आंदोलन करून नुकसान का करता?- मुख्यमंत्री CM requests to stop Movement

आंदोलन करून नुकसान का करता?- मुख्यमंत्री

आंदोलन करून नुकसान का करता?- मुख्यमंत्री
www.24taas.com, कराड

ऐन दिवाळीमध्ये ऊसदराचा वाद पेटला आहे. यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय रंगही चढू लागला आहे आणि एकीकडे हे आंदोलन हिंसक वळणावरही आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकरी संघटनेच्या शिष्टाचाऱ्यांकडे हे आंदोलन ताबडतोब थांबवावं अशी विनंती केली आहे.

कराड येथे आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करून मुख्यमंत्र्यांनी ऊसदरवाढीचं आंदोलन थांबवण्याची विनंती केली. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचं, सर्वसामान्य जनतेचं आणि कारखानदारांचंच नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेने हे आंदोलन थांबवावं, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. काल शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी ऊस दराबाबत चर्चाही केली.

दरम्यान, ऊस दरावरील आंदोलनात शेतकऱ्यांनी इंदापूरजवळ दुधाचा एक टँकर अडवून दुधाची नासाडी केली. यामुळे हे आंदोलन बंद होईपर्यंत दूधाची वाहतूक थांबवण्याचा निर्णय दूध वाहतूकदारांनी घेतला आहे.

First Published: Wednesday, November 14, 2012, 10:11


comments powered by Disqus