स्पॉट फिक्सिंगः दाऊद आणि छोटा शकीलचा हात, Dawood, Chhota Shakeel suspects in IPL spot-fixing: Sources

स्पॉट फिक्सिंगः दाऊद आणि छोटा शकीलचा हात

स्पॉट फिक्सिंगः  दाऊद आणि छोटा शकीलचा हात

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम आणि छोटा शकील यांचा हात असल्याची माहिती दिल्ली पोलिसातील सूत्रांनी दिली आहे.

आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स या संघातील एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकीत चव्हाण यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर भारतीय क्रिकेट जगतात खळबळ माजली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर बॉलिवुड अभिनेता विंदू दारा सिंग आणि गुरूनाथ मयप्पन यांना अटक करण्यात आली. मयप्पन हा चेन्नई सुपर किंग्ज या सीईओ आहे.

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात परदेशी धागेदोरे असल्याचे मुंबई पोलिस सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते. तसेच या संदर्भात काही कॉन्फरन्स कॉल दुबई आणि पाकिस्तानातही झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 4, 2013, 19:13


comments powered by Disqus