आंदोलनकर्त्यांवर आज पुन्हा गोळीबार; एक जखमी, police firing in sangli, one injured

आंदोलनकर्त्यांवर पुन्हा गोळीबार; एक जखमी

आंदोलनकर्त्यांवर पुन्हा गोळीबार; एक जखमी
www.24taas.com, सांगली

सांगली जिल्ह्यातील आष्टा गावात ऊस दरासाठी सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात प्रवीण पाटील हा तरुण जखमी झालाय.

आज सकाळपासूनच आष्टा गावात आंदोलन सुरू होतं. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात प्रवीण जखमी झालाय. प्रवीणच्या पायात गोळी लागली असून, त्याला कबाडे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस निरीक्षक भीमानंद नलावडे यांनी हा गोळीबार केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय.

गोळीबारानंतर आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पुन्हा हवेत गोळीबार केला. गावात तणाव कायम असून, पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ४० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय.

First Published: Wednesday, November 14, 2012, 19:49


comments powered by Disqus