आयपीएल स्पॉट फिक्सिंग : द्रवीड होणार साक्षीदार, Dravid records statement with Delhi Police

स्पॉट फिक्सिंग : द्रवीड होणार साक्षीदार

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन आणि माजी भारतीय क्रिकेटर राहुल द्रविडल कोर्टात साक्षीदार म्हणून उभं करण्याचा निर्णय घेतलाय. पोलिसांनी या प्रकरणात बंगळूरला जाऊन राहुल द्रवीडची साक्ष नोंदविली.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ‘आयपीएल-६’मध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आपल्यावतीनं पहिलं आरोपपत्र तयार करायचंय. फिक्सिंग प्रकरणात फास्ट बॉलर एस. श्रीसंतसहीत आणखी तीन खेळाडूंचा समावेश आहे. हे आरोपपत्र पोलीस आयुक्त नीरज कुमार यांच्या पदावरून निवृत्तीपूर्वी म्हणजेच ३१ जुलैपूर्वी न्यायालयासमोर सादर करण्यात येईल.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी एस. श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंदेलायांच्यासहीत २९ जणांना अटक केली होती. बिंदू दारासिंगला अटक झाल्यानंतर बॉलिवूडचेही काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर यापूर्वीच मोक्का लावण्यात आलाय. श्रीसंत आणि चव्हाण यांसहित आणखी काही जण जामीनावर सुटले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 16, 2013, 12:25


comments powered by Disqus