सेलिब्रिटी गणरायाच्या सेवेत , Celebrity Ganapathi
Zeenews logo
English   
Thursday, July 10, 2025 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
logo ganesha
 
top

सेलिब्रिटी गणरायाच्या सेवेत

Thursday, September 20, 2012, 09:32
सेलिब्रिटी गणरायाच्या सेवेत www.24taas.com,मुंबई

गणरायाच्या आगमनानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण झालंय. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण आतूर झालाय.
सेलिब्रिटी मंडळीही गणरायाच्या सेवेत दाखल झाली आहेत.

मुंबईत ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांच्या घरीही गणपती बाप्पाचं मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आलं. शूटिंगला सुटी आता फक्त बाप्पाच्या सेवेत, असं म्हणत विनय आपटेंनी गणेशोत्सवासाठी खास सुटी राखून ठेवत असल्याचं सांगितलं.

मोहन जोशी यांच्या घरीही गणपती बाप्पाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. विघ्नहर्त्या गणरायाचं स्वागत करताना मनाला एक वेगळच समाधान लाभत असल्याची प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी व्यक्त केली.

राजकारण्यांपासून ते सेलिब्रेटी सारेच गणराया चरणी नतमस्तक झालेत. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णीसुद्धा याला अपवाद नाही. सलीलनं पुण्यात आपल्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केलीय.. त्यानंतर कुलकर्णी कुटुंबीयांनी मनोभावे गणरायाची पूजाअर्चा आणि आरती केली.

गायिका नेहा राजपालच्या घरीही गणरायाचं मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आलं. ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांच्या घरी गणपती बाप्पाचं मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आलं. त्यांनी गणेशोत्सवासाठी खास सुटी राखून ठेवत असल्याचं सांगितलं.

अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरीही गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. गणेशोत्सवाचे हे दिवस आठवणीत राहणारे असतात, असं स्वप्नील म्हणतो. स्वप्नीलच्या घरी यंदा पंचधातुची गणेशमूर्ती आणण्यात आलीये.


First Published: Thursday, September 20, 2012, 09:32

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आईडी:
ई-मेल आयडी:
 
 
dot
photo
chick
dot

विविध गणपती स्थानांची ओळख