सलमानच्या घरी `गणपती बाप्पा मोरया`चा गजर, ganpati bappa at salman khan house
Zeenews logo
English   
Sunday, July 13, 2025 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
logo ganesha
 
top

सलमानच्या घरी `गणपती बाप्पा मोरया`चा गजर

सलमानच्या घरी `गणपती बाप्पा मोरया`चा गजर www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडचा ‘दबंग’ खान धर्मनिरपेक्ष व्यक्ती म्हणून ओळखला जातो. खरं तर सलमान खान लहानाचा मोठा झाला ते वातावरणच अनेक धर्मांच्या सरमिसळीचं होतं. त्यामुळे तो सर्वच धर्मांचा आदर राखतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणेच आजही सलमानच्या घरी बाप्पांचं आगमन झालंय. त्यानिमित्तानं त्याचं अख्ख कुटुंब एकत्र आलं होतं.

सलमानचे वडील सलीम खान एक मुस्लिम आहेत, त्याची आई सलमा (खरं नाव सुशीला चराक) एक हिंदू आहे तर त्याची सावत्र आई हेलन एका ख्रिश्चन कुटुंबातून आहे. सलमानचा संपूर्ण कुटुंब मुंबईतल्या वांद्र्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये स्थित आहे. सलमान आणि त्याचं कुटुंब गेल्या ११ वर्षांपासून गणेशाची मोठ्या मनोभावे स्थापना करतात. यंदाही खान कुटुंबीयांच्या घरी गणेशाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर सलमानच्या घरातूनही ऐकायला मिळाला.

सलमानची छोटी बहिण अर्पिता हिनं घरी गणेशाच्या प्रतिष्ठापनेची सुरुवात केली होती. त्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्य बाप्पांच्या सेवेला लागला आणि विभिन्न धर्म बाजूला सारून प्रत्येक गणेशाची मनोभावे आरतीही म्हणू लागला. आपल्या काही आठवणी सांगताना सलमानची आई सलमा सांगतात, अर्पिता गेल्या कित्येक वर्षांपासून गणेशाची मनोभावे पूजा करते. जेव्हा मुलं छोटी होती, तेव्हा मी त्यांना तयार करत असे आणि संध्याकाळी शेजारच्या घरांत जाऊन ते गणेशोत्सवाचा आनंद घेत असत.

यावर्षीही सलमाननं आपल्या शूटिंगच्या बिझी शेड्युल्डमधून काही दिवसांचा वेळ गणपती पूजनासाठी राखून ठेवलाय. तो म्हणतो, मला जन्मापासूनच प्रत्येक धर्माचा आशिर्वाद मिळालाय, त्यामुळेच मी सगळ्याच धर्मांचा आदर करतो.


First Published: Wednesday, September 19, 2012, 17:10

प्रतिक्रिया

shabbir i memon - alibag
salman wos greet persan in the hole life hats of you ........
जवाब

salmaan is great - Airoli navi mumbai
ganpati bappa morayaaaaa.......
जवाब

nagesh - mumbai
hi gost muslim darma vedya lokana patanar nahi.
जवाब

deepali - pune
i like salman khan and his ganpati festival
जवाब

sharad rahatwal - mumbai
sharadrahatwal@yahoo.com
जवाब

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आईडी:
ई-मेल आयडी:
 
 
dot
photo
chick
dot

विविध गणपती स्थानांची ओळख