Last Updated: Tuesday, June 4, 2013, 16:57
www.24taas.com, झी मीडिया, ढाकाआयपीएल म्हणजे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मॅच फिक्सिंगच प्रकरण समोर आल्यानंतर आता बीपीएलमध्येही (बांगलादेश प्रीमिअर लीग) मॅच फिक्सिंगचे प्रकरण उघड झाले आहे. बीपीएलमध्ये फिक्सिंग प्रकरणी बांग्लादेशचा माजी कर्णधार मोहम्मद अश्रफूल याला निलंबित केले आहे. आयपीएलच्या धर्तीवर बांगलादेशमध्ये बीपीएल खेळवले जाते.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक करण्यात आलेल्या नागपुरचा सट्टेबाज सुनील भाटीया याने या संदर्भात खुलासा केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेशात खेळविण्यात येणाऱ्या बीपीएलमधील काही मोठ्या खेळाडूंशी माझे जवळचे संबंध आहे. तसेच बांगलादेशी क्रिकेटर मुशर्रफ मुर्तजा याने देखील सांगितले की, ढाका ग्लॅडिएटर्समधील काही सहकारी खेळाडूंनी त्याच्यासमोर स्पॉट फिक्सिंगचा प्रस्ताव ठेवला होता. ग्लॅडिएटर्सचे मीडिया मॅनेजर मिन्हाजुद्दीन खान याने याला दुजोरा देत ही गोष्ट बीपीएल प्रशासनाच्या कानावर टाकली होती.
मुर्तजाने एका क्रिकेट वेबसाइटला माहिती देताना सांगितले की, मी फिक्सिंगचा प्रस्ताव आल्याचे टीम मॅनेजमेंटला सांगितले होते. मला विश्वास आहे की ते योग्य कारवाई करतील. या स्पर्धेत कोणत्याही प्रकारची अनियमीतता झाल्यास मी कर्णधारपदाचा राजीनामा देईल, असे टीम मॅनेजमेंटला सांगितले होते.
अश्रफूलने एसएसयू टीमशी खेळण्यात आलाला सामना फिक्स केल्याचे कबूल केले आहे, असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी सांगितले. त्यामुळे आता अश्रफूल याला निलंबित करण्यात आले असून त्या कोणत्याही स्तरावरील क्रिकेट खेळण्यास बंदी आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 4, 2013, 16:55