Last Updated: Wednesday, May 29, 2013, 19:24
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आपलं मौनं सोडलंय. त्यासोबतच पवारांनी बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणीही केलीय. ‘मी बीसीसीआयवर असतो तर फिक्सिंग होऊच दिलं नसतं’ अशी पुष्टीही पवारांनी आपलं म्हणणं स्पष्ट करताना जोडलीय.
आयपीएल सीझन ६ मधल्या सर्वच्या सर्व मॅचेसची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी शरद पवार यांनी केलीय. फिक्सिंगमुळे बीसीसीआयच्या प्रतिमेला धक्का बसल्याचही पवरांनी सांगिताना .पदावर रहाणं न रहाण याबाबत मी काहीच बोलणार नसल्याच सांगतांना पवारांनी अप्रत्यक्षपणे श्रीनिवासनं यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणीही पवारांनी केली. बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्यावर टीका करतानाच त्यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी थेट मागणी मात्र पवारांनी टाळली.
‘जे घडतंय ते केवळ दुःखदायक आहे... स्पॉट फिक्सिंग उघड झालं तो दिवस क्रिकेटसाठी काळा दिवस ठरलाय. फिक्सिंगमुळे केवळ खेळाडूंच्याच नाही तर बीसीसीआयच्या प्रतिमेलाही धक्का बसलाय’ असं म्हणत शरद पवार यांनी शशांक मनोहर यांच्या सर्व सामन्यांच्या चौकशीच्या मागणीला आपला पाठिंबा दिलाय.
दरम्यान, सर्व बाजूने विरोध होत असला तरी राजीनामा न देण्याच्या हट्टावर एन. श्रीनिवासन ठाम आहेत. मी जे कोलकातामध्ये बोललो तेच राजीव शुक्ला यांनी आज सांगितलंय. मयप्पन प्रकरणाची चौकशी स्वतंत्रपणे सुरु असून त्यामध्ये माझा हस्तक्षेप नाही, असं सांगत श्रीनिवासन यांनी पुन्हा एकदा राजीनामा देण्यास नकार दिलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 29, 2013, 19:24