फिक्सिंगचं `महा`कनेक्शन Fixing`s Maha Connection

फिक्सिंगचं `महा`कनेक्शन

फिक्सिंगचं `महा`कनेक्शन
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी विदर्भाचा माजी रणजीपटू मनीष गुड्डेवारला अटक करण्यात आलीय.. पण क्रिकेटपटूंना फिक्सिंगच्या
जाळ्यात अडकवणारे हे फिक्सर आता मात्र स्वत:च जाळ्यात अडकलेत...

मनीष गुड्डेवार - विदर्भाचा माजी रणजीपटू

सुनील भाटिया - सट्टेबाज

किरण डोळे - सट्टेबाज

आईपीएलमध्ये फिक्सिंगचं जाळं टाकणारे हे तिघेजण आता पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.. दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंगप्रकरणी तीन जणांना अटक केलीय. मनीष गुड्डेवार विदर्भाकडून रणजी खेळलेला आहे...तर अटक करण्यात आलेले सुनील भाटिया आणि किरण डोळे हे दोघे सट्टेबाज आहेत. फिक्सिंगमध्ये अटक करण्यात आलेला क्रिकेटपटू अजित चंदेला याचा मनीष गुड्डेवार हा जवळचा मित्र आहे. सट्टेबाजी सुनील भाटिया आणि किरन डोळे यांच्याशी अजीत चंडेलाशी ओळख करुन देण्यात मनीष गुड्डेवारने महत्वाची भूमिका बजावल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सुनील आणि किरण हे दोघे सट्टेबाज नागपूरचे राहिवासी आहेत.

दिल्ली पोलिस अनेक दिवसांपासून या तिघांवर नजर ठेवून होते. या त्रिकूटाला कोणत्या मॅचमध्ये फिक्सिंग केल्याप्रकरणी अटक केलीय, याचा अद्याप दिल्ली पोलिसांनी उलगडा केला नाही...मात्र या तिघांचं अजित चंडिलाशी झालेलं संभाषण पोलिसांनी रेकॉर्ड केलं आहे.

या तिघांव्यतिरिक्त आणखी एक माजी रणजीपटू बाबूराव यादवचं नावही याप्रकरणात समोर आलं असून रेल्वेकडून खेळलेला बाबूराव फरार आहे...त्यामुळे स्पॉट फिक्सिंगचं कनेक्शनं महाराष्ट्रात मुंबईपाठोपाठ औरंगाबाद,नागपूर या शहरांमध्ये पसरलं असल्याचं स्पष्ट झालंय..

मनीष गुड्डेवरच्या अटकेमुळे विदर्भातील क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसलाय...मनिष केवळ तीन वर्ष रणजी विदर्भसंघासाठी क्रिकेट खेळला...आणि त्यानंतर त्याने क्रिकेटला रामराम केला..पण आता तो चर्चेत आला तो थेट फिक्सिंगप्रकरणातूनच..

स्पॉट फिक्सिंगप्रकरणात विदर्भाचा माजी रणजीपटू मनीष गुड्डेवार याच्या अटकमुळे सट्टेबाजांची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत हे उघड झालं आहे....मनीष गुड्डेवारची रणजी कारकिर्द ही तशी फार मोठी नाही..


मनीष गुड्डेवारची कारकिर्द -

अष्टपैलू क्रिकेटपटू

विदर्भ संघासाठी खेळला रणजी वन-डे क्रिकेट

जयपूरमध्ये राजस्थान विरुद्ध सामन्यातून पदार्पण

2003 ते 2005 या दरम्यान खेळला क्रिकेट

7 सामन्यात 11.50च्या सरासरीने 69 केल्या धावा

उत्तरप्रदेश विरुद्ध खेळला अखेरचा सामना


मुळचा गडचिरोलीचा रहिवासी असलेला मनीष गुड्डेवार २००३ ते २००५ या तीन वर्षात विदर्भसंघासाठी रणजी खेळला..तो संघात एक चांगला अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळखला जात होता..त्याला क्रिकेटमध्ये चांगल भविष्य होत..पण २००५मध्ये त्याने क्रिकेटचा संन्यास घेतला आणि तो फरिदाबादला राहण्यासाठी गेला..रणजी खेळत असतांना मनीषची अनेक क्रिकेटपटूंशी ओळख होती..मनीश आणि अजित चंडेला हे दोघे एकत्र क्रिकेटचा सराव करत असतं आणि त्यातूनच त्यांची ओळख झाली होती...स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अजित चंडेलाला अटक झाल्यानंतर त्याचा जवळचा मित्र मनीष गुड्डेवरलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या...महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचीव पंकज गुड्डेवार याचा मनिष सख्खा भाऊ आहे..मनीषच्या अटकेमुळे विदर्भातील क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसलाय...

मनीष गुड्डेवार सोबत सुनील भाटिया आणि किरण डोळे या दोन सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केलीय...खरं तर लोकांना दाखवण्यासाठी त्यांचा व्यवसाय काही वेगळचा होता..आणि त्या व्यवसायाच्यानावाखाली हे सट्टेबाजीचा कारभार चालवीत होते...पण अखेर त्यांचं पितळ उघडं पडलंय..

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर नागपूरमधील हे होर्डिंग चर्चेत आलेत...कारण स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुनील भाटियाचं नावं या होर्डिंग आहे...श्री साई लंगर सेवा समिती मार्फत साई भक्तांसाठी निशुल्क बस सेवा चालवली जात असून या समितीचा सुनील भाटिया पदाधिकारी आहे..गेल्या काही वर्षात साई भक्त म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली होती....साई भक्तांना साईबाबांच दर्शन घडवण्यासाठी भाटियाकडून नागपूर ते शिर्डी अशी एसी बस सेवा आठवड्याच्या ठरावीक दिवशी चालवली जाते.. दारिद्ररेषेखाली राहणा-या साई भक्तांसाठी ही सेवा निशुल्क ठेवण्यात आली आहे...भाटिया केवळ साई भक्तांसाठी निशुल्क बस सेवा चालवतो असं नाही तर नागपूरच्या इंदोरा भागातील साई मंदिरात महाप्रसादाचं आयोजन केलं जातं..

साई भक्त म्हणून आपली ओळख निर्माण करणा-या सुनील भाटियाचं वेगळं रुप जगा समोर आलंय...क्रिकेट फिक्सिंगप्रकरणी त्याला अटक करण्यात आलीय...काही वर्षापूर्वी त्याने ट्राव्हल्स आणि प्रॉपर्टीचा व्यवसाय सुरु केला होता...पण त्यानंतर तो सट्ट्याच्या धंद्यात शिरला...राज्यातील तसेच देशातील अनेक सट्टेबाजांशी त्याचे संबंध असल्याचं बोललं जातंय.. काही वर्षांपूर्वी सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या सुनील भाटियाची अचानक आर्थिक प्रगती झाल्याची चर्चा आहे..

फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आलेला आणखी एक सट्टेबाज म्हणजे किरण उर्फ मुन्ना डोळे... किरण हा सुनील भाटियाचा जवळचा मित्र...पेशाने कंत्राटदार असलेला सुनील नागपूरच्या राजनगर भागात रहात असून सुनील प्रमाणे त्याचाही प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवसाय होता..पण आता त्याचंही पितळं उघडं पडलंय...या दोघांच्या अटकेमुळे नागपूरातील सट्टेबाजांचं नेटवर्क किती दूरवर पसरलंय हे उघड झालंय...

फिक्सिंगच महाराष्ट्र कनेक्शनचा आता पर्दाफाश झालाय..या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहे हे लवकरच उघड होईल...पोलीस या प्रकरणाच्या तळाशी जातील पण बीसीबीआय मात्र कोणती कारवाई करण्याच्या मुडमध्ये नसल्याचं धक्कादाय चित्र रविवारी पहायला मिळालं...

आयपीएल मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर बीसीसीआय काही तरी कठोर निर्णय घेईल असं वाटलं होतं..पण रविवारी बीसीसीआयची बैठक झाली खरी पण त्यात कोणताच ठोस निर्णय़ घेतला गेला नाही..उलट बीसीसीआयने सावरासावर करण्याचाच प्रयत्न केला.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात तीन क्रिकटपटूंना दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर बीसीसीआयने रविवारी चेन्नईत तातडीची एक बैठक घेतली..बोर्ड काय निर्णय घेतं याकडं सर्वांच लक्ष होतं..यावेळी तरी बीसीसीआय कठोर भुमिका घेईल असं सर्वांना वाटलं होतं... पण बीसीसीआयची बैठक केवळ एक औपचारीकता ठरली..कारण या बैठकीतून काहीच निष्पन्न झालं नाही.. बीसीसीआय केवळ क्रिकेटपटूंवर नियंत्रण ठेवू शकतं, सट्टेबाजांवर नाही अशा शब्दात बीसीसीआय अध्यक्षांनी आपली हतबलता व्यक्त केलीय. बीसीसीआयचं लाचलुचपत प्रतिबंधक पथक आयपीएलवर नजर ठेवून होत तर स्पॉट फिक्सिंग कसं झालं ?BCCIचं लाचलुचपत प्रतिबंधक पथक केवळ दिखाव तर नाही ना ?असा प्रश्न उपस्थित होतो.

BCCIच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकप्रमुखाच्या अहवालानंतर बीसीसीआय स्प़ॉट फिक्सिंगप्रकरणी निर्णय घेणार आहे...बीबीसीआय अध्यक्ष नैसर्गिक न्यायाची भाषा करत आहेत...पण स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींविरोधात पुरेसे पुरावे असूनही बीसीसीआय अध्यक्ष कारवाई करण्यास धजावत नाही हे विशेष. ज्या पद्धतीने बीबीसीआय अध्यक्ष या प्रकरणी आयपीएलचा बचाव करत आहेत ते पहाता स्पॉट फिक्सिंगकडं बीबीसीआय डोळेझाक करत असल्याचंच चित्र पहायला मिळतंय...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, May 20, 2013, 23:20


comments powered by Disqus