मी कधीही पैशाला महत्त्व दिलेलं नाही - असद रौफ, asad rauf denied accuses

मी कधीही पैशाला महत्त्व दिलेलं नाही - असद रौफ

मी कधीही पैशाला महत्त्व दिलेलं नाही - असद रौफ
www.24taas.com, झी मीडिया, लाहोर

पाकिस्तानी अम्पायर असद रौफ यांनी आपल्यावरी ठेवण्यात आलेले स्पॉट फिक्सिंगचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘मी काहीही गैर केलेलं नाही त्यामुळे कोणत्याही चौकशीला सामोर जाण्यास तयारी असल्याचं’ही त्यांनी यावेळी म्हटलंय. त्याचप्रमाणे आयसीसीच्या अॅन्टी करप्शन कमिटीला उत्तर देणार असल्याचही त्यांनी स्पष्ट केलंय. असद रौफ यांच्यावर फिक्सिंगचे आरोप लागल्यानंतर त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमधून आऊट करण्यात आलं होतं.

एका पत्रकार परिषदेत असद रौफ यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळलेत. ‘माझ्या आजवरच्या क्रिकेट करिअरमध्ये मी कधीही पैशाला महत्त्व दिलेलं नाही... माझा आणि फिक्सिंगचा काही एक संबंध नाही.... विनाकारण मला या प्रकरणात ओढलं जातंय. आयसीसीला हवं असेल तर त्यांनीही या प्रकरणाची चौकशी करावी... फिक्सिंगच्या चौकशीसाठी जर एखादी चौकशी समिती स्थापन करण्यात आली तर त्याला माझा पाठिंबा असेल...’ असं रौफ यांनी म्हटलंय.

पाकिस्तानचे वादग्रस्त आमि चर्चित अम्पायर असद रौफ यांचं नाव आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पुढे आलंय. यानंतर त्यांना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.

यापूर्वीही, मुंबई वर्सोवा भागात राहणाऱ्या एका मॉडलनं लग्नाचं आमीष दाखवत आपलं यौन शोषण केल्याचा आरोप रौफ यांच्यावर केला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 29, 2013, 19:04


comments powered by Disqus