Ganpati festival, गणेशोत्सवाची परंपरा
Zeenews logo
English   
Thursday, July 10, 2025 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
logo ganesha
 
top

गणेशोत्सवाची परंपरा

गणेशोत्सवाची परंपराwww.24taas.com,मुंबई

गणपती उत्सवाला लोकमान्य टिळकांनी सुरूवात केली. तो काळ स्वातंत्र्यलढ्याचा होता. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरिता जनजागृती व्हावी याकरिता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ठेऊन धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले. आज महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

३११ वर्षांची परंपरा असलेला महागणपती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खवळे महागणपतीची स्थापना सन १७०१ मध्ये या घराण्याचा मूळपुरुष शिव तांडेल याने सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच त्या घराण्याच्या पहिल्या पिढीपासून अगदी आतापर्यंतची नववी व दहावी पिढी त्याच उत्साहात गणेशोत्सव साजरा करीत आहे. ‘लिम्का बुक’नेही मान्यता दिलेला भारतातील पहिला आणि ३११ वर्षांची परंपरा असलेला हा आगळावेगळा महागणपती आहे.

या महागणपतीची मूर्ती बनविण्यास श्रावण महिन्यामध्ये नारळी पौर्णिमेला सुरुवात करतात. गणेश चतुर्थीला या महागणपतीला संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून पूजेला बसवितात. फक्त डोळे रंगविले जातात व विधिवत पूजा होते. दुसर्याल दिवशी उंदीर पूजेला ठेवतात. तिसर्याळ दिवशी या महागणपतीचे रंगकाम सुरू होते व ते पाचव्या दिवशी संपूर्ण रंगवून संपते. शेवटचे रंगकाम विसाव्या दिवशी दुपारी होते. पहिले चार दिवस सफेद, नंतर संपूर्ण रंगकाम झालेला व विसर्जनाच्या दिवशी पिवळे ठिपके दिलेला असा २१ दिवसांत वेगवेगळा दिसणारा असा हा जगातील एकमेव गणपती आहे.
गणेशोत्सवाची परंपरा

गणेश गल्लीचा राजा

मुंबईतल्या ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला जगभरातून लोक येत असतात. या राजाच्या सेवेला जवळजवळ तीन हजार कार्यकर्ते कार्यरत असतात. ‘लालबागचा राजा’नंतर मुंबईतल्या लोकांची पावलं आपोआप वळतात ती गणेश गल्लीच्या राजाकडे. पण या राजाचं मंडळ हे त्या बाप्पाच्या सेवेसोबतच समाजाप्रती असलेलं ऋृण फेडण्यासाठी बरेच उपक्रम राबवत असतात. या मंडळातर्फे दरवर्षी लोकांसाठी आरोग्य शिबीर, चष्मे वाटप, मोतिबिंदू ऑपरेशन मोफतरीत्या केलं, राबवलं जातं.
जीएसबीचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या किंग सर्कलच्या राजाची मूर्ती ही दरवर्षी शाडूच्या मातीची तयार केलेली असते. तसंच ही मूर्ती नागपंचमीच्या दिवशी बनवायला सुरुवात केली जाते. या गणपतीवर दरवर्षी ६८ किलो सोनं व चारशे किलो चांदी चढवली जाते.

लालबागचा राजा

लालबागच्या राजाची स्थापना १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार सन १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाउढसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे १९३४ साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात `श्री`ची स्थापना झाली. येथूनच `नवसाला पावणारा लालबागचा राजा` म्हणून श्री ची मूर्ती प्रसिध्द झाली.

गिरगावचा गणेशोत्सव

गिरगावनेही आता टॉवर्सची उंची गाठण्यास सुरुवात केली असली, तरी आजही बहुतांश पारपंरिक पद्धतीचा आणि कार्यकर्त्यांचा उत्सव हे गिरगावच्या गणेशोत्सवाचे रूप कायम टिकून आहे. व्यापारीकरणाची लागण येथेही झाली आहे, पण खूपच कमी प्रमाणात. गिरगावचा गणेशोत्सव म्हटला की प्रामुख्याने तीन भाग येथे पडतात. गिरगावच्या सुरुवातीचा चिराबाजारचा भाग , त्यानंतर झावबावाडी , ठाकूरद्वारपासून सुरू झालेला थेट मुगभाट , आंबेवाडी , रामचंद्र बिल्डिंग , प्रार्थना समाजपर्यंतचा परिसर आणि त्यापलीकडचा खेतवाडीचा परिसर.

गणेशोत्सवाच्या दरम्यान अख्खे गिरगाव एक मंडपच बनल्यासारखे. इथे सार्वजनिक गणेशोत्सवांची जितकी मोठी संख्या तितकीच घरगुती गणपतींची संख्याही मोठी असते. त्यामुळेच तर विसर्जनाच्या मिरवणुकींप्रमाणे गणेशचतुर्थीच्या म्हणजेच पहिल्या दिवशी वाजतगाजत प्रत्येक जण आपापली मूर्ती घरी आणतात. पूर्वापारचे मराठी - गुजराती - गिरगावलाच खेटून असलेल्या खेतवाडीचा तोंडवळा मात्र पूर्वापार वेगळाच असतो. खेतवाडीच्या पाचव्या सहाव्या गल्लीपासून अकराव्या - बाराव्या गल्लीपर्यंत १८ ते २५ फूट उंचीच्या मूर्ती पाहण्यासाठी अहोरात्र रांगा.गणेशोत्सवाची परंपरा

दादर-माटूंग्या गणेशोत्सव

मुंबईच्या राजकीय , सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीचे प्रमुख केंद्र असलेल्या दादर आणि परिसरातील गणेशोत्सवात गेल्या अनेक वर्षांपासून देखावे , रोषणाई आणि उंच गणेशमूर्तीपेक्षा सामाजिक कार्यावर भर देऊन गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल दिसून येतो.

मुंबईतील गणेशोत्सवात गिरगावनंतर दादरच्या गणेशोत्सवाचे महत्त्व होते. म्हणूनच स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या दादरच्या राम मारुती रोड आसपास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गिरगावमधील ब्राह्मण सभेच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. लोकमान्य टिळकांनी ब्राह्मण सभेच्या तीन मूर्तींची स्थापना केली. तशाच गणेशमूर्तीची दादरच्या राम मारुती रोड गणेशोत्सव मंडळाने प्रतिष्ठापना केली. गेल्या ६४ वर्षांपासून या मंडळाच्या मूर्तीत बदल झालेला नाही. तीन फूटांची शाडूची मूर्ती हे या मंडळाच्या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य आजही कायम आहे.

दादरमधील विठ्ठलवाडी आसपास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा दबदबा आहे. म्हणूनच दादरचा राजा असे बिरूद या गणेशोत्सवाला मिळाले आहे. गेल्या ७४ वर्षांपासून साजरा होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी मानली आहे. दादर - माहीममधील गणपती उत्सव सर्वसामान्यांचा उत्सव म्हणून ओळखला जातो .

माटुंगा वडाळ्यातील जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा गणेशोत्सव म्हणजे श्रीमंतांचा गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो बावनकशी सोन्याने मढलेल्या दागिन्यांची मूर्ती हे या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे . थाटमाट असला तरी श्रीमंतीचा कुठेही बडेजाव दिसत नाही . मंडळाने पावित्र्य अतिशय कसोशीने जपले आहे.

पुण्यातील गणपती

गणेशोत्सव हा पुण्याच्या शिरपेचातील मानबिंदू. मानाच्या पहिला कसबा तर मानाच्या दुसरा तांबडी जोगेश्वसरी मंडळाच्या गणपती आहे. गुरुजी तालीम गणपती मंडळाला १२५ वर्षांची परंपरा आहे. तुळशीबागेच्या गणपतीची १९७५ सालची ही मूर्ती पंधरा फूट उंच आणि हेमाडपंती पद्धतीची आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी तुळशीबागेत दहा दिवस प्रचंड गर्दी लोटते.
यंदा दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ नेहमीच वेगवेगळ्या मंदिराच्या प्रतिकृती साकारत असते. अखिल मंडई गणपती मंडळाची शारदा गजाननाची सुंदर मूर्ती १८९४ साली डोंगरे काची पैलवान यांनी तुळजापूरच्या भवानीमाता मंदिराच्या कळसावर असलेल्या शारदा गजाननाच्या प्रतिकृतीवरून मंडईच्या गणपतीची मूर्ती तयार केली असल्याची माहिती मंडळाचे जाणकार देतात.

भाऊसाहेब रंगारी यांनी १८४२ साली स्वत: गणरायाची मूर्ती तयार करून तिची स्थापना केली. भारतातील पहिला गणपती असलेल्या या गणपतीची मिरवणूक १८४२ साली जशी निघत होती तशीच आणि तितक्याच पारंपरिकरीत्या आजही निघते.


First Published: Wednesday, September 12, 2012, 10:46

प्रतिक्रिया

Tushar - Pune
jase mumbai chya gansh utsavabaddal savistar lihile ahe tase punyachya suddha lihile aste tar ajun chan vatale aste
जवाब

SAMEER ANILRAO DNYATE - SAMBHAJINAGAR ( AURANGABAD )
sameer.dnyate@gmail.com
जवाब

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आईडी:
ई-मेल आयडी:
 
 
dot
photo
chick
dot

विविध गणपती स्थानांची ओळख