Last Updated: Wednesday, September 12, 2012, 17:03
साहित्य रवा २ कप
किसलेलं सुकं खोबरं १ कप
साजुक तूप पाऊण कप (आवश्यकतेनुसार कमी जास्त)
साखर २ कप
दुध १/४ कप
काजू १५
बेदाणे १५
४ हिरवे वेलदोडयाची पूड
४ लवंगाची पूड
कृती - ३ टेबल स्पून तूप नॉनस्टिक पॅन मध्ये गरम करा.त्या मध्ये रवा घालून हलकासा ब्राऊन रंगावर भाजून घ्या.रवा गार करा.
- तुपावर काजू व बेदाणे तळून घ्या. बाजूला ठेवा.
- रवा आणि साखर एकत्र मिक्सर मध्ये पावडर करा. बाजूला ठेवा. (साखरेबरोबर रवा दळल्याने रवा बारीक होण्यास मदत होते)
- किसलेलं सुकं खोबरं जरासं नॉनस्टिक पॅन मध्ये शेकून घ्या. गार झाले की मिक्सर मध्ये फिरवून पावडर करून घ्या.
- कोकोनट पावडर, रवा पावडर, लवंग पूड, वेलची पूड चांगली एकत्र करा. त्यावर दूध शिंपडून मिक्स करा. गरज वाटेल तसेच शिंपडत राहा.लाडू करताना एकदम दूध ओतू नका नाहीतर लाडू वळले जाणार नाहीत.थोडे थोडे तूप ओतून लाडू होतील का पाहा.
- लाडू वळतील असं प्रमाण झालं की त्याचे लाडू वळायला सुरुवात करा.प्रत्येक लाडवात एक काजू एक बेदाणा घाला. १५ मिनिटाने लाडू छान घट्ट होतात.