पुण्यातल्या गणेश मंडळांना बाप्पा पावला! Pune Ganpati mandal
Zeenews logo
English   
Sunday, July 13, 2025 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
logo ganesha
 
top

पुण्यातल्या गणेश मंडळांना बाप्पा पावला!

Wednesday, September 19, 2012, 22:24
पुण्यातल्या गणेश मंडळांना बाप्पा पावला!www.24taas.com, पुणे

पुण्यातल्या गणेश मंडळांना एका अर्थी गणपती आल्य़ा आल्या पावलाय. कारण गेल्या वर्षी मंडळांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचे आदेश अखेर गृह मंत्रालयाने दिले आहेत.

मंगळवारी रात्री उशीरा हे आदेश जारी करण्यात आले. पुण्यातल्या १५५ मंडळांवर गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध कारणांसाठी गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी शहरातल्या आमदारांनी लावून धरली होती. काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता सर्व खटले या आदेशान्वये मागे घेण्यात आलेत.

त्याशिवाय गणेशोत्सव काळात शेवटचे ५ दिवस रात्री १२ पर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्याला परवानगी आहे. गणेशोत्सव संदर्भातल्या दोन महत्वाच्या विषयांवर सकारात्मक निर्णय झाल्याने गणेशोत्सवाचा पहिलाच दिवस कार्यकर्त्यांसाठी डबल धमाका ठरलाय.


First Published: Wednesday, September 19, 2012, 22:24

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आईडी:
ई-मेल आयडी:
 
 
dot
photo
chick
dot

विविध गणपती स्थानांची ओळख