणार्धात लुटलं जातयं आणि हे विकलं जातंय फक्त ५०० रुपयांमध्ये.

एटीएम कार्डचा डेटा चोरी होत असल्याचं आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल पण इंटरनेट बँकिंग तरी सुरक्षित आहे का ? इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही तुमची माहिती सुरक्षित ठेवू शकता का? हे आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत पण त्यापूर्वी इंटरनेट बँकिंग निष्काळजीपणे हाताळल्यास त्याचे कोणते परिणाम होतील हे तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे..

आज इंटरनेटमुळे बँकेतून पैसे काढण्यासाठी किंवा पैसे भरण्यासाठी तासन तास रांगेत उभा राहण्याची गरज उरली नाही...इंटरनेट बँकिंगमुळे जगाच्या कोणत्याही काना कोप-यातून तुम्ही बँक ट्रन्जॅक्शन करु शकता...पण इंटरनेट बँकिंगचा वापर करणा-यांच्या बँक अकाऊंटमध्ये घुसखोरी करणं शक्य असल्याचं हॅकर्सचं म्हणनं आहे..हॅकर्सच्या म्हणण्यानुसार बँकेत वेळ घालवण्यापेक्षा लोक इंटरनेटचा वापर करुन ट्रान्जाक्शन करतात आणि नेमक्या त्याचवेळेची सायबर क्रिमिनल वाट पहात असतात.

Bank अकाऊंटवर दरोडा..

आज जगभरात इंटरनेटचा वापर करणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे...त्याचबरोबर इंटरनेट बँकिंगचा वापर करणा-यांचा आकडाही वाढत आहे...एकीकडं इंटरनेट बँकिंगचा वापर करणा-यांची संख्या वाढत असतांनाच दुसरीकडं इंटरनेट बँकिंग पासवर्ड चोरी होण्याच्या घटनाही वाढत आहेत.

तुमच्या बँक अकाऊंटची माहिती कशा पद्धतीने चोरी होते हे आता आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत. काही लोक दिवसरात्री कॉम्प्यूटर समोर बसलेले असतात...त्यांची नजर इंटरनेटवर होणा-या प्रत्येक घडामोडीवर असते..जेव्हा तुम्ही तुमची इंटरनेट बँकिंग साईट सुरु करता तेव्हा तुमच्या कॉम्प्यूटर स्क्रीनवरच्या प्रत्येक गोष्टी ती व्यक्ती पाहू शकते.

दुस-या व्यक्तीच्या कॉम्प्यूटर स्क्रिनवर काय सुरु आहे हे पाहता यावं यासाठी काही सॉप्टवेअर तयार करण्यात आले असून आज इंटरनेटवर असे अनेक सॉफ्टेवअर उपलब्ध आहेत.आपल्या कॉम्प्यूटरमध्ये कोणाला घुसखोरी करता येवू नये यासाठी सेक्युरिटी सिस्टम लावली जातो तसे सॉफ्टवेअर टाकले जातात. मात्र कॉम्प्यूटरची सेक्युरिटी भेदणारे काही सॉप्टवेअर उपलब्ध झाले आहेत....विशेष म्हणजे त्याची कॉम्प्यूटर वापरणा-या व्यक्तीला जराही खबर लागत नाही.

हॅकिंगचं हे चक्रव्यूव्ह भेदण्यासाठी आम्हाला एका हॅकरची गरज होती...बराच काळ शोध घेतल्यानंतर तसेच इंटरनेटवर चॅटिंग केल्यानंतर शेवटी आमचं एका हॅकरशी बोलणं झालं...बँक अकाऊंट कशा पद्धतीने हॅक केलं जातं याची माहिती देण्यास तो तयार झाला होता.

हॅकिंगच्या दुनियाशी आपण चांगलेच परिचित असल्याचं त्यांन आम्हाला सांगितंलं तसेच एका हॅकिंग विरोधी कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी आपण तयारी करत असल्याचा त्याने दावा केला..त्यामुळेच त्याला हॅकिंगच्या माजाजालाची इत्यंभूत माहिती आहे. अत्यंत सुरक्षित मानल्या जाणा-या बँक अकाऊंटमध्ये घूसखोरी करुन अकाऊंटची माहिती कशा पद्धतीने चोरी केली जाते हे जाणण्यास आम्हीही उत्सुक होतो.

एखाद्याचं बँक अकाऊंट हॅक करण्यासाठी कोणत्या गोष्टीची अवश्यकता असते असं त्या हॅकरला विचारलं तेव्हा त्याने जे उत्तर दिलं ते धक्कादायक होतं...केवळ कॉम्प्यूटर आणि इंटरनेटच्या मदतीने जगाच्या कोणत्याही कानाकोप-यातून हॅकर बँक अकाऊंट हॅक करु शकतो असा दावा त्या हॅकरने केला.

होय... हॅकरने केलेल्य़ा या दाव्यात काही अंशी नक्कीच तथ्य आहे...इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही बँक खात्यातून रक्कम काढून घेतली जाऊ शकते...पण ती चोरी कशा पद्धतीने केली जाते हे जाणण्याची आम्हालाही उत्सुकता होती..

दोन महिन्यांच्या अथक शोधमोहिमेनंतर आम्ही त्या बँक हॅकर्सला शोधून काढलं ...वेळ निश्चित झाली होती..आणि जागाही निश्चित केली होती..आता उत्सुकता होती ती त्याला भेटण्याची.. इंटरनेटवरुन बँक अकाऊंटची माहिती मिळवून देण्याचा दावा त्याने केला होता..तसेच काही पैसे खर्च केल्यास एटीएम कार्डही तयार करुन देण्याचा दावा त्याने केला होता..

फक्त पाचशे रुपयात इंटरनेटवरुन तुमच्या बॅंक अकाऊंटची माहिती विकली जातेय ते.. पण यापेक्षाही भयंकर सत्य अजून बाकी आहे.. तुमच्या दररोजच्या व्यवहारात असलेलं आणि जे फक्त तुमच्याजवळ असतं, तसचं अगदी हुबेहूब एटीएम कार्ड आणि तेही तुमचचं...पण ते कार्ड जर दुसराच कोण वापरत असेल तर .... चक्रावून गेलात ना ? पण हे सत्य आहे..

बँकिंग प्रक्रिया आहे जी तुम्हाला नित्याचीच झालीय..तुम्ही एटीएम सेंटरवर जाता. पैसे काढता. एखाद्या दुकानात जाता वस्तू खरेदी केल्यानंतर कार्डच्या माध्यमातून बिल चुकतं करता....पण याच दरम्यान तुमच्या बँक खात्यात घूसखोरी केली जाऊ शकते याची तुम्हाला कल्पना आहे का ?

अत्यंत चलाखीने तुमच्या खात्यातून रक्कम काढून घेतली जाऊ शकते आणि त्यानंतर दाद ना फिर्याद अशी तुमची अवस्था होईल...काही वेळा हॅकर्स एटीएम मशीवर असं काही डिव्हाईल लावतात ज्याच्या माध्यमातून तुमच्या कार्डची सगळी माहिती गुपचुपपणे त्या डिव्हाईसमध्ये साठवली जाते. हॅकर्स याच पद्धतीने एक दोन नव्हे तर हजारो अकाऊंटची माहिती गोळा करु शकतात.

आमच्या प्रतिनिधीने खोलात जाऊन शोध घेतल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली..एटीएम स्किमर नावाशी साम्य असलेले स्पाय डिव्हाईस आज बाजारात असून ते एटीएम मशीनला गुपचूपपणे जोडलं जातं..एटीएममशीन मध्ये जिथे कार्ड टाकलं जातं तिथचं हे डिव्हाईस लावलं जातं..त्यामुळे एटीएमच्या कार्यप्रणालीत कोणताच फरक पडत नाही..पण तुमच्या कार्डमधील सगळा डेटा चोरी केली जातो..ही माहिती इंटरनेटवर विकली जाते..त्यामध्ये या माहितीचा समावेश आहे..

कोणत्या माहितीची होते चोरी ?

खातेधारकाचं नाव
बँक अकाऊंट नंबर
ATM कार्ड नंबर
ATM कार्डचा पासवर्ड


ही सगळी माहिती मिळवल्यानंतर त्या मदतीने बनावट एटीएम कार्ड सहज तयार केलं जाऊ शकतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर एटीएम कार्डधारकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे..जर एखाद्याने तुमच्या बँक खात्यात अशा प्रकारे घूसखोरी केल्यास तुमच्या आयुष्यभराची कमाई एका क्षणात तुमच्या हातून निसटून जाण्याची शक्यता नाकाता येत नाही.

जर तुमच्या बँक खात्यातील रक्कम दहशतवादी कृत्यासाठी वापरल्यास काय होईल याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? जर तुम्ही निष्काळजीपणे आपलं एटीएम कार्ड आणि इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर आताच सावध व्हा..

First Published: Monday, August 27, 2012, 22:12


comments powered by Disqus