Last Updated: Wednesday, November 14, 2012, 09:25
www.24taas.com, सांगलीऊस आंदोलन प. महाराष्ट्रात चांगलंच पेटलं आहे. त्यात एका शेतकऱ्याला आपला जीवही गमवावा लागला. पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेले शेतकरी, चंद्रकांत नलावडे यांच्या कुटुंबियांना मनसेने एक लाख रुपयांची मदत दिली आहे.
मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी आज वसगडे येथे जाऊन नलावडे कुटुंबियांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी उस दर आंदोलनात हस्तक्षेप करून लवकर मार्ग काढावा अन्यथा मनसे आंदोलनात उतरेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
या गोळीबाराची न्यायालीन चौकशीची करा, अशी मागणीही नांदगावकर यांनी केली. याशिवाय अधिकारी दोषी आहेत त्यांना त्वरीत निलंबित करा, अशी मागणीही त्यांनी केली.
First Published: Wednesday, November 14, 2012, 09:14