Last Updated: Wednesday, May 29, 2013, 14:34
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबीसीसीआय अध्यश्र एन. श्रीनिवासन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला आहे. श्रीनिवासनं यांनी स्पॉट फिक्सिंगबाबत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीपासून दूर रहाण्याचा सल्ला आयपीएल कमिश्नर राजीव शुक्ला यांनी दिला आहे.
श्रीनिवासनं यांच्या बीसीसीआयचं अध्यक्षपद सोडण्याच्या मागणी होतं असताना आज दिल्लीत राजीव शुक्ला यांनी आज अरुण जेटलींशी भेट घेतली. यानंतर शुक्ला यांनी श्रीनिवासन यांना दिलेला सल्ला पाहता बीसीसीआयमधील राजकारणालाही वेग आल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
बीसीसीआयमध्ये श्रीनीविसानं हटाव मोहिम तेज झाली आहे... त्यामुळे आता श्रीनिवासन बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 29, 2013, 14:34